On this page, you will find useful, informative articles related to various aspects of ICT and the latest information about technological developments in the field of Information and Communication Technology. The purpose of this information service is to consult on current developments in the field of ICT and to make the library users aware of this.
Get the latest news and information of technological development in the ICT sector.
Click here to get the news..
Browse the useful software at one place here.
Click here to browse..
See here the interesting videos of different things in Information and Communication Technologies. You will be amazed to see that..
बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त 155260 हा नंबर डायल करा. काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल.
सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.
यंत्रणा काम कशी करते?
हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच
http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 155260 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास 55 बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.
Click here to access the National Cyber Crime Reporting Portal..