Support Non-profits: Join a short Online Course
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र सरकार
समाजीक प्रश्नाशी निगडित प्रकल्पामुळे शालेय मुलं समाजाप्रती अधिक जागरूक होतात का?
मुलांना शालेय वयात सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाल्यास ते अधिक जागरूक बनतात का, ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळी वर बरेच संशोधन सुरु आहे. त्यासाठी बरेच कृती प्रकल्प हाती घेऊन शिक्षक मुलांना समाज उपयोगी काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देतात. पण फक्त समाजकार्यात जुंपून घेणं हे मुलांकडून अपेक्षित नाही. सोबतच त्यांचा पाठ्यक्रमाप्रमाने अभ्यास होणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे अश्या उपक्रमांमध्ये समाजाचा विकास आणि मुलांची शैक्षणिक प्रगतीचा सुवर्णमध्य साधता यायला हवा. परदेशात ह्या शिक्षण पद्धतीला Service-Learning Pedagogy म्हणतात. आपण मराठीत 'सामाजिक प्रकल्पातून शिक्षण' अस म्हणुया.
ह्या संशोधनासाठी महाराष्ट्रातील शासकीय, निम-शासकीय व खाजगी शाळांमध्ये मुलांना अशा सामजिक उपक्रमात सहभागी करून घेतलं जातं का हे बघण्याचा विचार करत आहे. जर का केलं जातं असेल तर त्यामुळे सामाजिक जाणीव विकसित होतात का आणि पुढील ३-४ वर्ष काय परिणाम राहतो हे तपासून बघण्याचा प्रयत्न आहे.
अ. शिक्षकांकडून त्यांनी गेल्या ५ वर्षात घेतलेल्या कुठल्याही २ सामाजिक उपक्रमाबद्दल प्रत्येकी एक प्रश्नावली भरून घेतली जाईल व त्यांच्या २ मुलाखती घेतल्या जातील.
ब. तसेच मुलांकडून दोन आठवड्याच्या अंतराने २ प्रश्नावली भरून घेतल्या जातील.
शिक्षक वयक्तिक पातळीवर संशोधनात सहभाग घेऊ शकशील. (शाळेची परवानगी आवश्यक नाही)
सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती पूर्णपणे सुरक्षित असेल व संशोधक सोडून इतर कोणालाही दिली जाणार नाही
संकलित केलेली माहिती संशोधन कार्याशिवाय इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरली जाणार नाही