MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
It was very unfortunate to see so many deaths due to microorganism in 21st century. I remembered Plague epidemic and compare that generation with present one in terms of advances in technologies. But who will use it they are busy in procuring helicopters and fighting jets . Still time has not passed use this technology given below to rapid detection of this virus with fastest reliable and cost effective technology GENXPERT by Cephied company. Fortunately I had opportunity to work on it when I gave demonstration in Nair Hospital, Breach Candy Hospital, Hinduja Hospital etc. This is high time to use such technology if we can try to reach other planets why dont we take initiative to save our existing planet. What is the use of spending so much money on satellite mission when people are dying here. We must priortize this as national emergency. For more details contact me.
Email- mangeshmc@yahoo.com
Mobile- 8830290226
. महामारी तर कायम असते ,पण आपल्याला त्याची जाणीव नसते .
प्रत्येकदिवशी आपण मृत्यूच्या जवळ जात असतो. मृत्यू ह्या शब्दाचा उपयोग करताना आपण कचरतो , आपण म्हणतो स्वर्गवासी झाले . मृत्यू लहान मुलांना आपण दाखवत नाही. स्मशान गावाच्या बाहेर लपवून ठेवलेलं असतं . जीवनाचं सत्य मृत्यू आहे . स्मशान गावांच्या मध्यभगी असायला हवें ,मंडईत असायला हवे जे रोज येता - जाता दिसेल . कारण तेंव्हाच आपल्याला जीवनाचं सत्य आठवत राहील . महामारीमध्येच आपण जन्म घेतो ,आपण महामारीमद्धेच जगत असतो . आपण सगळे उपाय करून थकल्यावर शेवटी देवाकडे प्रार्थना करतो. देवाला या रांगेमध्ये सगळ्यात शेवटी उभे करतो . संत सांगतील पण आपण ऐकणार नाही . महामारी आली ,कंगाल झालो किंवा आपले प्रियजण वारले कि आपण देवाकडे जातो .अंधार झाल्यावरच प्रकाशाचं अस्तित्व जाणवतं . म्हणूनच म्हातारपणी लोकं देवाकडे जातात ,तरुणपणी स्वतःवर खूप विश्वास असतो ,आपल्या बुद्धीवर हातापायाच्या शक्तीवर खूप अहंकार असतो म्हणूनच रोज मंदिरात जात नाही . ज्याने जीवनाला समजले ,जो ध्यानस्थं झाला , तोच कुत्र्याचं मरण मरत नाही , नाहीतर बहुतेक लोकं कुत्र्याचं मरणच मरतात . आणि ९०% लोकं नरकातच जातात जे सगळ्यात महत्वाचे आहे तेच दिसत नाही . रोज जीवन हाताबाहेर जात असतं पण आपल्याला त्याची जाणीव नसते कारण आपण मृत्यूला खूप घाबरत असतो .गोष्ट आत्ताची नसतेच तिचं बीज कुठेतरी मागं असतं .आपल प्रत्येक कृत्य आपल्या भूतकाळाशी किंवा भविष्यकाळाशी निगडित असतं . धार्मिक व्यक्ती ज्योतीला देव मानतो मग ती कुठेही जळत असो,जैन मंदिरात असो किंवा गुरुद्वारामध्ये असो किंवा कोणत्याही शिवालयात असो त्याला त्यात देव दिसतो . तो भेदभाव करत नाही. भेदभाव करणं धार्मिक व्यक्तीचं लक्षण नसतं . हे अधार्मिक व्यक्तीचं लक्षण आहे .तुम्ही जे बघाल तुम्ही ते बनाल. द्रीष्टी एक दिवस तुमच्या जीवनाची सृष्टी बनून जाते . सगळे सिद्ध पुरुष, सगळे जागरूक पुरुष ,सगळे बुद्ध पुरुष या एकाच सत्याला उपलब्द झाले. देवांमध्ये भेदभाव करू नका. बुद्धिमान तो आहे जो अल्पसुख सोडून विराटसुख प्राप्त करतो . कष्ट होईल ,त्याग करावा लागेल, लोक वेडा म्हणतील पण महासुख प्राप्त होईल . सुख तर सगळ्यांनाच हवं असतं, पण दुसऱ्याच्या दुःखावर तुमचं सुख साधू नका ते टिकणार नाही . तुम्हाला त्याची किमंत कोणत्यातरी मार्गाने मोजावीच लागेल . जे दुःख तुम्ही दुसऱ्याला दिल आहे ते पण परत तुमच्याकडे येणार ,आणि जर सुख दिलं असेल तर ते हि परत येईल पण दोन्ही अनेकपटीने परत येईल. सुखी माणूस सुख देईल आणि दुखी माणूस दुःख देईल. सुख दिल तर सुख मिळणार . जिथं दुःखी केल्याशिवाय सुख मिळणारच नसेल तर तिथं जाऊच नका . हजार उपाय आहेत अस सुख मिळवण्याचे. बासरी वाजवून, , बुद्धीबळ कोडी सोडवून , ध्यान करून शाश्वत सुखासाठी क्षणभंगुर सुख सोडा . धन आणि ध्यान मध्ये ध्यानाला निवडा . गोष्टी एकमेकांशी निगडित असतात, त्यांना विस्तारित दृष्टिकोनातून बघा . मनावर ताबा मिळवा लक्ष्य नक्की मिळेल . मनच तुम्हाला ध्येयापासून विचलित करत असतं. मी मोहक दिसावं अशी इच्छा का होते कारण तुम्ही असा व्यक्ती शोधत असता , जो तुमच्यामध्ये उत्सुक होईल. दुसरा मला समजेल , दुसरा मला भेटेल,दुसरा माझ्यासाठी व्याकुळ होईल , माझा गुलाम बनेल हि वासनाच आहे . आणि वासना मोठं- मोठ्या शक्तिशाली व्यक्तींना गुलाम बनवते . मग असा गुलाम विवेकाने निर्णय घेत नाही मग त्याला जन्मदाते दिसत नाहीत, भाऊ बहीण दिसत नाहीत, गुरु दिसत नाही त्याला दिसते ती फक्त आणि फक्त वासना,मोह माया,स्पर्धा भौतिक सुखं मिळवण्याची ! समस्त प्राणीमात्रांवर, निसर्गावर प्रेम करा हाच तर देवाचा खरा अवतार आहे . जर विवेक टिकवायचा असेल तर मनावर ताबा मिळवायला हवा . स्वतःला ध्यानस्थ बनवून सत्कर्म करत असताना ,शरीर , मनाच्यावर ,निघून देवाशी स्वत;ला जोडा हि महामारी नक्की थांबेल ,अंतरी आणि बाहेर सुद्धा! व्यक्तींचे विचार आणि त्यांचे कर्म सर्व राष्ट्राचं भवितव्य ठरवत असतात . एक राष्ट्रं पूर्ण जगाचा समतोल बिघडवू शकते . म्हणून कृपा करून जबाबदारीने वागा .जगा आणि जगू द्या
How did I overcome Corona virus?: First of all when I realized the symptoms of corona in march 2020 when i had cold and difficulty in breathing. I decided to use the ayurvedic plus allopathic formula on daily basis which not only cure my symptoms but protected me from future reinfection from corona virus. If you are interested in knowing it, you can contact me on my email id and phone number.mangeshmc@yahoo.com, 8830290226