समाजामध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, याकरिता सर्व ग्रंथालये प्रयत्नशील आहेत. पुस्तके  ही  प्रत्येक व्यक्तिला दिशा देण्याचे निरंतर कार्य करत असतात. ज्या देशात ग्रंथालयांची  संख्या जास्त, तो देश अधिक विकसित व प्रगतशील असतो. त्याप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाची यशस्वीता ही ग्रंथालयांवर अवलंबून असते. ग्रंथालयांना महाविद्यालयाचा “आत्मा” असे संबोधले जाते. अशी ही ग्रंथालये वाचकांना हवी असलेली अद्ययावत वाचन संपदा निरंतर देण्याचे कार्य करत असतात. आपणां सारख्या ग्रंथ प्रेमीं व दानशूर व्यक्तींनी भेट स्वरुपात दिलेल्या ग्रंथांमुळे आमचा ग्रंथसंग्रह आणखीनच समृद्ध  होत आहे. आपल्या या दातृत्वाबद्दल आमचे महाविद्यालय शतशः आभारी राहील. 

                                                                                                                       - सुभाष एस. मायंगडे , ग्रंथपाल-आठल्ये सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख.