Tomato Biryani

टोमॅटो बिर्याणी (?)

१ कप बासमती तांदूळ

१ कप पुदिन्याची पाने

२ कप टोमॅटोची प्युरी (मी घरी केली)

१-१.५ कप पाणी (लागेल तसे)

१ कप मटार

१ कप बटाट्याच्या फोडी

१/४ कप काजूचे काप (वगळण्यास हरकत नाही)

१/२ कप कांदा उभा पातळ कापून

१/२ कप नारळाचे दूध

१ टीस्पून तेल

प्रत्येकी २ मिरे, लवंगा, तमालपत्रे, वेलदोडे

१-२ चमचे काश्मिरी लाल तिखट

१.५ टीस्पून बिर्याणी मसाला

चिमुटभर हळद

चवीप्रमाणे मीठ

<img src="/files/u113/IMG_9107.JPG" width="600" height="428" alt="IMG_9107.JPG" />

तांदूळ धुवुन, निथळून अर्धा तास तरी ठेवावेत.

टोमॅटोची प्युरी करुन घ्यावी.

बटाटा कापून पाण्यात घालावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मिरे, लवंगा, तमालपत्र आणि वेलदोडे घालून एखादा मिनीट परतावे.

त्यात काजू घालून गुलबट रंगावर भाजून घ्यावेत. त्यावर कांदा खमंग परतून घ्यावा.

मटार आणि बटाट्याच्या फोडी घालून थोडे परतावे.

मीठ, तिखट, बिर्याणी मसाला घालून एकदा नीट मिसळून घ्यावे.

आता त्यात पुदिन्याची पाने घालून साधारण २-३ मिनीटे परतावे.

यात आता तांदूळ घालावेत हलक्या हाताने ३-४ मिनीटे परतावे.

टोमॅटो प्युरी आणि १ कप पाणी घालून बारीक गॅसवर भात शिजवावा. लागेल तसे पाणी घालावे.

भात शिजत आला की नारळाचे दूध घालून अगदी हलक्या हाताने मिसळावे. भात पूर्ण शिजला की एखाद्या लोणच्याबरोबर गट्टम करावा.

Tips -

एकदा सगळे परतून झाले की सगळे राईसकुकरमधे घालून भात शिजवता येतो.

अगदी बिर्याणीसारखा मोकळा किंवा खिचडीसारखा मऊ कसाही छान लागतो. जेवणासाठी येवढेच असेल तर ३ लोकांना नीट पुरेल आणि बाकीचे सर्व असेल तर ५-६ लोकांना नीट पुरेल.

माझ्या घरचे heirloom टोमॅटो सध्या भरपूर निघताहेत त्यामुळे मी ताजी प्युरी केली पण विकतची प्युरी एक-दीड कप वापरून करायला हरकत नाही.

बिर्याणी मसाला आणि पुदिना असल्याने आत्या त्याला बिर्याणी म्हणते. पण लेयर्स वगैरे काही नसतात त्यामुळे केले की खाल्ले असे होते :)