अलीकडे खरोखरच वाचन हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे. या वास्तवाचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची मनापासून आवड व गोडी निर्माण व्हावी तसेच ग्रंथालय सेवा सुविधांचा अधिकाधिक वापर व्हावा या हेतूने ग्रंथालयाकडून मागील तीन वर्षापासून काही निकषांच्या आधारे ‘Best Library User Award’ या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यासाठी विद्यार्थ्यानी संपूर्ण वर्षभरात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त वाचलेली एकूण अवांतर पुस्तके व त्यांचे पुस्तक परीक्षण याशिवाय ग्रंथालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग, मिळविलेले प्राविण्य व त्यांचे एकूणच ग्रंथालयाप्रती समर्पण गृहीत धरून हा पुरस्कार दिला जातो.. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षाकरिता तीन विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची अनुक्रमे पहिली, दुसरी व तिसरी मानकरी ठरली ती तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थीनी कु. वेदिका सुनीलदत्ता राजवाडे. (TYBCOM), दुसरी मानकरी ठरली ती द्वितीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थीनी कु. नेहा विजय सावंत. (SYBSC) व तिसरी मानकरी ठरली ती द्वितीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थीनी कु. श्वेता सुनील जाधव॰ (SYBCOM) या तिन्ही विद्यार्थिनिना प्रमुख अतिथि मा. प्रकाशजी देशपांडे, अध्यक्ष -लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या हस्ते पुस्तक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कु. वेदिका सुनीलदत्ता राजवाडे. (TYBCOM
कु. नेहा विजय सावंत. (SYBSC)
कु. श्वेता सुनील जाधव॰ (SYBCOM)
प्रमुख अतिथि मा. प्रकाशजी देशपांडे यांचे स्वागत करताना संस्थाध्यक्ष मा. सदानंदजी भागवत
आजच्या युगामध्ये बी.ए./ बी.कॉम./बी.एस्सी. पदवी घेऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु सर्वांकरीता स्पर्धात्मक परीक्षा देणे अनिवार्य असते. विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांची कल्पना यावी याकरिता महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व ग्रंथालय विभागामार्फत दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी बहूपर्यायी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला एकूण ८४ विद्यार्थी बसले होते. या स्पर्धेमध्ये कु. रत्नदीप डावल (एस.वाय.बी.कॉम ), कु. विश्वजित मावलनकर (एफ.वाय.बी.एससी.-सी.एस) , कु. सुलोचना प्रभू (एम.एस.सी.- फिज़िक्स-I)., कु. मोहित तेंडोलकर (एफ.वाय.बी.एससी.-सी.एस), कु . चैतन्या भागवत (एस.वाय.बीएससी. ) यांनी अनुक्रमे पहिला, दूसरा, तिसरा व उत्तेजनार्थ असे क्रमांक प्राप्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नरेंद्र तेंडुलकर यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. चणय्या हिरेमठ, प्रा. विकास शृंगारे, प्रा.उदय भाट्ये, प्रा. हेमंत चव्हाण, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. धनंजय दळवी , ग्रंथालय सहाय्यक- स्वप्नील कांगणे, शिपाई अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.