Announcements

राज्यस्तरीय वेबिनार- प्रशासकीय सेवा: संधी व आव्हाने- २६.०३.२०२२ @ सकाळी १०. ०० वाजता

प्रिय विद्यार्थी मित्रांनो...!

आपणांस माहिती देताना आनंद होत आहे की, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, न्या. तात्यासाहेब आठल्ये कला, वेदमूर्ती शं. रा. सप्रे वाणिज्य व विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) देवरुख यांच्या स्पर्धा परीक्षा, मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने शनिवार दि. २६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता प्रशासकीय सेवा: संधी व आव्हाने या विषयावर ऑनलाईन मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. प्रशासकीय सेवेसंदर्भातील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही तज्ज्ञ मार्गदर्शक देतील.

तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये आपला सहभाग नोंदवावा..

विषय : प्रशासकीय सेवा: संधी व आव्हाने

मार्गदर्शक : डॉ. आसावरी संसारे - तहसिलदार, मुंबई महानगर

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/te3XSXGHqr611WQ57

व्हट्स अॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/KIZT6ipu6aPDDtOS2UUKHU

गूगल मीट लिंक:

https://meet.google.com/jsq-svfu-vjd



राज्यस्तरीय वेबिनार- स्पर्धा परीक्षा आव्हाने व संधी - २८.०३.२०२२ @ सायंकाळी ४. ३० वाजता

राज्यस्तरीय वेबिनार- स्पर्धा परीक्षा आव्हाने व संधी - २८.०३.२०२२ @ सायंकाळी ४. ३० वाजता

आपणांस माहिती देताना आनंद होत आहे की, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, न्या. तात्यासाहेब आठल्ये कला, वेदमूर्ती शं. रा. सप्रे वाणिज्य व विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) देवरुख यांच्या स्पर्धा परीक्षा, मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने सोमवार दि. २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४. ३० वाजता स्पर्धा परीक्षा आव्हाने व संधी या विषयावर ऑनलाईन मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. स्पर्धा परीक्षेसंदर्भातील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही तज्ज्ञ मार्गदर्शक देतील.

तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये आपला सहभाग नोंदवावा..

विषय : स्पर्धा परीक्षा आव्हाने व संधी

मार्गदर्शक : मधुलिका देवगोजी, UPSC-2018 IRS (Asst. Commissioner of Income Tax)

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/TswC8iEj6VnSrzXi8

व्हट्स अॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/KIZT6ipu6aPDDtOS2UUKHU

गूगल मीट लिंक:

https://meet.google.com/zok-pfah-puf

वेबिनार मध्ये सहभाग व अभिप्राय भरल्यानंतर ई-सर्टिफिकेट दिले जाईल

अधिक संपर्क:

डॉ. वर्षा एस. फाटक- मोब. 9405069246

मराठी विभाग प्रमुख

श्री. सुभाष एस मायंगडे – मोब. 9860572797

समन्वयक, स्पर्धा परीक्षा विभाग

श्री. सुनिल आर. सोनवणे –मोब. 9130641682

प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभाग

------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. सरदार आ. पाटील

उप-प्राचार्य

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख( स्वायत्त)

डॉ. नरेंद्र प. तेंडोलकर

प्राचार्य

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख( स्वायत्त)



जागतिक महिला दिनानिमित्त

विविध जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा-२०२२

स्पर्धेक‍रिता खालील गूगल लिंकवर जाऊन नोंद करणे आवश्यक राहील

https://forms.gle/gKTKCEjQC9KMoczA7


*Exclusive Workshop on E-Content & Digital Presentation Development

@ASP College, Devrukh, Dist. Ratnagiri on 16th-17th Oct 2018.


देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ये, सप्रे आणि पित्रे महाविद्यालय देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या वतीने पुर्ण राज्यभर नावाजलेल्या नॉलेज ब्रीज, अहमदनगर निर्मित “शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व डिजिटल सादरीकरणाचे तंत्र” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्थळ: सेमिनार हॉल, आठल्ये, सप्रे आणि पित्रे महाविद्यालय देवरुख


स्थळाचे जीपीएस लोकेशन: https://goo.gl/maps/VkxKA2wAy8m


दिनांक: मंगळवार व बुधवार, ऑक्टोबर १६-१७, २०१८


वेळ: सकाळी 10 ते दुपारी 5


Trainer: Bhushan Kulkarni, Eknath Kore (Knowledge Bridge, Ahmednagar)


नोंदणी फी:

दोन दिवसाच्या कार्यशाळेसाठी फक्त रू. ३५० इतकी नोंदणी फी असेल. दोन दिवसाच्या कालावधीतील चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण या नोंदणी फी मधून दिले जाईल. कोणत्याही जिल्ह्यातील प्राध्यापक/ शिक्षक कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी होवू शकतात.


निवासव्यवस्था:

ज्या व्यक्तींना निवास व्यवस्था हवी असेल त्यांनी आयोजकांना तशी आगाऊ कल्पना द्यावी. देवरुख नगरातील निवासव्यवस्थेचे २४ तासासाठीचे दर रू. ३५० ते रू. १८०० च्या दरम्यान आहेत. निवास व्यवस्थेचा खर्च संबंधित व्यक्तींनी करणे आहे. आयोजक फक्त आगाऊ व्यवस्था करून ठेवतील.


नाव नोंदणी लिंक-

पुढील सर्व सूचना आपणास *WhatsApp ग्रुप वर / SMS व्दारे* दिल्या जातील.

नाव नोंदणी लिंक -


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe68VKBrBP9PxCHGYJvbvc80v9wzIEPzTn9Jfm8ORVM4dWntA/viewform


आपली झालेली नाव नोंदणी तपासून पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करावे.


goo.gl/PFTc4U


कार्यशाळेच्या प्रशिक्षणातील मुख्य विषय:

मोबाईल / कॉम्पुटर वर प्रोफेशनल ध्वनीमुद्रण व संकलन, कवितांचे ध्वनी मुद्रण, गीत गायन स्पेशल एफेक्ट सह ध्वनि मुद्रण, मोबाईल वर प्रोफेशनल व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी टेक्निक, दर्जेदार ध्वनी मुद्रणासह व्हिडीओ शुटींग, गणित / विज्ञान पिपीटी पाठांचे व्हिडीओ रूपांतरण, मोबाईल मल्टीकॅम टेक्निक,मोबाईल फिल्म मेकिंग, क्रोमा इफेक्ट.


कार्यशाळेत नवीन काय?

ऑडीओ व्हिडीओ निर्मिती साठी आता अँड्रॉइड मोबाईल चा वापर, अँड्रॉइड मोबाईल ला प्रोफेशनल माईक जोडण्याची सोय. पाठाचे PPT रूपांतरण, मोबाइल वरच PPT चे व्हिडीओ रूपांतरण, PPT + कॅमेरा समोरील सादरीकरण याचे मिक्सिंग, महितीपट निर्मिती, इ.


कार्यशाळेस येताना लॅपटॉप बरोबर आणल्यास उत्तम

शक्य असेल तर पुढील Android Apps मोबाइल वर आधीच इंस्टॉल करून ठेवा.

Lexis Audio Editor, Wave to MP3 converter, Cinema FV5 Lite, DU Recorder (किंवा Mobizen Screen Recorder), PowerPoint (किंवा WPS Office), Power Director (किंवा Kine Master). ज्या विषया संदर्भात व्हिडिओ बनवायचा आहे त्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ, पिपीटी आधीच सॉर्ट करून मोबाइल मध्ये कॉपी करून ठेवा.


विशेष सुचना:

E-Content Video निर्मिती साठी अत्यावश्यक साहित्य (Training DVD, Mobile Professional Mic, Collar Mic, Headband Mic, Wireless Mic, Chroma Curtain, Mobile Stand clip) कार्यशाळे स्थळी अल्पदरात उपलब्ध असेल.


अधिक महितीसाठी संपर्क:


डॉ. सरदार पाटील: ९०९६२२९७४१

कार्यशाळा समन्वयक आणि सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख,

भूगोलशास्त्र विभाग, आठल्ये, सप्रे आणि पित्रे महाविद्यालय देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी


निवास व्यवस्थेसाठी संपर्क:

डॉ. प्रताप नाईकवाडे: ९५९५८२१८९१

सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख,

वनस्पतीशास्त्र विभाग, आठल्ये, सप्रे आणि पित्रे महाविद्यालय देवरुख


*कार्यशाळेच्या तांत्रिक व मोफत आयोजना संबंधी माहिती साठी संपर्क-*

भूषण कुलकर्णी 8055819181,

एकनाथ कोरे 9822057786

Library Orientation for new Comers students

Academic year 2018-19

Central Library is going to organize Orientation Programme in August 2018, in the seminar hall as per given schedule. for new enrolled student to make them more familiar with the library resources, services and rules. so that they can avail library services and promoting reading habits.



आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये पीएच.डी. पदवीपर्यंत शिक्षणाची सुवर्णसंधी

पीएच.डी. पदवी करिता उभारण्यात आलेले महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राची इमारत