Forts गड-किल्ले

More forts are added periodically

  शिवमुद्रा

 
 


"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण."

 (आज्ञापत्र-रामचंद्रपंत अमात्य)" जैसा कुळंबी शेतात माळा घालून शेत राखतो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. नावेस खिळे मारुन बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाईल. आपणास धर्म स्थापना व राज्य संपादन करणे. सर्वांस अन्नाला लावून, शत्रुप्रवेश न होय, ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रु उरावर आहे. तो आला तरी नवे जुने ३६० किल्ले हजरतीस आहे. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी ३६० वर्षे पाहिजेत."

 (छ्त्रपती शिवाजी महाराज)