मला माहिती नाही अजून किती काळ मला त्या रत्नाकरचा आकर्षण असणारे. जेव्हा जेव्हा त्याला पाहतो त्याच्यासोबत असतो तेव्हा मी परत एकदा स्वतःला प्रश्न विचारतो चाचपडून पाहतो आणि पुन्हा उभा राहतो. स्वतःलाच पडलेले प्रश्न त्याची पडलेली उत्तर हे सगळं तटस्थपणे बघायला मला नेहमीच समुद्र बळ देत आलाय. त्याने ते आमच्या परवाच्या भेटीतही केले. लक्षदीप विरघळले गात्री, मला का कोण जाणे लक्षदीप म्हणजे तो मावळणाऱ्या सूर्य तर नव्हे असं वाटून मी परत एकदा शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या शब्दांचा अर्थ पुन्हा एकदा शोधू लागलो. अर्थातच कुठल्याच प्रकारच्या उत्तराची मला अपेक्षा तेव्हाही नव्हती आणि आत्ता ही नाही. सापडतील तेव्हा सापडतील उत्तरं. आपण इतके कोपऱ्यात आलोय की आता इथून सावंतवाडी अवघ्या तीस मिनिटांवर असल्यामुळे आपण परतीचा प्रवास आंबोली मार्गे करायचा असं ठरलं. उठून जेव्हा आम्ही प्रवास सुरू केला तेव्हा गप्पांच्या नादात असं लक्षात आलं की आपण एका वेगळ्याच वाटेने प्रवास सुरू केलाय. तोपर्यंत एक नक्की लक्षात आलं होतं की एके ठिकाणी एका नाटकाची तालीम सुरू आहे. अर्थातच वेळेअभावी तिथे जायचं नाही म्हणून आम्ही पुढे निघणार तेवढ्यात असं ठरलं की आपल्याला आपण नेमकं कुठे चुकलोय हे कळायला थोडा वेळ लागेल मग काय गाडी वळवली आणि थेट तालमीचे ठिकाण गाठलं.
मुळातच मला खूप साऱ्या कारणांसाठी गोवा आणि तिथली माणसं ती आवडतात मला त्यांचं अप्रूप आहे त्यांच्याबद्दल इतका आदर आहे की त्यांनी छोटसं जरी काही केलं तरी मला त्याचं प्रचंड कौतुक आहे. आता तर ते तालीम करत होते. साधारण 20 ते 28 वयोगटातील काही पोर ही नाटकाची तालीम करत होती ज्याचा प्रयोग आज संध्याकाळी त्यांच्याच गावच्या जत्रेत होता. यावेळेला आम्ही जिथे राहिलो अरंबोळला तिथे मी खूप सारी नाटकाची पोस्टर्स बघितली. त्यातला एकही प्रयोग आम्ही होतो त्या वेळेमध्ये नव्हता आणि म्हणून कदाचित तालीम माझ्या वाट्याला आली. दशावतार तीयात्र कंपनी नाटक सिनेमा या सगळ्यांचं एक अजब रसायन तयार होऊन त्या नाटकाच्या कथानकावर अभिनय शैलीवर आणि इतर नाट्य घटकांवर त्याचा विभिन्न पण एक प्रभाव दिसून येत होता. माझ्यासारख्या कूपमंडुक विचारसरणीला ही प्रगल्भता परत एकदा आश्चर्यचकित करून गेली. नाटक जरी पूर्ण प्रमाण मराठीत असलं तरी सुद्धा दिग्दर्शकांनी किंवा नटसंचांनी एकमेकांशी कोकणीत संभाषण करणे आणि मग परत त्या प्रमाण मराठीचा आधार घेणं मुळातच मला हेच theatrical वाटत होतं. मुंबईतल्या एका घरामध्ये सुरू असलेलं हे नाटक होतं आणि त्या नाटकांमध्ये साधारणपणे ज्यांची ज्यांची ओळख आपल्याला आज जनसामान्यात आहे ते सगळी पात्र त्या नाटकात होती आणि त्यामुळे त्या नाटकात घडणारा प्रत्येक संवाद हा जणू काही माझ्याच घरातला आहे असं वाटणं अत्यंत स्वाभाविक होतं. अर्ध्याहुन वेळा ते डायलॉग पाठ नसल्यामुळे तिथे प्रॉम्प्टर होता. तोच सगळ्यात जास्त अभिनय करत होता की काय असं वाटत होतं कारण त्याला विसरणं किंवा लक्ष न देणं परवडण्यासारखं नव्हतं. क्लायमॅक्स ची जेव्हा रिव्हर्सल सुरू झाली त्यावेळेला ते मुख्य पात्र कदाचित तिथे तालमीला नव्हतं का नंतर येणार असेल ते माहिती नाही पण अचानक विंगेत असलेला प्रॉम्प्टर स्टेज वरती तिची भूमिका निभावायला लागला आणि त्या पात्राचं वाक्य घेणं शिवाय प्रांत करणे अशी दुहेरी भूमिका बजाव्याला लागला. या स्किल सेट बद्दल अभिमान नाही वाटला तरच नवल.
कदाचित तिथे दिग्दर्शक होता नव्हता माहिती नाही पण एक तालीम मास्तर नक्की होतात जो सगळ्यांवरती नजर ठेवून कदाचित ते नाटक त्या मुलांनी खूप वेळा बघितलं असेल किंवा खूप वेळा सादर केलं असेल त्यामुळे नाटकातल्या बऱ्याचशा जागा एकमेकांना माहिती होत्या पण आजच्या प्रयोगाची गरज ओळखून जेवढे सूचक बदल करायला हवे होते तेवढे मात्र हा तालीम मास्तर नक्कीच करत होता. सिनेमाप्रमाणे येणार संगीत ही या नाटकाची अजून एक खासियत. आणि ते संगीत या सगळ्याला पूरक पोषक होतं आणि त्या सगळ्याचा अंदाज घेत घेत ही तालीम सुरू होती. माझ्यासारख्याला शिकण्याची संधी मिळाली आणि तीही अशी तर यात नवल ते काय? हा प्रवास शिकण्याचा अखंड सुरू राहणार कदाचित तो संपला तर भीती अशी आहे की मीही संपेन.
Author’s Disclaimer:
The author does not claim any creative rights over the content performed or written by the theatre group mentioned. The intention of this blog is solely to reflect on a personal experience and learning, and not to claim ownership or credit of any kind.