एम. एम. महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा
पाचोरा दि. 02 मे - एम. एम. महाविद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा झाला. संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. श्री. नानासाहेब सुरेश देवरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री. आप्पासाहेब सतिष चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील, मा. प्रा. एस. एम. पाटील, मा. प्रा. राजेश मांडोळे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.