ग्रंथपाल दिन: ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १२९ वी जयंतीं साजरी करण्यात आली. व या जयंतीचे औचित्त साधून ग्रंथप्रदर्शन व ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन- १२ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ऑनलाइन क्विझ चे आयोजन- १२ ऑगस्ट २०२१
वाचन प्रेरणा दिन : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा ग्रंथ संग्रहाचे ऑनलाइन ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. व त्यांच्यावर आधारित documentary विद्यार्थ्यांना व्हाट्स अप्प द्वारे पाठवण्यात आले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन विडियो च्या माध्यमातून वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न..
विविध ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजन: कोविड महामारीच्या काळात विद्यार्थ्यानी आरोग्य व स्वच्छता यांच्या विविध प्रश्नासंबंधी जागृत्त रहावे, स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे वेळोवेळी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छता व आरोग्य विषयक सामान्यज्ञान स्पर्धा-२०२१
जागतिक पुस्तक दिन: २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये एका क्लिकवर कोणतीही माहिती उपलब्ध होत असते, परंतु पुस्तकांचे योगदान हे अमूल्यच आहे. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची सवय वाढावी व वाचनसंस्कृती अधिकाधिक वृंद्धीगत व्हावी याकरिता हा दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त - ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन- २३ एप्रिल २०२२
लायब्ररी स्मार्ट पेजचे (इ-पेज) प्रकाशन: विद्यार्थी व शिक्षकांना ग्रंथालय तसेच महाविद्यालयातील सोयी-सुविधांची माहिती एकाच ठिकाणी, एका क्लिकवर तत्परतेने मिळावी या उद्देशाने प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या संकल्पनेतून ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी तयार केलेल्या लायब्ररी स्मार्ट पेजचे (इ-पेज) प्रकाशन मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. हे नावीन्यपूर्ण इ-पेज आपल्या मोबाइलमध्ये ठेवल्यास महाविद्यालयाचे ग्रंथालय कायमच सर्व वाचकांसाठी सदैव तत्पर व उपयुक्त राहील.
विविध स्पर्धांचे आयोजन: ग्रंथालय व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १० जानेवारी २०२२ रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी -
१. प्रसाद घाग (मराठी माध्यम)-प्रथम , ओंकार गुरव (इंग्रजी माध्यम)-प्रथम , २. सिद्धी उपाध्ये-द्वितीय , ३. सोनाली सूर्वे- तृतीय,४. साक्षी माने- उत्तेजनार्थ.
१० फेब्रुवारी २०२२ रोजी कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. काव्यलेखन स्पर्धेतील विजेते विद्यार्थी-
१. नेहा सावंत-प्रथम, २. मीनल सुर्वे-द्वितीय, ३. स्नेहल मोरे-तृतीय
मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन: मराठी राजभाषा व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध लेखन, कविता सादरीकरण, एकपात्री व कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले.
महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन: ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
Shubham Mahesh Chalke-TYBA
Riddhi Shrenik Upadhye-TYBSc.