MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
नमस्कार
आपण पालक असाल, शिक्षक किंवा प्रशिक्षक असाल, तर आपल्याला हे सतत लक्षात ठेवायला हवे की आपल्यावर आपल्या व पुढच्या पूर्ण पिढीची जबाबदारी आहे. सर्वप्रथम आपण कसे जगायचं ते बघू नंतर आपल्या मुलांना कसं जगायला समर्थ बनवायचं तेही बघू. माझे अध्यात्मिक गुरु श्री सुधांशू महाराज सांगतात की सकाळी झोपेतून उठल्यावर एक प्रार्थना जरूर करावी. ती अशी : हे देवा मला एवढ जबाबदार आणि समजूतदार बनव की जर माझा संपर्क बेजबाबदार आणि असमंजस व्यक्तीशी आला तर माझ्या अंतरी असलेली समज, शांतता व शीतलता मी विसरणार नाही. कोणी कितीही चांगलं वाईट बोलू मी माझ्या ध्येयापासून आणि माझ्या गुरूने दिलेल्या शिकवणीपासून विचलित होणार नाही व तुझ्याशी स्वतःला सदैव जोडू शकेन. मी माझं स्वास्थ टिकवू शकेन. चेहऱ्यावर सदैव एक अकारण हास्य टिकवू शकेन. वादविवाद टाळू शकेन. वाणी सांभाळून वापरू शकेन. आणि आनंदात जीवन जगू शकेन. अशी प्रार्थना केल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे, अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. गुंतवणूक अशा ठिकाणी करावी की ती आपल्या वेळेवर आपल्या उपयोगि पडावी. पारिवारिक प्रसन्नता टिकून रहावी. रागाने संबंध तोडू नयेत. एकच गोष्टं परत परत बोलून मन तोडू नये. महिलांनी पतीचा व त्याच्या संपूर्ण परिवाराचा आदर व मान ठेवावा, मनपूर्वक सेवा करावी तसच पतिनेही पत्नीचा व खासकरून तिच्या आईवडिलांचा मान ठेवावा व प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीत तिच्या माहेरचा अपमान करू नये. पत्नी सगळं सहन करेल पण तिच्या आईवडिलांचा अपमान सहन करणार नाही. व त्याची शिक्षा तुम्हाला ती कळतनकळतपणे नक्की देयील. एकमेकांची नाती जपा. एकमेकांला सहन करायला शिका. आपला परिवार आनंदाने आणि सुखस्मृधीने भरून जाईल. सामाजिक प्रतिष्ठा जपा. देव आणि गुरुवर निष्ठा कायम ठेवा. आईवडिलांचा सदैव मान राखा. आपल्या पत्नीमुलांसमोर त्यांचा अपमान करू नका. आयुष्यभर टोचणी लागून राहील. प्रेमाने बोला त्यांच्याशी जरी त्यांनी तुम्हाला शिव्या काय! मारहाण केली तरीसुद्धा!. बाकी दुनिया खूप निर्दयी आहे ती समोर गोड बोलतील पण कठीणप्रसंगी म्हणतील की तो त्याच लायकीचा आहे. पण आईवडील मदत करतील अशावेळी. म्हणुन वेळ पडलीतर आपल्या आईवडिलांचे उपकार फेडण्यासाठी स्वतःच्या बायकापोरांचा त्याग करावा लागला तरी मागेपुढे पाहू नका. कारण त्यामुळे तुम्ही देवाच्या सहन्भूतीसाठी प्रेमासाठी पात्र ठरता. तुम्ही मुक्तीसाठी पात्र होता. अनेक जीवजंतू आहेत या सृष्टीमध्ये जे आपल्या पिल्लांना जन्मताच कठीण परिस्थितीमध्ये टाकतात. कारण कठीण परिस्थितीमध्ये जी तडफड होते तीच त्या पिल्लांचे पंख मजबूत करते. परंतु जर अशावेळी बाहेरून मदत मिळाली तर पंख मजबूत होत नाहीत. मोह, माया, ममता व आसक्तीचे गुलाम बनू नका. जे उच्च शिखर गाठण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे त्यासाठी गुणवत्ता मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. नियम बनवा, रोज नियमाच पालन करा, इच्छा तीव्र करा मग तो निश्चय मजबूत होईल मग त्यामागे स्वतःला झोकून दया. कालांतराने यश नक्की तुमच्या पदरी पडेल.
एक पुत्र व पुत्री म्हणुन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता आपण एक पालक, शिक्षक व प्रशिक्षक म्हणुन कसं जगायला हवं हे बघू. संतानी सांगितलंय: मुलांना प्रशिक्षण देत असताना त्यांचे हट्ट आणि मूड यांना प्रोस्त्साहन देवू नका. कारण जर मुलाला रडून काही मिळाले तर ते पुढच्यावेळी लोटांगण घालेल आणि तेही घरामधेच नाही तर जनमानसामध्ये, दुकानामध्ये, हॉटेलमध्ये आणि मग लोकं काय म्हणतील याचा विचार करून तुम्ही या मोह मायेचे, ममतेचे गुलाम बनाल व त्यांचे हट्ट पुरवाल. परंतु मोठ झाल्यानंतर तेच मुल अल्पवयात गाडीची चावी न विचारता घेऊन जाईल व जर अपघात झाला तर मुलाबरोबर पालकानाही तुरुंगवास भोगावा लागेल. ज्या पालकांची मुले स्वत; बिघडून समाजाला बिघडवतात त्याचं पाप त्या पालकांना सुद्धा लागतं आणि ज्या पालकांची मुलं लायक बनून समाज सुधरवण्याच काम करतात त्याचं पुण्य त्या पालकांना सुद्धा मिळत. म्हणूनच सुरवातीला मी म्हंटल की समाजाची पूर्ण पिढीची जबाबदारी आपल्यावर आहे. मोह ममतेमध्ये अडकलेले पालक आपल्या मुलांना कष्टाची सवय कधीच लावत नाहीत. मोह रडवणार!. ममता तडपवनारच!. म्हणुन रडू दया त्यांना. त्यांचे अश्रू त्यांनाच पुसू दया. लोकं जो त्यांच्या अहंकाराला दुखवून उभा राहण्याचा प्रयत्न करतो, पुढ जाण्याचा प्रयत्न करतो त्याची इर्षा करतात, त्याच्यावर हसतात, निंदा करतात. परंतु एक वेळ अशी येते की त्यांना असं म्हणावं लागतं की “खरंच याला मानलं पाहीजे.” याबरोबरच सुरवातीपासूनच त्यांना भक्ती, सेवा, दान, पुण्य मोठयांचा मान करायला शिकवले पाहजे. या लेखावर आपल्या प्रतिक्रिया खालील संपर्कावर जरूर कळवा. धन्यवाद!
मंगेश शिवराम चोरगे.
८८३०२९०२२६.
1) http://futuremakeinindia.blogspot.in/
2) https://mangeshcambridge.blogspot.com/b/post-preview?token=OGg831sBAAA.Ipb1JA90YhCx-iT4lRtAQJJmiMc0ibPVw3vIhsFBK95xg9vYb4PUJhuTgvoXhGPV3gkHvF77yuN6-KcQzNzoog.JEGZ-O6z_dDImOYdRmU0CA&postId=6311978160287073672&type=POST