MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
बरीच वर्ष मुलांना शिकवत असताना आजच्या विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पध्दती समजण्याचा योग आला. तसेच शाळा, क्लास, गृहपाठ यामध्ये १० तास मुलांची व पालकांची होणारी दोरीवरची कसरत जाणवली, दिसली. यावर उपाय म्हणुन आम्ही या संस्थेमार्फत विद्यार्थ्याची वाचन, लिखाण, ई. कौशल्य सुधारून, स्पर्धा आणि परीक्षाच्या दृष्टीकोनातून अनुभवी शिक्षकांच्या साह्याने तयारी करून घेतो. यामुळे मुलांची परीक्षेची भीती जाऊन, त्यांची गुणवत्ताही वाढते.जे ६ तास शाळेत, दोन तास क्लास, दोन तास गृहपाठ करूनही साध्य होत नाही, ते आता आम्ही शोधून काढलेल्या व पूर्ण महाराष्ट्रात सिद्ध केलेल्या शास्त्रशुद्ध पध्दतीमुळे शक्य होत आहे.
यामुळे मुलाची आकलनशक्ती झपाट्याने वाढते तसेच तो स्वावलंबी शिक्षणाकडे आकर्षित होतो. अशा पद्धतीची सवय दहावी, बारावी पर्यंत राहिली तरी त्या मुलाच्या भावी वाटचालीचा पाया अगदी मजबूत होतो. नववीपर्यंत ७०% मिळवणारा विद्यार्थी दहावीमध्ये कमी का पडतो?, जर देवाने सर्वांना समान बुद्धी दिली आहे तर मग काही मुलांना ९०%, ९५%, तर इतरांना ५०%,६०% का? याचंही उत्तर या आधुनिक शास्त्रशुद्ध पद्धती मध्ये पालकांना नक्की मिळेल.
जर आपल्या मुलामध्ये एकाग्रता, सर्जनशीलता,आत्मविश्वास आणि स्वावलंबन अपेक्षित असेल तर जरूर संपर्क करा.
मंगेश चोरगे. फोन न.८८३०२९०२२६.
पत्ता:२०२,बाबर हॉस्पिटल मागे. धोम कॉलनी, वाई-४१२८०३