MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
छत्रपती शिवाजी महाराजांना एकविसाव्या शतकातील एका सामान्य मावळ्याचा मानाचा मुजरा!
परमपूज्य महाराज,
बरेच दिवसांपासून आपल्यापुढे माझ मनोगत उघड करायचं होतं, आज करतो. तुम्ही अपार कष्टाने निर्माण केलेल्या स्वराज्यात आता अशे लोक आमदार होतायत कि "चोऱ्या करून थकला आणि आमदार झाला!". एखाद्या गरिब शिक्षकाने आमदार होऊन दाखवावे, हे श्रीमंत धन धांडगे जीव घेतील त्याचा. मग तो आपल्या नवीन पिढीला सुधरवण्याचा आटापिटा करतो तर त्याला पालक म्हणतात आमच्या मुलाला हात लावायचा नाही, त्यालाआम्ही म्हशी घेऊन देणार आहोत. त्यामुळं "मंत्र्याच पोर आणि गावाला घोर !" अशी परिस्तिथी झाली. बदलत्या परीस्थ्तीमध्ये आवश्यक ते बदल अगदी कायदे करून प्रत्यक्षात राबवले पाहिजेत तर जो सत्तेत येतोय तो पहिली आपलीतिजोरी भरायचं बघतोय. मग ती असो वा तो असो सगळे एकाच माळेचे मनी. जो पर्यंत समजामधली विषमता कायम आहे,प्रत्येकाच हृद्यपरीवर्तन होत नाही तोपर्यंत लाच घे पण जाच आवर! अश्या विश्वासघाताला सहन करावेलागेल. ज्या रघुनाथरावान पाकिस्तानातल्या attock पर्यंत मराठ्यांचे साम्राज्य वाढवले त्यांनीच ब्रिटीशांशी हात मिळवला कशासाठी तर छत्रपतींच्या गादीसाठी, वाटोळ झालं,शेक्डोवर्षांची गुलामी नशिबी आली. ना तलवार राहिली ना तलवार चालवणारा राहिला, अहिंसाचा आधार घ्यायची वेळ आली. आणि आता त्यांची (परकीय शत्रूची) राहिलेली पिल्लं आम्ही आमच्यासाठी बनवलेल्या राज्यघटनेत बदल करायला सांगतात, का? तर "तुमच्या जमिनीवर आमचीलोकसंख्या जास्त म्हणुन आमची झाली ही जमीन. " "जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !" अशी वेळ आली आहे. एखादा प्रामाणिक सरकारी कर्मचारी याविरुद्ध आवाज उठवतो तर त्याला,"अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा" असं म्हणायची वेळ येते. समाजामध्ये समानता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी साने गुरुजी, महर्षी शिंदे, यांसारख्या महात्मांची गरज आहे, पण आमच्या नशिबी अशे संत आलेत की "साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा"! म्हणायची वेळ आली आहे आणि आपल्या राजधानीत " कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !" अशी परिस्तिथी आहे. कुणाला मदत करायची आणि कूणाला हाकलून द्यायचे याचीसुद्धा शुद्ध राहिली नाही. कोण आपलं आणि कोण परका हे ओळखायची बुद्धी चालत नाही. आमच्या तरुणांना "एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो ! आणि सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना " असं म्हणायची वेळ आली आहे. आपली खूप आठवण येत आहे. कृपया पुन्हा एकदा साक्षात्कार द्यावा ही नम्र विनंती!
आपला विश्वासू
एक सामान्य मावळा.
http://indiasociale.blogspot.in/2018/02/jay-bhavani-jay-shivaji.html
https://www.blogger.com/blogger.g?blogID=889380162793653405#editor/target=post;postID=7266590445157563405;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=0;src=postname