Competitive Exam and Career Guidance Section

All Study Material for Various Competitive Exams Like-UPSC,MPSC,IBPS, PS, SSC, NDA, CDS, RBI, Railways, etc. is provide free of Cost...


No.01 Competitive and Scholastic Exam Preperation Resource Website


MPSC Rajyaseva Exam Pattern | महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा पद्धती


शिवनेरी अॅकडमिचा चॅनेल

पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे.

उपजिल्हाधिकारी पदापासून सरळसेवा भरतीपर्यंतच्या परीक्षा देऊन सरकारी सेवेची स्वप्ने पाहणाऱ्या राज्यभरातल्या ग्रामीण, निमशहरी व शहरी भागातील उमेदवार, गृहिणींना "सकाळ विद्या' आणि "शिवनेरी फाउंडेशन' एक अभिनव डिजिटल तंत्र पुरवणार आहे. या तंत्राच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब अथवा संगणकाच्या माध्यमातून अगदी सहजसोप्या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा परिपूर्ण अभ्यास करता येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून "शिवनेरी फाउंडेशन'ने केलेल्या सर्वेक्षणातून व राज्य लोकसेवा आयोगाशी जवळून परिचित असणाऱ्या तज्ज्ञांच्या अभ्यासातून, आयोगाच्या परीक्षांनुसार अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा एकत्रित अभ्यास असणारे डिजिटल तंत्र साकारले आहे. परीक्षानिहाय 200 तासांपर्यंतचा परिपूर्ण अभ्यास या डिजिटल तंत्रात उपलब्ध करण्यात आला आहे.

इच्छा, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असूनही ध्येय गाठता येत नसल्याने स्पर्धा परीक्षेत हजारो उमेदवार अपयशी ठरतात. अगदी पाच ते सात वर्षे अभ्यास करूनही अनेकांना अपयश येते. या अपयशामागील कारणे जाणून घेत "शिवनेरी फाउंडेशन'ने हा डिजिटल अभ्यासक्रम तयार केला आहे. एखाद्या ऍकॅडमीमध्ये जाऊन अभ्यास करण्याची परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील या तंत्राचा फायदा होणार आहे. आपले काम सांभाळून स्पर्धा परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करू इच्छिणाऱ्या गृहिणी व नोकरदारांसाठीही हे तंत्र महत्त्वाचे ठरणार आहे.

पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षापासून अभ्यास सुरू करणाऱ्यांसाठी हा मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही. संपूर्ण अभ्यासक्रमाची व्हिडिओ लेक्‍चर्स, यशाकडे नेणाऱ्या परिपूर्ण नोट्‌स, चालू घडामोडींसाठी वैयक्तिकरीत्या उमेदवाराच्या व्हॉट्‌सऍप अथवा ई-मेलवर सातत्याने होणारे मार्गदर्शन, तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक पातळीवर हे डिजिटल तंत्र उमेदवारांना मार्गदर्शक व मदतीचे ठरणार आहे.

नोंदणी व इतर माहितीसाठी संपर्क

राज्यसेवा परीक्षा लवकरच होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अभ्यास वेळेत पूर्ण व्हावा यासाठी गुरुवारपासून (ता. 7) हे डिजिटल तंत्र राज्यभरातल्या "सकाळ' कार्यालयांमध्ये उपलब्ध होईल. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क ः 7350001617 (सकाळी 10 ते सायंकाळी 6 - रविवार सोडून).

हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन्ही साधनांसाठी वापरता येईल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध असेल. अर्थात, एका मोबाईललाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल.

या उच्च गुणवत्तेच्या तंत्राची झलक येथेही पाहता येईल.

(यू ट्यूबवर शिवनेरी ऍकॅडमीचा चॅनेल आहे.) https://www.youtube.com/channel/UCcUoYZmI4VkhuGAHKErLo8Q/videos

या लिंकवर या अभ्यासक्रमाच्या व्हिडिओ लेक्‍चर्सचे नमुने पाहायला मिळतील.

या परीक्षांसाठी डिजिटल तंत्र उपलब्ध

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 व पेपर 2 (सर्व विषय)

पीएसआय, एसटीआय, एएसओ परीक्षा (सर्व विषय)

खालील परीक्षांच्या अभ्यासासाठी नोंदणी सुरू

- पीएसआय, एसटीआय, एएसओ मुख्य परीक्षा (मराठी व इंग्रजी व्याकरण)

- तलाठी परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण)

- टॅक्‍स असिस्टंट (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण)

- खात्यांतर्गत फौजदार परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण)

- लिपिक (क्‍लेरिकल) परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण)

- पोलिस भरती (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी)


Study Circle

Study Circle is the pioneer in training students for the civil services in Maharashtra. Its books,magazines,weeklies and notes are highly sought after as they give very good results. The institute has in its 27 years glorious track record helped more than 1.5 lakh aspirants to make a successful career as civil services officers across India, especially in Maharashtra

Maharashtra Public Service Commission (MPSC) is a Constitutional Body established Under Article 315 of Constitution of India which provides a smooth and efficient functioning of the Government of Maharashtra (GoM) by providing suitable candidates for various Government posts and advise them on various service matters like formulation of Recruitment Rules (RR), advise on promotions, transfers and disciplinary actions etc. As per Article 320 of the Constitution of India, MPSC has been entrusted with the following major functions:-

  • 1. To conduct examinations for appointments to the service of Government of Maharashtra and its allied organizations.

  • 2. To advise the state Government on:

    • Matters relating to methods of recruitment to the various services

    • Suitability of candidates for appointment to the services through making promotions, deputations and nominations and transfers

    • Disciplinary matters affecting Government servants;transfers

    • Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.transfers

    • Claims for award of injury/family pension to Government servants and;transfers

    • Any other matter referred to them by the Governor;

  • 3. In addition, in the State of Maharashtra, the Commission deals with the following matters:

    • Under Section 80-B of the Mumbai Municipal Corporation Act, the Commission have been entrusted with the responsibility of advising

    • The Municipal Corporation of Greater Mumbai regarding appointments to posts under the control of Corporation which are equivalent to or higher than the post Executive Engineer. And;

    • The Mumbai Electric Supply and Transport undertaking regarding appointments to posts in Grade <96> A <96> II.

    • Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.transfers

The Union Public Service Commission (UPSC; Hindi: संघ लोक सेवा आयोग) is India's central recruiting agency. It is responsible for appointments to and examinations for All India services and group A & group B of Central services.[3]While Department of Personnel and Training is the central personnel agency in India.

The agency's charter is granted by Part XIV of the Constitution of India, titled as Services Under the Union and the States.[4][5] The commission is mandated by the Constitution for appointments to the services of the Union and All India Services. It is also required to be consulted by the Government in matters relating to the appointment, transfer, promotion and disciplinary matters. The commission reports directly to the President and can advise the Government through him. Although, such advice is not binding on the Government. Being a constitutional authority, UPSC is amongst the few institutions which function with both autonomy and freedom, along with the country’s higher judiciary and lately the Election Commission.


On behalf of UGC, the Central Board of Secondary Education announces holding of the National Eligibility Test (NET) on 08th July 2018 for determining the eligibility of Indian nationals for the Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor Both in Indian Universities and Colleges. CBSE will conduct NET in 84 subjects at 91 selected NET Examination Cities spread across the country.

The candidates who qualify for the award of Junior Research Fellowship are eligible to pursue research in the subject of their post-graduation or in a related subject and are also eligible for Assistant Professor. The universities, institutions, IITs and other national organizations may select the JRF awardees for whole time research work in accordance with the procedure prescribed by them. The award of JRF and Eligibility for Assistant Professor both OR Eligibility for Assistant Professor only will depend on the performance of the candidate in all three papers of NET. However, the candidates qualifying exclusively for Assistant Professor will not be considered for award of JRF.

The role of CBSE is only upto the conduct of NET Examination and declaration of result. The e-certificates to qualified candidate are issued by UGC- NET Bureau. So the candidates declared qualified in NET are informed to contact Head, UGC NET Bureau, University of Delhi, South Campus, Benito Juarez Marg , New Delhi, Pin Code-110021, Phone No. (011-24116316, 24115416, 24115419) .

It is notified that CBSE will conduct the next UGC-NET for Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor on 08th July, 2018 (Sunday). The candidates who desire to appear in the test may see the detailed notification available on the website http://cbsenet.nic.in.The candidates are required to apply online from 06th March, 2018. The last date for applying online is 12th April, 2018 and fee can be paid up to 13th April, 2018. The CBSE has decided to use Aadhaar authentication for the applicants at the time of submission of application form for UGC - NET (July) - 2018. The candidates may see the detail notification (Requirement of Aadhaar for NET July 2018) in this regard.

Council of Scientific & Industrial Research (CSIR), India, a premier national R&D organisation, is among the world's largest publicly funded R&D organisation. CSIR's pioneering sustained contribution to S&T human resource development is acclaimed nationally. Human Resource Development Group (HRDG), a division of CSIR realises this objective through various grants, fellowship schemes etc.

Human Resource Development Group has been contributing significantly towards producing an inquiring society and fast growing knowledge economy. These numerous schemes cover a wide range of scientists.

The University Grants Commission (U.G.C.), while prescribing the revised pay scale for teachers in colleges and in universities, in accordance with the Fourth Pay Commission, has prescribed that the person being appointed as Assistant Professor shall qualify for the new scales provided he/she clears, the Eligibility Test, to be conducted by the U.G.C., in addition to the minimum qualifications already prescribed. The U.G.C., accordingly conducts, the National Educational Tests (N.E.T.), for many subjects. The U.G.C. and the C.S.I.R.(Council for Scientific and Industrial Research) conduct combined tests for science subjects. The NET or the combined Tests enables the candidate to receive the Junior Research Fellowship (J.R.F.) of the U.G.C./C.S.I.R. and/or makes him/her eligible for being appointed as Assistant Professor. In view of the fact that the number of candidates who are required to be qualified for being appointed as Assistant Professors, under the new pay scales, is fairly large, the U.G.C. has authorised the State Governments or the State Agencies on behalf of the State Governments to conduct the State Eligibility Test(SET) for Assistant Professor, provided, the SET is duly accredited by the U.G.C.

STATE AGENCY:

In accordance with the guidelines of the U.G.C., the Government of Maharashtra, Higher & Technical Education & Employment Department by their Resolution No. UGC-1391/2066/VS-4 , dt: July, 14, 1994 have nominated the University of Pune as the State Agency for conducting the State Eligibility Test (SET) . The U.G.C. has accredited the SET examinations being held by the University of Pune as the State Agency of the Government of Maharashtra and at the Government of Goa.

ASSISTANT PROFESSOR:

It may further be specifically understood that such a candidate who qualifies the SET would only be held eligible for being appointed as Assistant Professor in University/ affiliated college, provided he/she fulfills other academic qualifications prescribed for Assistant Professor post by the U.G.C. and is selected by the respective Selection Committee. Unlike the NET/UGC-CSIR Combined Test the candidates who qualifies the SET is only eligible for being selected as Assistant Professor and not for the award of Junior Research Fellowship (JRF). As per UGC guidelines, after June 2002, SET qualified candidates shall be eligible to apply for the post of Assistant Professor only in the Universities/Colleges belonging to the same state whose SET Examination they have cleared.

The GRE® General Test gives you more opportunities for success.

Whether you are considering graduate school or business school, or still deciding what to do, you only need to take the one test accepted by thousands of graduate and business schools worldwide, the GRE® General Test. It is the only graduate-level admissions test that lets you skip questions and go back, change your answers and tackle the questions you want to answer first.

Plus, the GRE General Test provides the ScoreSelect® option, which means you can take a GRE test now or again in the future, and only send schools your best set of scores. Best of all, you have five years to decide how to use any of your scores.

Prepare with official test prep — including The Official Guide to the GRE® General Test, Third Edition and ScoreItNow!™ Online Writing Practice — all designed to help you do your best!

The TOEFL test is the most widely respected English-language test in the world, recognized by more than 10,000 colleges, universities and agencies in more than 130 countries, including Australia, Canada, the U.K. and the United States. Wherever you want to study, the TOEFL test can help you get there.

GELI Question Papers

"GELI Question Papers" at www.questionpapers.net.in intends to provide free learning tools to students who aspire to appear for various entrance examinations.

Being there in education coaching industry for more than 10 years had certainly helped me to realize the need of students, broadly the kind of study materials, guidelines and motivations that could help them to start their test/entrance preparation. Thus we have captured several approachable areas of learning beyond providing students with question papers of their official entrance.

Other than the question papers we have attempted to enrich this website with forum, web-links, exclusive articles, tips and tricks.



TOP CAREERS AND YOU

TCY stepped into the world of education in the year 1998 with a dream to help every learner become what they were born to be. From day one, TCYians have been restless. To this day, each one of us continues to be restless, aspiring to help students in every possible way to achieve their innate potential. We believe there should be no such thing as "square peg in a round hole". Over the years, TCY developed a unique combination of expertise in Data Science, Academic Research and Technology to help deliver personalised learning experiences for every learner.

An integrated back-end, where academics, technology, data science, and operations work in sync, ensures that every learning resource with the student is inter-twined with teaching resources available in TCY channels of delivery - enterprise or consumer. It has created unprecedented effectiveness in learning.

TCY today has a vast pool of online authors, editors, and quality controllers, bound by a dream and a passion to change the way the world learns. Students and academicians across the globe have increasingly evinced interest in TCY pedagogy. No wonder, millions of students, authors and academicians are directly/indirectly associated with us - and the numbers are increasing exponentially.

To put it succinctly, TCY is a group of eclectic, creative and missionary minds that are out to redefine education.

IndiaBIX.com

Welcome to IndiaBIX.com !

Here, you can read aptitude questions and answers for your interview and entrance exams preparation.

MPSC Simplified

Kundanmalake blog


●स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये..

https://goo.gl/nrJSGF

●लोकराज्य मासिके pdf मध्ये..

https://goo.gl/GtWZoc

●MPSC नोट्स pdf मध्ये..

https://goo.gl/GQZA2d

●योजना मासिके pdf मध्ये..

https://goo.gl/ivTG51

●MPSC ऑडियो नोट्स (MP3)..

https://goo.gl/YP91bS

●चालु घडामोडी मासिके pdf मध्ये..

https://goo.gl/qdaEjZ

●MPSC अभ्यासक्रम pdf मध्ये..

https://goo.gl/fpxsST

●YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..

https://goo.gl/QMddfX

●स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NIOS दिल्ली ची उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..

https://goo.gl/PRjH5H

●888 सामान्य ज्ञान वाचा....

https://goo.gl/siyP1W

●NCERT दिल्ली ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये...

https://goo.gl/Z2gDV8

●स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके यादी

https://goo.gl/cSWzRg

●विविध अहवाल pdf मध्ये...

https://goo.gl/R4ezzZ

●MPSC साठी उपयुक्त Android app ची माहिती...

https://goo.gl/9FHdD4

●स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या साठी उपयुक्त Telegram Channel ची माहिती..

https://goo.gl/EWVtvG

●MPSC साठी उपयुक्त Websites ची माहिती..

https://goo.gl/bFshkN

भाजी विक्रेतीची मुलगी एमपीएससीत सहावी; आता मंत्रालयात करणार काम

साताऱ्यातील स्नेहा म्हस्केची प्रेरणादायी संघर्षगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: April 24, 2018 06:24 PM | Updated: April 24, 2018 06:48 PM

सातारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर अनेकांनी यशाची शिखरे सर केली आहेत. मध्यंतरी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा साताऱ्यातील एक युवक मंत्रालयात अधिकारी झाला. त्या पाठोपाठ आता पितृछत्र हरपलेल्या अन् वेळप्रसंगी आईसोबत भाजीविक्री करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या स्नेहा मस्के या तरुणीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालणारी स्नेहा आता मंत्रालयात लिपिक म्हणून काम करणार आहे.


नववीत असतानाच २००२ मध्ये पितृछत्र हरपलेली स्रेहा विलास मस्के हिने मोठ्या जिद्दीनं हे यश संपादन केलं आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यानं स्नेहाची आई भाजी विकून घरचा उदरनिर्वाह चालवते. स्रेहानं एमएससीपर्यंतच शिक्षण झालं आहे. लहानपणापासूनच हुशार असलेल्या स्रेहाला अधिकारी व्हायची इच्छा होती. परंतु वडिलांच्या निधनाने ही इच्छा अपुरी राहते की काय? अशी भीती तिला वाटत होती. मात्र, आईच्या व भावंडांच्या पाठिंब्यावर तिनं हे यश संपादन केले आहे.


स्नेहाचा मोठा भाऊही यूपीएससीचा अभ्यास करत आहे. भावाच्या मार्गदर्शनाखाली तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी सुरू ठेवली. कधीकधी स्रेहासुद्धा आईसोबत भाजी विकायला जाते. एमएससी होऊनसुद्धा नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. मात्र ती काही मिळत नव्हती. मग मोठ्या भावानं एमपीएससीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि तिनं यशाला गवसणी घातली. आता ती मंत्रालयात लिपिक म्हणून काम करणार आहे. खडतर परिस्थितीवर मात्र करून स्नेहाने घेतलेली गननभरारी युवा पिढीला प्रेरणादायी अशीच आहे.


स्नेहानं मोठ्या जिद्दीनं यश मिळवताना स्वत:वर अनेक बंधनं घातली. तरुण पिढी मोबाईलचा अतिवापर करते, अशी तक्रार सगळीकडून होत असताना स्नेहा मात्र मोबाईल वापरत नाही. मात्र एवढ्याच यशावरच थांबायचं नाही, असा निर्धार स्नेहानं केला आहे. 'आईनं माझ्या शिक्षणावर खर्च केला. त्यामुळे मी यशाला गवसणी घातली. भावानं केलेलं मार्गदर्शनदेखील मोलाचं ठरलं. यापुढेही असाच अभ्यास करुन याहून मोठं यश मिळवण्याचा माझा निश्चय आहे,' अशा भावना स्नेहानं व्यक्त केल्या. स्नेहानं मिळवलेल्या यशाचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे.

विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक

म. टा प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजी घेण्यात येणार आहे; तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच 'टीईटी' ८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.


राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी इयत्ता चौथी, सातवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येते. या परीक्षेची जाहिरात साधारण सप्टेंबर महिन्यात काढण्यात येणार असून, परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे. राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी होणारी परीक्षा १, २ जूनला घेण्यात येणार आहे. डीटीएल आणि डीएलईडी ही परीक्षा १ जून ते १० जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. टायपिंग व शॉर्ट हॅन्ड परीक्षा ११ ते १५ जून दरम्यान होणार आहे. परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या इंग्रजी टायपिंग परीक्षा २५ ते ३० जून या कालावधीत तर मराठी टायपिंग आणि हिंदी टायपिंगची परीक्षा ३ ते ७ जुलै दरम्यान होईल. सरकारी संगणक टंकलेखन विशेष कौशल्य परीक्षा १२ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ४ नोव्हेंबर किंवा ११ नोव्हेंबर रोजी होईल, असे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा २ ते ९ डिसेंबर दरम्यान होईल. शॉर्ट हॅन्ड परीक्षा १० ते १४ डिसेंबर २०१८ दरम्यान होणार असून, त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा मराठी, इंग्रजी व हिंदी टायपिंगची परीक्षा होईल. संगणक विशेष कौशल्य परीक्षा २३ जानेवारी २०१९, शासकीय टंकलेखन स्पर्धा ५ फेब्रुवारी रोजी हेणार आहे. मात्र, हे वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये बदलही होऊ शकतो, असेही परिषदेकडून सांगण्यात आले.

या टीप्स तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करतील मदत

अनेकजण विचार करतात की, प्रयत्न करूनही मी यशस्वी का नाही होत. अशा वेळी या टीप्स तुम्हाला कामी येऊ शकतात.

Updated: Apr 22, 2018, 06:56 AM IST

मुंबई: यशस्वी जीवनासाठी आपल्यापैकी सर्वच जण प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण, यशस्वी जीवन म्हणजे तरी काय? तर, यशस्वी होणे म्हणजे आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अकाशाला मुळीच गवसणी घालावी लागत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाबोबत प्रामाणिक रहा आणि सातत्याने प्रयत्न करा. पण, यातही गंमत अशी की, अनेकजण विचार करतात की, प्रयत्न करूनही मी यशस्वी का नाही होत. अशा वेळी या टीप्स तुम्हाला कामी येऊ शकतात. म्हणूनच जाणून घ्या यशस्वी होण्यासाठी पूरक ठरणाकऱ्या या खास टीप्स..

  • अल्पसंतृष्ट राहू नका- अनेक लोकांना अल्पसंतृष्ट राहण्याची भारी हौस असते. हे लोक जे मीळाले आहे त्यात धन्यता मानतात. पण, इतक्याने तुमची स्वप्ने साकार होत नाहीत. त्यासाठी सतत आपली महत्वाकांक्षा वाढती ठेवायला हवी.

  • जो व्यक्ती आपल्या ध्येयाकडे न थांबता न थकता चालत राहतो त्याला आपले ध्येय कधीच दूर नसते. काहीही झाले तर हे लोक आपले ध्येय मिळवतातच मिळवातात.

  • जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कारणे सांगत बसू नका. कारणे तुम्हाला मागे खेचतील. मात्र, विचार तुम्हाला ध्येयाप्रती पोहोचण्यास मदत करते.

  • आपल्या आयुष्यात आलेले अपयश हेच सिद्ध करते की, आपण यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न केले नाहीत. म्हणूनच जीवनाला यशस्वीतेकडे न्यायचे असेल तर, जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. त्यांनी यशस्वी होण्यासाठी काय काम केले किंवा काय तरिखा वापरला याचा बारकाईने अभ्यास करा. जीवानात त्यांना करा करा किंवा न करा पण त्याचा अभ्यास नक्की करा ते तरीखे फॉलो करण्याचाही प्रयत्न करा.

  • कोणताही व्यक्ती एका रात्रीत यशस्वी होत नाही. त्यासाठी कष्ट आणि निष्टेचे खत घालावे लागते. हे सर्व करत असताना माणसाता आत्मविश्वास कामी येतो. ज्याच्या मनात आत्मविश्वास ठासून भरला आहे. त्याला कोणतेही काम अशक्य नसते. लाथ मारीण तेथे पाणी काढील अशी या लोकांची कार्यपद्धती असते. असा लोकांना यश लवकर भेटते.

  • जो व्याक्ती आयुष्यात आपल्या शरीराकडून नेहमीच योग्य कष्टाची अपेक्ष करतो, आपली शक्ती योग्य कारणासाठी खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. मात्र, जो व्याक्ती आपल्या शरीराकडून तशी आपेक्षा न ठेवता कामचुकारपणा, आळस, कंटाळा, पाट्या टाकण्याचे काम करतो तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

यशाचा मार्ग मार्गदर्शनातूनच!

आज एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते निश्‍चितपणे चांगले यश मिळवू शकतात.

आत्मविश्वास

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेत आपण उतरतो, तेव्हा स्वतःच्या क्षमतांबद्दल तुम्हाला पूर्ण आत्मविश्‍वास असायला हवा; मात्र हा आत्मविश्‍वास येण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमची क्षमता (Strength) माहिती असायला हवी आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्‍वास असायला हवा. म्हणजेच, ठरविलेले ध्येय तुम्ही सहज साध्य करू शकता. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या विद्यार्थीदशेतील एक आठवण आहे. परीक्षा दिली, निकालाचा दिवस होता. देशमुखांच्या आईला खात्री होती की ते प्रथम येणार, त्यांनी आईला विचारले, की मी जाऊन निकाल पाहतो. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तुला आत्मविश्‍वास नाही काय?’’ त्यावर सी. डी. देशमुख जे बोलले ते महत्त्वाचे होते, ते म्हणाले, ‘‘अगं, मी दुसरा क्रमांक कोणाचा आला आहे हे पाहायला चाललोय.’’ थोडक्‍यात असा आत्मविश्‍वास आपल्यामध्ये असायला हवा.

स्वयंधारणा

विद्यार्थी पदवीच्या वर्षाला असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती आपण गोळा करतो; मात्र विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल, तर तो सुरवातीलाच लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण कुठे असणार, असा प्रश्न स्वतःला विचारतो. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसमोर उगीचच एक न्यूनगंड उभा राहतो. रंग, उंची, देखणे व्यक्तिमत्त्व अशा बाबींवरून उगीचच चुकीची गृहिते मांडली जातात. ही आपल्यातील नकारात्मक धारणा अगोदर काढून टाकावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पहिले, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाकडे लाखोंचे सैन्य, मोठे साम्राज्य असल्याने आपला कसा टिकाव लागणार याचा कधीही विचार केला नाही. त्यांनी सकारात्मक धारणा जोपासून ध्येय गाठले. केवळ स्वतःच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतो, ही धारणा पक्की होती. म्हणूनच महाराजांना ते शक्‍य झाले.

Sakal Shiveri Foundation MPSC Exam Test Series

इच्छाशक्ती

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असण्याची गरज असते. कारण एका प्रयत्नामध्ये यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार थोडी असते. तसेच एका वेळेला लाखो विद्यार्थी आपल्याशी स्पर्धा करत असतात. दुबळी इच्छाशक्ती असणारी मने कायम कारणे देण्याच्या शोधात असतात व अशा स्पर्धेपासून ते पळ काढतात; मात्र प्रचंड इच्छाशक्ती असणारी माणसे आपल्या मनाला आपली उत्तुंग ध्येय साध्य करण्यासाठी प्रज्वलित ठेवत असतात. थॉमस अल्वा एडिसन यांनी इलेक्‍ट्रिक बल्बचा शोध लावण्यापूर्वी प्रथम त्यांनी एक हजारवेळा प्रयोग केले होते. ते अशा तारेच्या शोधात होते, की जी विद्युत प्रवाह धारण करू शकते व प्रकाशही देऊ शकते. अथक प्रयत्नांनंतर त्यांना यश प्राप्त झाले. कारण ध्येयप्राप्तीची त्यांची इच्छाशक्ती प्रचंड होती.

सातत्य

स्पर्धा परीक्षेचा कालावधी दीर्घ असतो. तीन टप्प्यांमधील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये आपण योग्य मार्गदर्शन घेतले, योग्य व पुरेशा पुस्तकांचे वाचन केले व परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने लेखन केले, तर आपल्याला प्रथम प्रयत्नामध्येही यश मिळू शकते.

यश

यश सर्वांनाच हवे असते; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली मेहनत, प्रयत्न झोकून देणे हे किती लोक करतात? तुमच्यामध्ये असलेले सर्वस्व ओतल्याशिवाय सर्वोत्तम यश मिळणार नाही. परीक्षेमध्ये यश मिळविणे ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा असते. जेवढे स्वप्न मोठे, तेवढी प्रेरणा मोठी, ताकद मोठी. काहीतरी वेड डोक्‍यात घेतलेली माणसेच आयुष्यात अवाढव्य करू शकतात. अशी वेडी माणसेच शेवटी शहाणी ठरतात, यशस्वी होतात, हेच इतिहास सांगतो. अमेरिकेतल्या प्रत्येक कुटुंबात एक तरी मोटार असेल, हे स्वप्न हेन्री फोर्डने बोलून दाखविल्यावर त्यांना वेडे ठरविले गेले होते; मात्र आज परिस्थिती काय आहे? म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर, परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित केल्यास स्पर्धा परीक्षेचे यश निश्‍चित मिळणे सहज शक्‍य आहे.

Sakal Shiveri Foundation MPSC Exam Test Series

लॅपटॉप व मोबाईलवर उपलब्ध!

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईलसाठी आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध आहे. अर्थात एका मोबाईल फोनलाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध आहे.

तंत्राची झलक यू-ट्यूबवरही

‘यू-ट्यूब’वर ‘शिवनेरी अकॅडमी नावाचे चॅनेल आहे. ‘शिवनेरी अकॅडमी’ (shivneri academy) असे सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.

माझे प्रयत्न; माझे यश

आव्हानांवर मात करत स्वप्नपूर्ती : राहूल पाटील

प्रत्येक व्यक्तीला वाटते, की आपण एका उच्चपदावर नोकरी करावी. त्या दृष्टीने ती व्यक्ती अथक परिश्रम घेत असते. अपेक्षित यश मिळविण्यासाठी प्रत्येकाला संकटांचा सामना करावाच लागतो. अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत शहरात ‘विक्रीकर निरीक्षक’पदी कार्यरत राहुल राजधर पाटील-सोनवणे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संबंधित पदावर रुजू होण्याचा आनंद असतानाच नशिबाने त्यांना पुन्हा आयुष्याची परीक्षा देण्यासही भाग पाडले; मात्र या स्थितीतही त्यांना आईने स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले. त्यामुळेच आज ते आपली स्वप्नपूर्ती यशस्वीपणे साकारत आहेत.

मूळ जवखेडा (ता. एरंडोल) येथील रहिवासी असलेले राहुल पाटील-सोनवणे यांनी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले असून, त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर पाटील यांनी अथक परिश्रमातून बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्यांनी शिकवणी घेणे सुरू केले. यातच त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजेच २०१०मध्ये राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणे सुरू केले. यात दोन वेळा ‘एसटीआय’ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले; मात्र मुख्य परीक्षेत अपयशी ठरले. या वेळी खचून न जाता त्यांनी २०१३मध्ये नव्याने ‘पीएसआय’ची परीक्षा दिली व ती उत्तीर्ण झाले; मात्र या वेळी त्यांनी या ठिकाणी रुजू न होता काही दिवसांची मुदत मागितली. दरम्यानच्या काळात पाटील यांनी पुन्हा अभ्यास केला. अखेर २०१३मध्ये त्यांनी ‘एसटीआय’ची (सेल्स टॅक्‍स इन्स्पेक्‍टर) पूर्व व मुख्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.

त्यांनी दिवस-रात्र विविध प्रकारची पुस्तके वाचून हे यश मिळविले. परीक्षा पास होऊन आता नोकरीत रुजू होणार, हा आनंद चेहऱ्यावर असतानाच त्यांच्यावर एक नवे संकट ओढवले. अचानक त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याची माहिती मिळाली. या वेळी खचून न जाता परिवाराने त्यांना साथ दिली व मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्या आई शोभा पाटील यांनी त्यांना स्वतःची किडनी देत जीवनदान दिले.

नव्या आयुष्याची सुरवात

आईने किडनी दिल्यानंतर राहुल यांनी नव्या आयुष्याची सुरवात केली. ते २०१४ मध्ये ‘विक्रीकर निरीक्षक’पदी जळगावात रुजू झाले. आज ते उच्च पदावर नोकरीस असले, तरी त्यांनी आपला अभ्यास सोडलेला नाही. नियमित अभ्यास करून ते आणखी उच्च पदावर नोकरी करण्यासाठी तितक्‍याच जिद्दीने तयार आहेत.

या गोष्टी विसरू नका

आता स्पर्धा परीक्षांचे यश तुमच्या हातात


पुणे - आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनने एक अभिनव संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेअंतर्गत घरबसल्या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. यासाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशन संयुक्त प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे या तयारीसाठी निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

पुणे - आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनने एक अभिनव संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेअंतर्गत घरबसल्या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. यासाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशन संयुक्त प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे या तयारीसाठी निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

प्रशासनात अधिकारी व्हायचंय किंवा गावपातळीवरील विविध अधिकारी पदांवर काम करण्याची इच्छा अनेक तरुणांची असते. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेसाठी राज्यभरातून दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी, तलाठी, वन कर्मचारी यांच्यापासून ते निमसरकारी महामंडळे किंवा स्वायत्त संस्थांच्या नोकऱ्यांच्या सरळ सेवा, तर केवळ पोलिस भरतीसाठी सात ते साडेसात लाख तरुण-तरुणी परीक्षा देतात. या परीक्षेच्या कोचिंग क्‍लाससाठी अनेक तरुण ग्रामीण भागाकडून शहराकडे धाव घेतात.

राज्यात मागील काही वर्षांत प्रशासनात प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंत्रालयीन सहायक, कर सहायक, फौजदार, लिपिक, तलाठी, पोलिस शिपाईपदापर्यंत चुरशीची स्पर्धा सुरू आहे. लाखो परीक्षार्थींच्या गर्दीतून यश आपल्या हातात मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचीही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; मात्र या संस्थांची संख्या शहरी व विकसित असलेल्या निमशहरी भागातच मर्यादित राहिली आहे. या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची आर्थिक क्षमता असलेल्यांना हा पर्याय सोपा वाटू लागतो; मात्र आवाक्‍याबाहेरच्या खर्चापुढे होऊन लाखो युवक या स्पर्धेसाठीच्या योग्य तयारीपासून मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत शिवनेरी फाउंडेशनने राज्यभरातील विविध जिल्ह्यांचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेचे अचूक मार्गदर्शन साहित्य उपलब्ध न झाल्याने यशाच्या स्पर्धेत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी फाउंडेशनने ‘व्हिडिओ लेक्‍चर्स डिजिटल नोट्‌स’ची निर्मिती केली. हे तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षेच्या युवकांच्या हातात आता मिळणार आहे. विशेष म्हणजे या डिजिटल नोट्‌स राज्यभरातील विविध आवृत्त्यांमधील सकाळ कार्यालयांतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

डिजिटल नोट्‌स

उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी या राज्यसेवा परीक्षेपासून तलाठी, वनसेवेची सरळ सेवा भरती ते पोलिस शिपाई, लिपिकापर्यंतच्या परीक्षेचा अभ्यासक्रम या नोट्‌समध्ये असेल.

साधारणतः फक्त २०० तासांचा अभ्यासक्रम. ज्याद्वारे तुम्हाला त्या-त्या स्पर्धा परीक्षेचे सर्व घटकांवरील परिपूर्ण साहित्य उपलब्ध होईल.

विविध परीक्षांमधील संपूर्ण अभ्यासक्रम संकल्पनांसह स्पष्ट करण्यात आल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण होण्यास मदत.

व्हिडिओ लेक्‍चर्समुळे व्हिज्युअलच्या आधारे संकल्पना समजण्यास सुलभ व पुन्हा पुन्हा समजावून घेणेही शक्‍य. त्यामुळे आत्मविश्वासातही वाढ होईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्याही हे तंत्रज्ञान आवाक्‍यात.

हे व्हिडिओ लेक्‍चर्स मोबाईलमधील मेमरी कार्ड तसेच पेनड्राइव्हमध्येही उपलब्ध.

याखेरीज या उपक्रमाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकावर स्वतंत्र व परिपूर्ण मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत उपलब्ध करून दिले जाणार.

सहभागी विद्यार्थ्यांची प्रत्येक परीक्षेच्या अगोदर सराव प्रश्नपत्रिकांच्या संचाद्वारे तयारी मॉक टेस्टचाही उपक्रम.

सहभागी विद्यार्थ्यांना चालू घडामोडींविषयी अद्ययावत माहिती देण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर प्रत्येक आठवड्यास माहिती दिली जाणार.

तज्ज्ञांच्या पुढाकारातून उपक्रम

सामाजिक बांधिलकी मानून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणात्मक विकासात योगदान देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, डॉ. चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, निवृत्त अपर जिल्हाधिकारी कुंडलिक कारकर, भिवाजी पराड, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ बाळासाहेब साकोरे, सुहास कोकाटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणार आहे.

कोणत्या परीक्षांच्या डिजिटल नोट्‌स असतील?

राज्यसेवा परीक्षा

फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा

एसटीआय (विक्रीकर निरीक्षक) परीक्षा

मंत्रालयीन सहायक (एएसओ) परीक्षा

कर सहायक (टॅक्‍स असि.) परीक्षा

तलाठी परीक्षा

लिपिक भरती परीक्षा

खात्यांतर्गत फौजदार परीक्षा

हे तंत्रज्ञान कोणा-कोणासाठी?

गृहिणी नोकरदार

पदवीधर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी.

परीक्षेच्या तयारीला सुरवात करणारे पदवी परीक्षेतील (बीए, बीकॉम, बीएस्सी) च्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी.

महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने

‘यू-ट्यूब’वर शिवनेरी अॅकॅडमीचे चॅनेल आहे. शिवनेरी अॅकॅडमी (shivneri academy) या नावाने सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सअॅप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.

  • नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७

  • (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता)

देशात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य ही महाराष्ट्राची ओळख. या राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, आयएसओ अशा प्रकारच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून लाखो तरुण बसतात. पदवीचा अभ्यासक्रम करतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामागे आयुष्यात मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न साकार करण्याची तीव्र इच्छा उमेदवारांना असते. समाजात मिळणारे मान, समाजसेवेची संधी ही कारणे यामागे आहेत.

पारंपरिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातून करिअर करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे, पालकांचीही तीच इच्छा असते. मात्र या विचारसरणीला छेद देत स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती यांकडे योग्य पर्याय म्हणून आजची पिढी पाहते. राज्यात लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी करतात, मात्र खोलवर विचार केल्यास करिअरचे पर्याय निवडताना त्यातील संधी व आव्हाने यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेच दिसते.

या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी पहिल्या अथवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतात. मात्र काही विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षे किंवा यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर येणारे दडपण, मित्र, आप्तेष्टांकडून केली जाणारी विचारणा, पुढच्या परीक्षेत नक्की यशस्वी होईल ही आशा आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यांमध्ये विद्यार्थी गुरफटत जातो.

‘शिवनेरी फाउंडेशन’ने राज्यातील अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. यामध्ये अनेक बाबी समोर आल्या. शहरी भागात जाऊन कोचिंग क्‍लासेस लावता येत नाहीत, अभ्यासाची साधने एका जागेवर न मिळाल्याने अनेकविध साहित्य अभ्यासावे लागते, खूप जास्त अभ्यासामुळे ताणही वाढतो.

घरबसल्या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकेल असे साहित्य उमेदवारांकडे नसते, हेही हे दिसून आले. त्यातून या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देऊन अभ्यासाचा आराखडा दिल्यास प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवाक्‍यातील गोष्ट आहे, ही बाब जाणून घेत ‘शिवनेरी फाउंडेशन’ने डिजिटल तंत्र तयार केले असून, ते राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे.

उमेदवारांना फायदेशीर ठरणाऱ्या या तंत्राची माहिती आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी कमी कालावधीत यशस्वी होणारे विद्यार्थी व माझ्यामध्ये नेमका फरक कोणता आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्‍यक आहे. कोणताही विद्यार्थी अठरा महिन्यांच्या कालावधीत सहजपणे चांगल्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकतो, हे आमचे मत आहे. अर्थात, हे कसे शक्‍य आहे? त्यासाठी काय करावे लागेल, हे प्रश्न आपोआप समोर येतील. त्यासाठी काही मुद्दे!

पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात कसे?

कमी कालावधीत उत्तीर्ण होणारे व अनेक वर्षे अभ्यास करूनही अपयश पदरी पडणारे विद्यार्थी यांच्यात अभ्यासाची नेमकी पद्धत व स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन हा फरक आहे. कमी प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी अभ्यासाच्या पद्धतीतील टप्पे समजावून घेतात, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाचे नेमकेपण समजून घेऊन परीक्षेविषयी सखोल व योग्य माहिती मिळवतात. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, प्रश्न नेमक्‍या कोणत्या पद्धतीने विचारले जात आहेत, मी कोणत्या पद्धतीने वाचन करायचे आहे, कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत, त्यासाठीचे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे लागेल याची माहिती ते घेतात. त्यांना अवांतर वाचन, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन व कात्रणे काढण्याची सवय असते. अभ्यासाची स्वतंत्र शैली म्हणून नियमितपणे गटचर्चा करतात. अभ्यासात नियमितपणा व सातत्य असते. प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण व नेमके वाचन करून ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतोय त्या घटकांची तयारी करतात. संबंधित घटकाच्या बाबतीतील अद्ययावत घटनांवर ते बारकाईने लक्ष देऊन नमूद करून घेतात.

मित्रांनो, अभ्यासक्रमाचे छोटे-छोटे टप्पे पाडणारे विद्यार्थी उदा. - अर्थशास्त्रामध्ये सहा घटक असतील, तर आज मी या पैकी कोणत्या घटकाची तयारी करणार आहे याचे नियोजन करतात. दररोज मी काय करणार, हे ठरवून छोटे टप्पे घेतात. ते पूर्ण करतात. त्यातून अभ्यासातही सातत्य राहते व ध्येयाकडील वाटचालीचे अंतर कमी होत जाते.

यश न मिळण्यामागे अभ्यासाचे निश्‍चित नियोजन नसणे, कोणती परीक्षा द्यायची आहे याबद्दल एकमत नसणे, राज्यसेवेची परीक्षा आली, की त्याचा अभ्यास, फौजदार, विक्रीकर निरीक्षक, सहायकांच्या जाहिराती आल्या, की पुन्हा त्या पदांच्या अभ्यासाला सुरवात अशा पद्धतीने यशही एकमताने मिळत नाही. परीक्षा आली, की १२ ते १५ तास अभ्यासामुळे आपण वर्षानुवर्षे परीक्षा देत राहतो. गाइडचा जास्तीत जास्त वापर करतो. प्रत्येकवेळी मी अभ्यास केला होता, मात्र पेपर अवघड होता, मेरिट जास्त लागले, अशी कारणे योग्य नाहीत. इतर विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना मला अपयश का येते, हे प्रामाणिकपणे तपासून आपण कोठे कमी पडतो याचे ठळक मूल्यमापन करावे आणि टाळण्याची सुरवात करावी.

सीइंग इज बिलिव्हिंग!

‘शिवनेरी फाउंडेशन’ने लाखो विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्यांना घरबसल्या, स्वतःची कामे सांभाळून, अगदी कोचिंग क्‍लासेसप्रमाणे तज्ज्ञांची व्हिडिओ लेक्‍चर्स उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याकडे ‘सीइंग इज बिलिव्हिंग’ अशी इंग्रजी म्हण आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याखेरीज त्याच्यावर विश्‍वास बसत नाही. अलीकडे व्हिज्युअल्स ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सर्व अभ्यासच मुळात कोणीतरी आपल्याला शिकवतो आहे, अशा दृष्टीनेच अभ्यासायचा अशी ही संकल्पना आहे. अपयशावर मात करण्यासाठी प्रेरणा द्यायची हीच ‘शिवनेरी’ची भावना आहे आणि आत्मविश्वासाने उभा राहणारा उमेदवार ही स्पर्धा परीक्षेतील नवी पिढी पाहायची आहे, म्हणूनच हा पत्रप्रपंच!

पुढील विषयासह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच!

डिजिटल तंत्राचे स्वरूप!

अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉईड मोबाईल फोन असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते मिळेल. एकाच मोबाईल फोनवर त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल.

तंत्राची झलक येथेही पाहता येईल...

‘यू-ट्यूब’वर शिवनेरी अॅकॅडमीचे चॅनेल आहे. शिवनेरी अॅकॅडमी (shivneri academy) या नावाने सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सअॅप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७ (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता)

----------------------------------------

माझे प्रयत्न; माझे यश स्वप्ने पाहा, धाडस करा : भाऊसाहेब ढोले

दुलेचांदगाव (ता. पाथर्डी) या खेड्यातून आलेल्या व ‘अधिकारीच होणार’ असा निर्धार केलेल्या आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणारे भाऊसाहेब कैलास ढोले आज नाशिक येथे पोलिस उपअधीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत.

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये ‘एमपीएससी’ परीक्षेबाबत भीती आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच या परीक्षेच्या अभ्यासाची सोय आहे, असाही एक गैरसमज आहे. हा गैरसमज ढोले यांनी पुसून काढला. आर्थिक परिस्थिती नसल्याने नगरमध्येच त्यांनी अभ्यासाला सुरवात केली. आपल्या या यशाबद्दल ढोले सांगतात, की प्राथमिक शिक्षण दुलेचांदगाव या छोट्याशा खेड्यात झाले. पुढील शिक्षण नगर येथे झाले. ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे ते चिरंजीव. घरातूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला.

जिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या एकाचा सत्काराचा कार्यक्रम गावाकडे होता. तेथे भाषण ऐकले आणि ‘मोठा अधिकारी व्हायचेच’ असा निर्धार केला. भाऊसाहेब म्हणाले, ‘‘संगणकशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर २०११पासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक पदावर महाड (जि. रायगड) येथे नियुक्ती मिळाली. मात्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करातच राहिलो. पहिल्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. आनंद गगनात मावत नव्हता.’’

‘पुण्यात नियुक्ती मिळाली, मात्र त्यात समाधानी नव्हतो. वरिष्ठ अधिकारी व्हायचे हेच स्वप्न होते. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे, तसेच यापूर्वीच्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास केल्यानेच हे यश मिळाले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल पाहता, ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. पुण्यात स्पर्धा परीक्षेचे वातावरण असल्याने निश्‍चित फायदा होतो, मात्र तशी संधी न मिळाल्यास खचून जाऊ नका. आपल्याकडे उपलब्ध साधनांचा उपयोग करून यशस्वी होता येते.

त्यासाठी ध्येय व आत्मविश्‍वास कायम ठेवा. संघर्षच प्रत्येकाला यशापर्यंत घेऊन जातो. त्यासाठी मोठी स्वप्ने पाहा. मी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार असून, ‘आयपीएस’ होण्याचे माझे स्वप्न आहे,’’ असा विश्‍वास ढोले यांनी व्यक्त केला.

ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...!

विद्यार्थ्याने ध्येय निश्‍चित केल्यावर त्याला यशापर्यंतची वाट दाखविता येते. यासाठी स्मार्ट वर्क महत्त्वाचे आहे. यशापर्यंत कसे मार्गक्रमण करायचे, हे लक्षात घेतले पाहिजे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता जवळ येतेय, या परीक्षेसाठी एकीकडे मनावर येणारा ताण व दुसरीकडे खुणावणाऱ्या यशामुळे वाढलेला उत्साह अशा दुहेरी भूमिकेत तुम्ही असालच. वर्षभर घेतलेले परिश्रम सिद्ध करण्याची ही संधी तुम्हाला खुणावतेय. अशा वेळी परीक्षेत उत्तीर्णच नव्हे, तर चांगल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारी सर्व कौशल्ये पणाला लावण्याची आता आवश्‍यकता आहे. इतरांना मागे टाकून पुढे जाण्याची चढाओढ तर प्रत्येकालाच असते, त्यालाच आपण स्मार्ट वर्क म्हणू शकतो. अर्थात, ज्या ध्येयप्राप्तीसाठी धडपड सुरू आहे, ते कसे आणि कोणते असावे? त्यात यशस्वी होण्याचे निकष या सर्वांसाठी एक नेमकेपणाचे उत्तर शिवनेरी फाउंडेशनने दिले आहे.

ध्येय निश्‍चित करा..

शिवनेरी फाउंडेशनने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला हव्या असलेल्या पदाचा परिपूर्ण अभ्यास करता यावा, नेमक्‍या विषयाचा अभ्यास करता यावा, यासाठी सर्व विषयांचा सर्वंकष आढावा घेऊन "एमपीएससी'तील राज्यसेवा पूर्व, पीएसआय, एसटीआय, एएसओ पूर्व, तसेच कर सहायक, तलाठी, लिपिक, फौजदार पदाच्या खात्याअंतर्गत परीक्षा या सर्व वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची रचना अगदी मुठीत मावेल अशा स्वरूपात केलेली आहे. तुम्ही परीक्षेतील यशासाठी सूक्ष्म अभ्यास करणार आहात ना? मग अभ्यास तो सूक्ष्मत्वाकडून तुम्हाला विश्‍वव्यापी प्रेरित करून टाकणारा ठरेल, असाच समाविष्ट केलेला आहे.

स्मार्ट वर्क

विद्यार्थ्यांचे "स्मार्ट वर्क' यातून कसे होणार आहे, हे आपण समजावून घेऊ या. "स्मार्ट' या पाच अक्षरांचा मी लावलेला अर्थ म्हणजे हाताचा पंजा. पंजा झाकल्यानंतर त्यामध्ये मुठीची ताकद येते. त्याचप्रमाणे स्मार्ट वर्क असल्यास आपण इतरांच्या पुढे एक पाऊल असतो हे निश्‍चित. आपले ध्येय पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे हे असेल आणि त्यात अपेक्षेपेक्षा जागा कमी असतील, तर तुमचे स्मार्ट वर्क हवेच. शिवनेरी फाउंडेशनने अभ्यासक्रम निर्माण करताना यातील स्मार्टमधील "एस' या अक्षराकडे पाहताना अभ्यासक्रमातील नेमकेपणा दर्शविला जातो. ध्येयामधील नेमकेपणा साध्य करण्यासाठी अभ्यासामध्येही नेमकेपणा असायला हवा. आपल्याला नेमका काय अभ्यास करायचाय, यासाठी नेमकी कोणती साधनसामग्री आवश्‍यक आहे. याची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्याला असणे आवश्‍यक आहे. यशस्वी होण्यासाठी कोणतीही संदिग्धता नसणे आवश्‍यक असते. यासाठी शिवनेरी फाउंडेशनने वेगवेगळ्या विषयांमधील अभ्यासक्रमाची रचना करताना अगदी सखोलपणे विद्यार्थ्याला प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटकाची वेगवेगळ्या पुस्तकामधील अगदी सखोल माहिती व्हिडिओ लेक्‍चर्स व डिजिटल नोट्‌सच्या स्वरूपात दिलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधील संदिग्धता कमी होऊन विद्यार्थ्याला नेमका अभ्यास करणे सहजपणे शक्‍य होणार आहे. निश्‍चित अभ्यासाची दिशा सापडली तर यशप्राप्तीचा मार्ग साध्य करता येईल व आपली पावले ध्येयप्रप्तीच्या दिशेने पडू लागतील.

स्मार्टमध्ये दुसरे अक्षर "एम' म्हणजेच "मिजरेबल' असे आम्ही मानतो. थोडक्‍यात, ध्येयाचे मापन करणारा असा याचा अर्थ. ध्येयाचे मापन करताना तुम्हाला ध्येयाचे म्हणजेच अभ्यासाचे वेगवेगळे टप्पे आखता आले पाहिजेत. अभ्यासामध्ये नेमकेपणा असल्याशिवाय अभ्यासाचे मोजमाप करता येणे अशक्‍य आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल मला मेरिटमध्ये यायचे आहे; पण ध्येयामध्ये नेमकेपणा नसेल तर यशप्राप्ती होणे अवघड आहे. ध्येयाचे मापन करता येण्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची रचना शिवनेरी फाउंडेशनने तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे, यावरून आपल्या लक्षात येईल, की माझा अभ्यास नेमका कितपत पूर्ण झालेला आहे. यामुळे ध्येयाच्या प्रवासात आपण नेमके कुठपर्यंत पोचलेलो आहोत व अजून किती अंतर कापायचे आहे हे लक्षात येईल.

स्मार्टमधील मधील तिसरे "ए' हे अक्षर ऍचिव्हेबल म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी सामान्य विद्यार्थ्यालाही समजेल व पुन्हा-पुन्हा अभ्यासक्रमाची उजळणी करता येईल अशा सोप्या पद्धतीने रचना केलेली आहे. अगदी मूलभूत संकल्पनांसह सर्व विषय समजावून सांगितले आहेत. याशिवाय अभ्यासक्रमाचे किट विकत घेणाऱ्या विद्यार्थ्याला पुढील दीड वर्ष अद्ययावत घटना व सरावासाठी विविध प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याने एखादा प्रश्‍न व्हॉटसऍप किंवा ई-मेलच्या माध्यमातून विचारल्यास त्याला 24 तासांच्या आत स्पष्टीकरणासह उत्तर पुरविले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्याची संपूर्ण तयारी त्याच्या गावामध्येच होणार असल्याने विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षापासून अभ्यास करणे सहज शक्‍य होणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याजोगे असणार आहे हे नक्की.

स्मार्टमधील चौथे "आर' हे अक्षर रिअलॅस्टिक म्हणजे या अभ्यासक्रमामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय वास्तवात आणणारे आहे. ध्येयनिश्‍चिती व ध्येयप्राप्तीसाठी आपल्याकडे अभ्यासक्रमाचे साहित्य कितपत योग्य किंवा अयोग्य आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्‍यक असते. आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवांची जाणीव असणे आवश्‍यक असते. स्वतःची मते कायम ठेवून अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पाडून घेण्यात मुळीच शहाणपणा नसतो. 2 ते 3 वर्षे सातत्याने अपयश पदरी येत असेल तर निराशावाद वाढण्याचा धोका असतो. यामुळे आपण करत असलेला अभ्यास व व्हिडिओ लेक्‍चर्स तपासून पाहावीत. यासाठी आपण "यू ट्यूब'वर "शिवनेरी ऍकॅडमी' सर्च केल्यास त्यातील व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले तरी आपल्याला त्यातील सखोलता लक्षात येईल व अभ्यासाची दिशा स्पष्ट होईल. वरील सर्व परीक्षांचा सर्व अभ्यासक्रम पेनड्राइव्ह व मेमरी कार्डच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय वास्तवात येणार आहे. यासाठी स्मार्टमधील "टी' म्हणजे टाइमबॉन्ड या अर्थाने वेळेत हा अभ्यास पूर्ण करता येईल. कमी वेळेत अभ्यास परिपूर्ण होईल व कालमर्यादेमुळे मनामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होईल. अशा प्रकारे संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना शिवनेरी फाउंडेशनच्या अभ्यासक्रमात आहे, ती विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही तपासून पाहावी व खरेदी करावी. आज दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालक हजारो रुपये खर्च करताना दिसतात, त्यामुळे आयुष्यामध्ये आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वत:चे करिअर घडविण्यासाठी 10 ते 12 हजार रुपये जास्त नाहीत असे मला तरी वाटते.

स्वयंअध्ययनातून अधिकारीपदाला गवसणी....!

इंदापूर तालुक्‍यातील बोरी येथील महेश ज्ञानेश्वर लेंढे याने नुकतीच उत्पादन शुल्क निरीक्षकपदाला गवसणी घातली. अर्थात, तो यावर थांबलेला नाही. त्याच्या अजून तीन पदांच्या मुलाखती व्हायच्या आहेत. जिल्हाधिकारी व्हायचे या ध्येयाने त्याची वाटचाल सुरू आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांना हुरूप देणारी ही घटना अशासाठी, की एका साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा असलेला महेश याने कोणतीही अतिरिक्त किंवा शहरांमधील शिकवणी लावलेली नव्हती. स्वयंअध्ययनातून त्याने ही कामगिरी केली. महेशने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर, त्याने पुढे काय करावे हा त्याचा प्रश्‍न त्याच्यावरच कुटुंबीयांनी सोपवला. मात्र, आपण प्रशासकीय सेवेतच जाणार असल्याचे महेशने वडील ज्ञानेश्वर यांना सांगितले आणि त्याने अभ्यासाला सुरवात केली. दोन-तीन वेळा यशाने हुलकावणीही दिली; परंतु खचून न जाता, तसेच शहरामध्ये न जाता त्याने घरी बसूनच अभ्यासाचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही ठरवून दाखविला. महेश सांगतो, "मला अजून यशाचे शिखर गाठायचे आहे. मी थांबणार नाही. मात्र, ज्या पदाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करता येऊ शकेल, असे प्रशासकीय पद मिळविण्यासाठी मी अजूनही अशाच पद्धतीने अभ्यास करतोय. स्वतःचा अभ्यास मला वाटेल तिथे बसून करता यावा ही माझी धारणा असून, त्यात मी यशस्वीही झालो आहे. यापुढील अभ्यासाची पद्धतही हीच राहील. मला खात्री आहे, की येणाऱ्या काळात मी ध्येयप्राप्ती नक्कीच करेन.''

परीक्षेसाठी सज्ज व्हा...!

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि वेळेत अभ्यासाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते वरदानच ठरते.

मित्रांनो, प्रशासकीय सेवेत जायचेय, समाजसेवा, प्रतिष्ठा आणि कौशल्य यासाठी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना हे वर्ष महत्त्वाचे आहे. एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक, फौजदार, सहायक पदापासून राज्यसेवेच्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी पदापर्यंतच्या सर्वच पदांना गवसणी घालायची आहे, अशी इच्छा मनोमन बाळगून राज्यातील 90 टक्के ग्रामीण भागातील उमेदवार सध्या तयारी करीत आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे; पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. क्‍लासेसमध्ये आर्थिक कारणांमुळे आणि गावाकडील स्थितीमुळे प्रवेश घेता येत नाही, अशी स्थिती असलेल्या उमेदवारांसाठी काही महिन्यांपासून शिवनेरी फाउंडेशनने विद्यार्थिप्रिय "स्मार्ट किट' महाराष्ट्रात उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या काही दिवसांत यूट्यूब चॅनेलवर केली जात असलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष "एमपीएससी स्मार्ट किट' घेण्याकडे वाढलेला कल लक्षात घेता सांगण्यास आनंद वाटतो, की अनेक उमेदवारांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये शिवनेरी ऍकॅडमीने केलेली अभ्यासाची सरळ साधी रचना यामुळे उमेदवारांचाही विश्‍वास बळकट झालेला आणि मी या अभ्यासक्रमाच्या मदतीने माझे स्वप्न पूर्ण करू शकतो, हा आलेला आत्मविश्‍वास आमच्यासाठीही खूप महत्त्वाचा संदेश बनला आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवनेरीच्या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे, जे यापूर्वी उमेदवारांना कोठेही मिळालेले नाही. यामध्ये सर्व विषय समाविष्ट आहेत. प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आले आहेत. अनेक मुद्दे यापूर्वी वाचण्यात आलेले नव्हते, असेही असल्याने हा अभ्यासक्रम जणू वरदान ठरल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले.

हे खरेच आहे, की शिवनेरीच्या स्मार्ट किटच्या माध्यमातून तुम्ही यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकता व अभ्यास करू शकता, त्यामुळे आर्थिक कारण किंवा वेळेचा प्रश्‍न आणि ज्यांना बाहेर पडता येणार नाही, घरीच अभ्यास करणे सयुक्तिक होणार आहे, अशांना समोर ठेवूनच या अभ्यासक्रमाची निर्मिती केली, ती फलश्रुत झाली असे वाटते.

शिवनेरी फाउंडेशनने मुळात हा अभ्यासक्रम तयार करतानाच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा, विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण, निमशहरी भागांचा विचार करून सद्यःस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या अडचणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील यावर बारकाईने सर्वेक्षण केले. अत्यंत किफायतशीर दरात कोठेही, कधीही अभ्यास करता येईल, असे साधन तयार केले. अगदी गृहिणी, नोकरदारांसाठीही हे साधन खूप महत्त्वाचे ठरले. आज शहरांमध्ये ऍकॅडमिक व क्‍लासेसमध्ये सहभागी होणारे उमेदवार वगळता महाराष्ट्रात 90 टक्के असे विद्यार्थी आहेत, ज्यांना अशाच साधनांची गरज होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली.

शिवनेरीने काय उपलब्ध करून दिले?

1. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-1 व पेपर-2. (सर्व विषय)

2. पीएसआय/एसटीआय/एएसओ पूर्व परीक्षा. (सर्व विषय)

3. पीएसआय/एसटीआय/एएसओ मुख्य परीक्षा. (मराठी व इंग्रजी व्याकरण)

4. तलाठी परीक्षा. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण)

5. टॅक्‍स असिस्टंट. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण)

6. खात्यांतर्गत फौजदार परीक्षा. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण)

7. क्‍लेरिकल परीक्षा (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण)

8. पोलिस भरती. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी)

पीएसआय/एसटीआय/एएसओ पूर्व परीक्षा. (सर्व विषय)

1. भूगोल (महाराष्ट्र, भारत व जग)

2. इतिहास (महाराष्ट्र : प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक. आधुनिक भारत)

3. सामान्य विज्ञान (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र)

4. भारताची राजकीय व्यवस्था.

5. अर्थशास्त्र.

6. बौद्धिक चाचणी.

7. अंकगणित.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे सर्व घटकावरील संपूर्ण संकल्पना समजावून देण्यासाठी व्हिडिओ लेक्‍चर्स, डिजिटल नोटसच्या स्वरूपात सर्व घटकांवरील परिपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हे सर्व व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना मोबाईल तसेच लॅपटॉप व कॉम्प्युटरवर म्हणजे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांनुसार पाहता येतात. यामध्ये 200 तासांचा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. अर्थात त्या-त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार तासांचा कालावधी कमी जास्त नमूद केलेला आहे. यामध्ये विविध परीक्षांमधील सर्व अभ्यासक्रम संकल्पनांसह समजावून सांगण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो.

विचार करा मित्रांनो, व्हिडिओ लेक्‍चर्स म्हणजे दृकश्राव्य पद्धतीसाठी सर्व घटकांची परिपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आज आपण लाखो रुपये देतो. तरीही सर्वसमावेशक संपूर्ण माहिती उपलब्ध होईलच याची खात्री नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवनेरीच्या "एमपीएससी स्मार्ट किट'मुळे स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक घटक विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा समजून घेणे शक्‍य होऊन संकल्पनाही स्पष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासामध्ये वाढ झाली आहे.

बरेच जण या स्मार्ट किटमुळे आत्मविश्वासपूर्ण अभ्यास करू लागले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आगामी स्पर्धा परीक्षा एक सुवर्णसंधी असल्याने ही संधी हातची जाऊ नये यासाठी आता जागे होण्याची, तयारीला लागण्याची व त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची काळाची गरज आहे. तुमची हीच गरज "शिवनेरीचे स्मार्ट किट' पूर्ण करेल यात शंकाच नाही, तेव्हा आता वेळ न दवडता शिवनेरीच्या स्मार्ट किट परिवारात सहभागी व्हा. जे आधीच आहेत, त्यांच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासाचे भागीदार तुम्हीही व्हा, एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो.

येत्या रविवारी होणार ऑनलाइन चाचणी!

शिवनेरी फाउंडेशन संपूर्ण राज्य स्तरावर राज्यसेवेचा पेपर एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर येत्या रविवारी (ता. 4 मार्च) ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरूनही देता येईल, फक्त ती ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करावा लागेल.

यामध्ये राज्यसेवेच्या पेपर-1 व 2 या दोन्ही पेपरची ऑनलाइन चाचणी यामध्ये घेतली जाणार आहे. पेपर-1 मध्ये सामान्य ज्ञानाचा भाग असून, यामध्ये 100 प्रश्‍न असतील आणि यास प्रत्येकी दोन गुण असतील. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर-1 मध्ये पुढील विषय समाविष्ट असतील. 1) भूगोल (महाराष्ट्र, भारत व जग), 2) इतिहास (महाराष्ट्र : प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक. आधुनिक भारत), 3) सामान्य विज्ञान (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र), 4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या योजना, 5) पर्यावरण शास्त्र व जग, 6) भारताची राजकीय व्यवस्था.

राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेतील पेपर-2 मध्ये 80 प्रश्‍न प्रत्येकी अडीच गुणांचे असतील. म्हणजे हा 200 गुणांचा पेपर असेल.

पेपर-2 मध्ये 1) आकलन, 2) निर्णय प्रक्रिया व समस्या निर्मूलन, 3) सामग्रीचे आकलन, 4) तर्कशुद्ध युक्तिवाद (बौद्धिक चाचणीमध्ये समाविष्ट), 5) बौद्धिक चाचणी, 6) अंकगणित हे विषय असतील.

दोन्ही पेपरमध्ये आयोगाप्रमाणे नकारात्मक गुणदान पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी गुगल क्रोम सुरू करून शिवनेरी पब्लिकेशनच्या www.shivneripublications.in या संकेतस्थळावर जाऊन "मॉक टेस्ट रजिस्ट्रेशन'वर क्‍लिक करावे. फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल व पत्ता बिनचूक भरावा. फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावा. परीक्षेची तारीख व वेळ ई-मेल, व्हॉटसऍपवरून पाठविला जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विविध सुविधा पुढील दोन वर्षे पुरविल्या जातील. याचे गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.

यशासाठी योग्य 'डावपेच' हवेत!

राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा...

एमपीएससीसाठी अभ्यास करताना जी ऊर्मी मनामध्ये असते, ती आपल्या आत्मविश्‍वासामधून व्यक्त होत असते. यशाची अपेक्षा करणारे आपल्यासारखे अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याची प्रामाणिक इच्छा असूनही, तळहातावर अपयश उतरताना आपण पाहत असतो. मित्रांनो, प्रकाशाचा एक किरणही अंधाराचा नाश करू शकतो; तसेच विद्यार्थ्यांकडे योग्य आत्मविश्‍वास, योग्य मार्गदर्शन, संकल्प, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी व आपण पाहिलेल्या ध्येयाविषयी कालमर्यादा अथवा वेळेचे बंधन असल्यास निश्‍चितपणे पहिल्या अथवा कमीत कमी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताच आले पाहिजे. आपल्याला नेमके काय करायचे आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती असावी, स्वतःच्या चुका दुरुस्त करता याव्यात व वेळेमध्येच त्यात कशी सुधारणा करता येईल हे ज्यास जमते, त्या विद्यार्थ्यांची नेमकी अभ्यासाची तयारी यशस्वीच झालेली दिसते. युद्धामध्ये जिंकण्यासाठी डावपेच व रणनीती आखावी लागते, तर प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी डावपेच व रणनीती आखावीच लागणार आहे. कारण हे आपल्या आयुष्याचे युद्ध आहे, याची मानसिकता तयार करावी लागेल. या परीक्षेत तुम्ही पास झाल्यास आयुष्यभर मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळणार आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून समाजासाठी काहीतरी करता आले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवल्यामुळे समाजाची सेवा करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र हे ध्येय गाठण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत. शिवाय स्वतःमधील उणिवा, गुणही समजावून घ्यावे लागणार आहेत व त्यावर उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत, हे प्रथम लक्षात घ्या.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचा कॉमन अभ्यासक्रम वेगवेगळा काढून घ्यावा. जे विषय अवघड वाटत असतील अशा विषयांकडे दुर्लक्ष न करता त्यांची जास्त तयारी करावी. प्रत्येक विषयामधील स्वतंत्र उपविषय बाजूला काढून स्वतंत्रपणे तयारी करणे आवश्‍यक ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपली तयारी जास्त सखोलपणे तयार करता येते. एखाद्या घटकाचा अभ्यास झालेला आहे, असे आपणास वाटत असल्यास अशा घटकावरचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी घ्यावेत. यावरून तो घटक आपणास कितपत समजला आहे हे लक्षात येईल. तुम्हाला प्रश्‍न 80 टक्‍क्‍यांपर्यंत सुटत असल्यास आपण योग्य मार्गावर आहोत, हे लक्षात घ्यावे. यामधून आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विविध घटकांवरचे प्रश्न सोडविताना परीक्षेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या या ठिकाणी आपल्याला समजतात.

परीक्षेमध्ये जागा किती आल्या, यापेक्षा मला किती मार्क मिळवायचे आहेत, याविषयी रणनीती व डावपेच आखता आल्यास निश्‍चितपणे जागांची संख्या कमी असो अथवा जास्त, आपल्याला यशस्वी होता येईल. उदा. या परीक्षेमध्ये मला 200 गुण मिळवायचे असल्यास नियोजन करावे लागेल. मग यामध्ये "सी-सॅट'चा पेपर महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये येणारे उतारे, याविषयी असणारे नियोजन, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताचा 23 प्रश्नांचा असणारा भाग व निर्णय क्षमतेचा महत्त्वाचा भाग यामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील, यावर नियोजन करावे लागणार आहे. नियोजन करताना प्रत्येक गुण मिळविण्यासाठी असणारे अभ्यासाचे डावपेच आखावे लागतील.

अशाच प्रकारे सर्व अभ्यासपद्धती विद्यार्थ्यांना सहजपणे समजावून घेता यावी यासाठी "सकाळ विद्या' व "शिवनेरी फाउंडेशन'मार्फत संपूर्ण राज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, पीएसआय, एएसओ, एसटीआय, खात्यांतर्गत फौजदार, करसहायक, अभियांत्रिकी परीक्षा, आरटीओ, लिपिक पदाच्या परीक्षांचा सुधारित अभ्यासक्रमासह तलाठी अशा पदांपर्यंत सर्व अभ्यासक्रमाचे तपशीलवार सखोल पद्धतीने प्रत्येक घटकाची तयारी करण्याचे "स्मार्ट किट" विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन, प्रत्येक घटकाची सखोल माहिती, व्हॉटस ऍप व ई-मेलच्या माध्यमातून अद्ययावत घटकांची संपूर्ण सखोल तयारी विद्यार्थ्यांची करवून घेतली जाणार आहे.

मित्रांनो, खूप कष्ट केले की फळ मिळते असे नाही, तर कष्टाला विचारांची गरज असावी लागते. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची साथ असावी लागते. जी मुले स्वप्न पाहतात, स्वप्नांवरती विचार करतात, विचारांना कृतीची जोड देतात त्यांना यश मिळते. कृती म्हणजे नुसती घोकंपट्टी किंवा कष्ट नव्हे, तर कृतीला योग्य मार्गदर्शनाची जोड असावी लागते. असे विद्यार्थी नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात पास होताना दिसतात. मला का अपयश येते आहे, हे समजावून घेताना आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवांचा किस काढून, उत्तराचा शोध घेणे आणि वेध घेणे म्हणजे यशस्वी मार्गाकडे जाण्याची वाटचाल असते आणि प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक व उपघटक यामधील संकल्पना मला कोणत्या पद्धतीने चांगल्या समजावून घेता येतील, प्रत्येक विषय समजावून घेताना यामध्ये माझी जमेची बाजू कोणती आहे, हे जाणून घेऊन अभ्यास करणे म्हणजे नेमके यशस्वी होणे असा याचा अर्थ आपल्याला लावता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे ताज्या घटना व बातम्या व्हॉट्‌सऍप व इ-मेलवर हव्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी 9421300010 या क्रमांकावर आपले मोबाईल क्रमांक एसएमएसद्वारे पाठवावेत. व्हॉट्‌सऍपसाठी 9960101122 या क्रमांकावर आपले नाव व नंबर पाठवावेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना जानेवारी 2017पासून फेब्रुवारी 2018पर्यंतच्या घटना पाठविण्यात येतील. या चळवळीचा आपणही एक भाग व्हावे व सर्वांच्या प्रयत्नातून अशा अभ्यासक्रमाची रचना आपण करू. त्यातून ग्रामीण भागातील अगदी वाड्यावस्त्यांवरील प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ घेता येईल.

इच्छाशक्तीच्या जोरावर अधिकारपदाला गवसणी

घरची परिस्थिती सामान्य असतानाही आपल्या इच्छाशक्‍तीच्या जोरावर पोवारटोला (ता. गोंदिया) या लहानशा गावातील युवकाने "एमपीएससी'ची परीक्षा अवघ्या तीन वर्षांत उत्तीर्ण होत मुख्याधिकारी पदावर पोचत आदर्श निर्माण केला. तालुका ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावरील पोवारटोला येथील सतीश चौधरी या युवकाने कठीण परिश्रम घेत राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.

सतीशचा आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार. वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा अदासी येथे झाले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण आमगाव येथील आदर्श विद्यालयात पूर्ण केल्यानंतर गोंदियातील एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. जिद्दीच्या बळावर व अभ्यास करण्याच्या इच्छाशक्‍तीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास व्हायचा ध्यास सतीश यांनी घेतला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर 2014मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या लेखी परीक्षेत सतीश उत्तीर्ण झाले, तर 2015मध्ये विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, दोन्ही वेळेस अंतिम परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर अमरावती येथील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचा क्रमांक लागला. तेथे वर्षभर कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला. ते 2016मध्ये राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात राहूनही प्रबळ इच्छाशक्‍ती व अभ्यास करण्याच्या जिद्दीने सतीश चौधरी राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात चार-पाच वर्षांआधी स्थानिक मार्गदर्शन मिळत नव्हते. आता अशा विविध मार्गदर्शन करणाऱ्या संस्था गोंदिया शहरात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. सातत्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास निश्‍चितच यश मिळू शकते, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी शिवनेरीचे ‘डिजिटल’ तंत्र!

पुणे - प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्चगुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या समीप नेणारे ठरणार आहे.

‘सकाळ विद्या’ व ‘शिवनेरी फाउंडेशन’च्या वतीने या उपक्रमाची सुरवात लवकरच संपूर्ण राज्यात होत आहे.

पुणे - प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्चगुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या समीप नेणारे ठरणार आहे.

‘सकाळ विद्या’ व ‘शिवनेरी फाउंडेशन’च्या वतीने या उपक्रमाची सुरवात लवकरच संपूर्ण राज्यात होत आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी राज्यातून दरवर्षी सात ते आठ लाख विद्यार्थी नशीब आजमावतात. त्यासाठी अपार मेहनत करण्याची तयारीही महाराष्ट्रातल्या उमेदवारांकडे आहे. शहरी भागातील विद्यार्थी कोचिंग क्‍लासेस, ॲकॅडमींचा आधार घेतात. मात्र गृहिणी, नोकरदार आणि ग्रामीण भागांतील उमेदवारांपुढे यश मिळवण्याचा प्रश्‍न नेहमीच उभा राहतो. अशा विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय सर्वेक्षण करून शिवनेरी फाउंडेशनने हे डिजिटल तंत्र विकसित केले आहे.

कशा आहेत डिजिटल नोट्‌स?

उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, फौजदार, कर सहायक, सहायक, लिपिक, तलाठी, पोलिस शिपाई ते वनसेवेच्या सरळ सेवा भरतीपर्यंत प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम या नोटसमध्ये असेल.

साधारणतः २०० तासांचा अभ्यासक्रम.

विविध परीक्षांमधील संपूर्ण अभ्यासक्रम.

उच्च दर्जाच्या दृकश्राव्यफितीतील व्याख्याने.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्याही हे तंत्रज्ञान आवाक्‍यात असणार.

दृकश्राव्य व्याख्याने मोबाईलमधील मेमरी कार्ड तसेच पेनड्राईव्हमध्येही उपलब्ध.

या परीक्षा असतील डिजिटल स्वरूपात !

राज्यसेवा परीक्षा ः फौजदार (पोलिस उपनिरीक्षक), एसटीआय (विक्रीकर निरीक्षक), मंत्रालयीन सहायक (एएसओ), कर सहायक (टॅक्‍स असि.), तलाठी, लिपिक भरती परीक्षांसह खात्यांतर्गत फौजदार परीक्षा.

हे तंत्रज्ञान कोणा-कोणासाठी?

गृहिणी, नोकरदार, पदवीधर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी.

अपयश दूर करा...आत्मविश्‍वासाने परिपूर्ण व्हा...

आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना घरबसल्या स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी कोचिंग क्‍लासेससारखीच करता येईल. उच्च दर्जा व गुणवत्तेचे व्हिडिओ लेक्‍चर्स युवक-युवतींना त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरही अभ्यासता येतील. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्रपणे ताज्या घडामोडी अखंडित उपलब्ध होतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच मॉक टेस्ट, प्रश्‍नपत्रिकांचा सराव करून घेतला जाईल. निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल.

शिवनेरी फाउंडेशनने ‘व्हिडिओ लेक्‍चर्स डिजिटल नोट्‌स’ची निर्मिती केली आहे. ‘सकाळ’च्या राज्यातील विविध आवृत्त्यांच्या कार्यालयांतून या डिजिटल नोट्‌स उपलब्ध होतील.


डिजिटल तंत्राला प्रतिसाद!

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी "स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. "स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करणे शक्‍य होणार आहे.

मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत पुण्यामधील गणेश कला क्रीडा सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा होता, योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांची स्थिती कशी होऊ शकते याचा! ते सांगत होते, ""काही काळापूर्वी पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर ठाकरे बाहेर पडताना एक विद्यार्थी त्यांच्या जवळ आला, अगदी पायांवर डोके ठेवले व सर हा माझा चौदावा प्रयत्न आहे, या प्रयत्नानंतर माझी वयाची मर्यादाही संपत आहे, या वेळी मी उत्तीर्ण झालो नाही, तर माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. विचारपूस करता, योग्य मार्गदर्शनाअभावी आजवरची वर्षे खर्ची गेली असे उत्तर मिळाले.''

ठाकरे सर सांगत होते आणि आमच्यासमोर महाराष्ट्रातील चित्र तरळले. याच चित्राचा मागील काही वर्षे अभ्यास करून शिवनेरी फाउंडेशनने विद्यार्थ्यांना योग्य व नेमके मार्गदर्शन अल्प किमतीत उपलब्ध करता येईल अशा अभ्यासक्रमाची रचना केली आणि अल्पावधीत त्याला प्रतिसादही मिळू लागला. आज महाराष्ट्रात जे स्पर्धा परीक्षेचे उमेदवार हे तंत्र वापरत आहेत, त्यांना पूर्ण विश्‍वास आला आहे, की हेच तंत्र आपल्याला यशाजवळ घेऊन जाऊ शकते. पेनड्राइव्ह व मेमरी कार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे यशच जणू त्यांच्या मुठीत उपलब्ध करून दिले. या M.P.S.C. smart किटच्या साह्याने अभ्यास करणाऱ्यांना विश्‍वास मिळतोय, की जे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत आहात व जी स्वप्ने त्यांच्याबद्दल कुटुंबीयांनी पाहिलेली आहेत, ती वेळेत होण्यासाठी हे तंत्र निश्‍चितच काम करते आहे याचा विश्‍वास त्यांनाही आलेला आहे. हे तंत्र अद्याप न स्वीकारलेल्यांनाही मी हेच सांगतो, की तुमचे यश तुम्हाला खुणावतेय, या क्षणाचे वेळीच साक्षीदार व्हा !

शिवनेरीच्या डिजिटल तंत्रात राज्यसेवा पूर्वपरीक्षा "पेपर 1' व "पेपर 2'मधील सर्व विषय, PSI/STI/ASO पूर्वपरीक्षा, तलाठी, Tax Asst, खात्यांतर्गत फौजदार परीक्षा, अशा वेगवेगळ्या परीक्षांची अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ लेक्‍चर्सची रचना केलेली आहे. त्याची गुणवत्ता समजून घ्यायची असल्यास "यू-ट्यूब'वर Shivneri Academy चॅनेल सर्च करावा. आपल्या अभ्यासामध्ये नेमकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय पुढील दीड वर्षे चालू घडामोडींचा पुरवठा, प्रश्‍नपत्रिकांचा पुरवठा होणार आहे, यातून निश्‍चितपणे अभ्यासामध्ये नेमकेपणा आल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपण संकल्प, समर्पणाची भावना, शिस्त पाळण्याची तयारी व वेळेचे बंधन याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. एकदा ध्येय निश्‍चित केल्यावर त्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे संकल्प! यशाचा योग्य दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला लागणारे इंधन म्हणून संकल्पाला ओळखले जाते, यालाच आपण इंग्रजीमध्ये Determination असे म्हणतो. ठरलेले ध्येय गाठण्यासाठी जिद्द असल्यास यशाची शक्‍यता वाढते. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, आपण जे ध्येय ठरवितो याविषयी तुमच्या हृदयामध्ये उत्कट निष्ठा असली पाहिजे. क्षणिक निष्ठा ध्येय प्राप्तीत अडथळे निर्माण करते. संकल्प करून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयोगशीलता सर्वांत महत्त्वाची ठरते. प्रयोगशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची धडाडी, क्रिएटिव्हिटी! मिळालेल्या संधीचे सोने करण्याची व नव्या संधी शोधण्याची वृत्ती, तसेच आपल्यामधील उणिवा शोधून स्वतःच्या क्षमता सतत वाढवीत राहणे आवश्‍यक आहे व यामध्ये स्वतःशी स्पर्धा स्वतःशीच करत स्वतःच सर्वोत्तम गाठण्याचा प्रयत्न आपल्याला संकल्पामधूनच करता येणार आहे. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट करताना जोडीला विचार-आचार व कल्पकता असावी. एखादी संकल्पना मला समजत नसेल तर ती का समजत नाही, याचा विचार केला पाहिजे. फक्त हार्डवर्क नको, वर्क स्मार्ट असले पाहिजे. त्यामुळे अगदी पहिल्या प्रयत्नात व किमान दुसऱ्या तरी प्रयत्नात यशस्वी होणारे अनेक विद्यार्थी आपणास दिसतात. त्यांची अभ्यासपद्धती नेमकी "स्मार्ट' म्हणजे कशी असते व हे विद्यार्थी केलेला संकल्प कसे पूर्ण करतात, हे आपण समजून घेऊ.

अभ्यासाची "स्मार्ट' पद्धत ही नेमका अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावर नेमके कोणत्या पद्धतीने प्रश्‍न विचारले जात आहेत, हे समजून घेणे ही आहे. यातून अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. दुसरा मुद्दा हा योग्य साधनसामग्रीची निवड करावी. ही निवड केल्यानंतर प्रत्येक घटकाचे छोटे-छोटे टप्पे पाडून ते पूर्णत्वास न्यावेत. एखादा घटक पूर्ण झाला आहे, असे आपणास वाटत असल्यास अशा घटकावरचे जास्तीत जास्त प्रश्‍न सोडवावेत. ते येणाऱ्या नेमक्‍या अडचणी आपल्या लक्षात येतात आणि अभ्यास पूर्णत्वास जातो.

स्मार्ट अभ्यासासाठी "स्मार्ट किट...!'

होय, मी "शिवनेरी'चे स्मार्ट किट घेतलेय आणि या परिपूर्ण किटमुळे मी आहे समाधानी! राज्यसेवेमध्ये यशस्वी होण्याचे माझे स्वप्न आहे. पण आजवर योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते, कोचिंग क्‍लास लावण्याचाही निश्‍चय केला, पण आर्थिक कारणांमुळे मला प्रवेश घेता आला नाही. कॉलेज संपल्यानंतर खासगी आय. टी. सेक्‍टरमध्ये काम करण्यास सुरवात केली. याच वेळी माझ्याबरोबर काम करत असलेले दोन ते तीन मित्र व मी बॅंकिंग क्षेत्रामधल्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची घरीच सुरवात केली. हा अभ्यास सुरू असतानाच माझ्या एका मित्राची रेल्वेमध्ये, तर माझी संरक्षण क्षेत्रामध्ये निवड झाली. दरम्यानच्या काळात माझी इतर दोन ठिकाणीही निवड झालेली होती, पण आवड असल्यामुळे मी संरक्षण क्षेत्राचीच निवड केली. आता माझी सेल्स टॅक्‍स ऑफिसर होण्याची इच्छा आहे. पण मला वेळ काढून मार्गदर्शन वर्गामध्ये जाणे शक्‍य नाही. याचवेळी मी शिवनेरी ऍकॅडमीने तयार केलेल्या "एमपीएससी स्मार्ट किट'बद्दल ऐकले. थोडाही वेळ न घालवता मी त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर जाऊन व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले व त्याच दिवशी ते खरेदीही केले. मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो, की शिवनेरी ऍकॅडमीने ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे, ते पाहून व अभ्यासून मी पाहिलेले स्वप्न व माझा विश्‍वास बळकट झालेला आहे. या अभ्यासक्रमाच्या मदतीने मी पाहिलेले स्वप्न कोणताही मार्गदर्शन वर्ग न लावता पूर्ण करू शकतो. या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे व यामध्ये सर्व विषय शिकविण्यात आलेले आहेत, तसेच प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आलेला आहे. मला यामध्ये असेही काही मुद्दे मिळाले की जे मला यापूर्वी वाचण्यात आलेले नव्हते. "शिवनेरी' चे "एमपीएससी स्मार्ट किट' माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलेले आहे. मी यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकतो व अभ्यास करू शकतो. मी शिवनेरी ऍकॅडमी व "सकाळ विद्या' यांचा "एमपीएससी स्मार्ट किट' तयार केल्याबद्दल आभारी आहे. आर्थिक कारणांमुळे व अन्य काही कारणांमुळे मार्गदर्शन वर्गामध्ये जाता येत नसलेल्या विद्यार्थ्यांना हे किट वरदान ठरेल अशी मला खात्री आहे.

- युगुल पी नामपल्लीवार, डिफेन्स इस्टेट, नागपूर.

माझा प्रवास योग्य मार्गाने...

मी अनुभवातून सांगू शकतो, की "एमपीएससी' अथवा "यूपीएससी'सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ-पैसा-अनावश्‍यक श्रम यांची बचत करून यश संपादन करण्यासाठी एकमेव सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजेच सुहास कोकाटे यांची व्हिडिओ लेक्‍चर्स आहेत. याबद्दल आत्मविश्वासाने बोलण्याचे एकमेव कारण म्हणजेच मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मी मे 2017 मध्ये सरांकडून सर्व व्हिडिओ लेक्‍चर्सचा डेटा घेतला व त्यानंतर दिलेल्या "पीएसआय', "एसटीआय', "टॅक्‍स-असिस्टंट', "एमपीएससी क्‍लार्क' आदींच्या प्रिलिअम पास होऊन मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. मुख्य परीक्षेचा स्कोअर प्रत्येक ठिकाणी निवड होईल असाच आहे.

"शिवनेरी'ने दिलेल्या व्हिडिओ लेक्‍चर्सची खास वैशिष्ट्ये म्हणजे सर्व परीक्षाभिमुख घटकांचा समावेश. प्रत्येक घटकाचे परिपूर्ण व सखोल स्पष्टीकरण. घटकांच्या स्पष्टीकरणाची सोपी पद्धत, स्पष्टीकरणादरम्यान परीक्षेत येणाऱ्या घटकांवर जोर देऊन त्यांची पुनरावृत्ती करणे, सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजेच कोणताही रूम किंवा मेससारखा अनावश्‍यक खर्च न करताही घरीच पूर्ण तयारी करता येते. आजच्या काळात विद्यार्थ्यांना 80 ते 90 हजार रुपये खर्चूनही पदरी निराशाच पडणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला हा अपवाद आहे. "शिवनेरी'ने अतिशय अल्प किमतीत योग्य मार्गदर्शन केले आहे.

- विठ्ठल राजपूत, बुलडाणा.

यशस्वी होण्याचा मूलमंत्र 'वेळेचे बंधन!'

आपण "वेळ' पाळल्यास "वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे.

मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो. कोणतेही काम करताना ते वेळेत पूर्ण करता यावे, यासाठी त्या कामालाही वेळेचे बंधन असणे आवश्‍यक असते. कामाला वेळेचे बंधन घातल्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्मी व ऊर्जा मनात व शरीरात निर्माण होते. वेळेचे बंधन घालता न आल्यास कालावधी वाढत जातो. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत हा कालावधी वाढत जाऊन पाच ते दहा वर्षे झाल्यास आपोआपच नैराश्‍य येते. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी वेळेचे महत्त्व, त्याचे मूल्य जाणतात. अभ्यासक्रमात दिलेले विषय व अभ्यासातील सातत्य टिकवून व योग्य मार्गदर्शन मिळवून ध्येय वेळेत पूर्ण करतात. वेळ आपल्या हातून निसटून जाण्याची शक्‍यता आहे, याची जाणीव त्यांना असते. बेंजामिन फ्रॅंकलिनने वेळेबाबत खूप सुंदर मत व्यक्त केलेले आहे. त्यांच्या मते, "आज करता येण्यासारखे काम कधीही उद्यावर ढकलू नका.' यामुळे काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागतो. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताना किती कालावधी द्यायचा आहे, हे पक्के करणे आवश्‍यक ठरते.

स्वतःवर वेळेचे बंधन घाला...

एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे म्हटले जाते. एकाग्रता साधणे म्हणजे मन व शरीरावर नियंत्रण मिळवणे होय. मनाला शिस्त लावणे याचाही समावेश एकाग्रतेमध्ये होतो. अभ्यासाचे नियोजन करून, त्या नियोजनामध्ये सातत्य ठेवून ते पूर्ण करता यावे यासाठी मनाला शिस्त लावणे आवश्‍यक असते. अशा प्रकारे एकाग्रता राखता आल्यास ध्येय साध्य व्हायला वेळ लागत नाही. या ठिकाणी शिस्त लावणे म्हणजे "आपल्याला जे आवडते ते न करता, जे करणे गरजेचे आहे तेच करणे,' या अर्थाने त्याचा विचार केला जातो.

योग्य मार्गदर्शन

ध्येयाच्या दिशेने जाताना अचूक निर्णय घेणे आवश्‍यक असते. योग्य मार्गदर्शन म्हणजे फक्त पुस्तकांची माहिती घेणे अथवा कोणत्या पुस्तकातील कोणता भाग महत्त्वाचा आहे एवढेच नसून, त्या पुस्तकातील माहिती घेताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचे आहे ते वेळेत समजावून घेता आले पाहिजे. यानंतर नोट्‌स काढताना कोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे, एखादा मुद्दा अभ्यासताना तो चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून कसा समजावून घेतला पाहिजे, हे देखील समजणे महत्त्वाचे असते. एखादा घटक अभ्यासून पूर्ण झाला आहे असा आपला समज असल्यास त्या घटकावरचे जास्तीत जास्त प्रश्‍न सोडविताना कोणती काळजी घेतली पाहिजे, परीक्षेचा आधीचा सराव व प्रत्यक्ष परीक्षेमध्ये पेपर सोडविताना कोणते नियोजन करावे, अभ्यासक्रमातील सर्व घटक पूर्ण करता यावेत यासाठी अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे नियोजनाच्या मदतीने छोटे-छोटे टप्पे कसे पाडावेत व ते पूर्ण करीत मोठे ध्येय कसे साध्य करावे, अभ्यासातील सातत्य ठेवायचे म्हणजे नेमके काय करायचे, अभ्यासक्रमावरील प्रश्‍न सोडविताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात व त्यावरील उपाययोजना कोणत्या या सर्व गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारे सर्व घटकांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळाले तर निश्‍चितपणे ध्येयाकडे होणारा प्रवास योग्य दिशेने असेल यात शंकाच नाही.

बारामतीकर तुमचे अभिनंदन!

मागील आठवड्यात बारामतीतील (कै.) वसंतराव पवार नाट्यगृहात "शिवनेरी' व "सकाळ विद्या' यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची मॉक टेस्ट घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे गुण शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून कळविले जातील. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने राज्यभरात अशा मॉक टेस्ट सुरू आहेत. त्यामधून आणखी निवडक उमेदवारांची निवड केली जाईल.

अभ्यासात "स्मार्टपणा' महत्त्वाचा...!

राज्यसेवेमध्ये यशस्वी होण्याचे माझे स्वप्न आहे, मात्र आजवर योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. कोचिंग क्‍लास लावण्याचाही निश्‍चय केला, पण आर्थिक कारणांमुळे मला प्रवेश घेता आला नाही. कॉलेज संपल्यानंतर खासगी आयटी सेक्‍टरमध्ये काम करण्यास सुरवात केली. याच वेळी माझ्याबरोबर काम करत असलेले दोन ते तीन मित्र व मी बॅंकिंग क्षेत्रामधल्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची घरीच सुरवात केली. हा अभ्यास सुरू असतानाच माझा एक मित्र रेल्वेमध्ये सिलेक्‍ट झाला व माझी संरक्षण क्षेत्रामध्ये निवड झाली, दरम्यानच्या काळात माझी इतर दोन ठिकाणीही निवड झालेली होती, पण आवड असल्यामुळे मी संरक्षण क्षेत्राचीच निवड केली. आता माझी सेल्स टॅक्‍स ऑफिसर होण्याची इच्छा आहे, पण मला वेळ काढून मार्गदर्शन वर्गामध्ये जाणे शक्‍य नाही. याच वेळी मी शिवनेरी ऍकॅडमीने तयार केलेल्या "एमपीएससी स्मार्ट किट'बद्दल ऐकले. थोडाही वेळ न घालवता मी त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर जाऊन व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले व त्याच दिवशी ते खरेदीही केले. मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो, की शिवनेरी ऍकॅडमीने ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे ते पाहून व अभ्यासून मी पाहिलेले स्वप्न व माझा विश्‍वास बळकट झाला आहे. मी या अभ्यासक्रमाच्या मदतीने माझे स्वप्न कोणताही मार्गदर्शन वर्ग न लावता पूर्ण करू शकतो. या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे व यामध्ये सर्व विषय शिकवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आलेला आहे. मला काही मुद्दे असेही मिळाले, जे यापूर्वी माझ्या वाचण्यात आलेले नव्हते. शिवनेरीचे ही किट माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे. मी यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकतो व अभ्यास करू शकतो. मी "शिवनेरी ऍकॅडमी' व "सकाळ विद्या' यांचा किट तयार केल्याबद्दल आभारी आहे. जे विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे व इतर काही कारणांमुळे मार्गदर्शन वर्गामध्ये जाता येत नाही अशा विद्यार्थ्यांना हे किट वरदान ठरेल, अशी मला खात्री आहे.

- युगुल पी. नामपल्लीवार, डिफेन्स इस्टेट, नागपूर.

दहावी, बारावीत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन


सातारा - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण कमी आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवेसह विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा टक्‍का कमी आहे. तो वाढविण्यासाठी शालेय वयात दहावी, बारावीमध्येच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

सातारा - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण कमी आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवेसह विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा टक्‍का कमी आहे. तो वाढविण्यासाठी शालेय वयात दहावी, बारावीमध्येच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

सनदी परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने अ. ल. बोंगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नागरी सेवा परीक्षांबाबत महाराष्ट्रातील मुलांना असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठीण्यपातळी व माध्यमाबाबतचा गैरसमज, परीक्षेतून मिळणाऱ्या यशप्राप्तीनंतर लाभणाऱ्या संधी याबाबतच्या माहितीचा अभाव या बाबी निदर्शनास आणून दिल्या. त्या अनुषंगाने शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांच्या माहिती विद्यार्थ्यांना व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील झाला आहे. इयत्ता दहावी व बारावीत मुलांना स्पर्धाचे परीक्षांची माहिती देण्याबाबत पाच ऑक्‍टोबरला शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे.

‘कॅच देम यंग’ या सूत्राप्रमाणे दहावी व बारावीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती देण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालकांनी माहिती संकलित करावी. ‘यशदा’, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन घेण्यात यावे, जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या इयत्तांत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व पालकांचे दोन दिवसांचे शिबिर घ्यावे. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. नागरी सेवा परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आयोजित करावे. आयएएस, आयपीएस याशिवायही शासकीय सेवांकरिता होणाऱ्या निवडींची माहिती द्यावी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी केल्याने आपोआपच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचीही तयारी होणार आहे.

वृत्तपत्र वाचनासही प्रोत्साहन

स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्‍त ठरणारी इंटरनेटवरील माहिती व वृत्तपत्रांचे वाचन वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात यावे. परीक्षांची तोंड ओळख करून देण्यासाठी या परीक्षांची माहितीही पाठ्यपुस्तकांत देण्यात येणार आहे, तसेच शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र स्थापन करावेत, या संबंधीचा अध्यादेश उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढला आहे.