MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
जीवन कौशल्य
दुसऱ्यांवर टिकलेली मजा टिकत नाही. त्यांचा मूड गेला की तुमची मजापण गेली. आपल्या हातपायांना एवढी शक्ती दया की जिथे पोचायचय तिथे स्वतःच्या
शक्तीवर पोहचा, इतरांची मदत शोधू नका.
स्वतःच स्वतःचा स्वर्ग धरतीवर तयार करण्याचा प्रयत्न करा. माझा भाऊ, माझी पत्नी, माझा मुलगा, मला खुश ठेवतील अशी अपेक्षा ठेवू नका. ती पूर्ण होणार
नाही. तुमची प्रसन्नता ही फक्त तुमच्यावरच अवलंबून असायला हवी. इतरांवर नाही. कोणाचा मूड असो नसो तुम्ही तुमची प्रसन्नता, आणि चेहऱ्यावरील
स्मितहास्य कायम टिकवून ठेवा. स्वतःमध्ये अशी हिम्मत आणा कारण हिम्मत, ध्येर्य वाढवते आणि भीती, घाबरटता, पळकाढूपना, आळशीपणा वाढवतेे.
अभ्यासामध्ये
मद, मत्सर, क्रोध हे तरंग उठतात, जेव्हा लोकं त्यांच्या सवयीप्रमाणे मनाला टोचेल असं बोलतात. अशावेळी त्यांना माफ करून हे तरंग शांत करायला शिकलं
पाहीजे. या जगात आपण तक्रार करायला आलो नाही तर काहीतरी नवीन शिकून आनंदी राहण्यासाठी आलो आहोत.
अतिउत्साही अतिचपळ ससा शर्यत हरतो, पण कायमस्वरूपी प्रयत्न करणारा, चालत राहणारा कासव शर्यत जिंकतो. बुद्धी कौशल्य झाकते म्हणुन कर्मशील
रहा सातत्य ठेवा अभ्यासामध्ये, प्रयत्नांमध्ये, यश नक्की मिळेल. कासव हे सातत्याच प्रतिक आहे. म्हणुन ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर असत. मनात कल्पनापण
आणाल तर ती चांगली आणा. देवाशी जोडल्यावर मन स्थिर होत, शांत होत.हनुमान एवढे शक्तिशाली, बुद्धिमान होते तरी मुखात सारखं रामनामाचा जप करीत.
बल्बवर वडिलांचं नावं लिहून वडलांच नावं चमकवन्यापेक्षा, स्वतःच बल्ब बना, वडिलांचं नावं अपोआप चमकेल. शुभ्दृष्टी अंगीकारा जी आशा, उत्साहचे विचार
मनात बनवेल, ज्यांना सातत्याने मनात टिकवून ठेवायचे आहेत.
फक्त एवढ लक्षात ठेवा की देवाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील, चेहऱ्यावर स्मितहास्य कायम राहील.
हसत रहा खेळत रहा, जीवन हे गाणे आहे गुणगुणत रहा. जेव्हा तुम्ही प्रसन्न,धन्यवादी राहता आणि देवाच्या चरणी प्रणाम करता, शांत राहता तेव्हां तुम्ही
यशस्वी होता. कारण अंतर्बाह्य शांतीस्वरूप होणं म्हणजे सहाव्या पुर्षार्थ मिळवण्यासारखे आहे. अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफलत्याग या पानाफुलांवर येणार पिक
म्हणजे शांती होय. आणि हीच मनाची मशागत होय. जशी शरीराला अन्नाची व व्यायामाची गरज असते तशी मनालाही अशा मशागतीची गरज असते.