वंदे S हम् सच्चिदानंदम् । श्रीगगनगिरी दया करा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। १ ।।
वंदितो तुझिया पाया । जगन्नाथा ईश्वरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। २ ।।
ब्रम्हा विष्णु, महेश । त्रैमूर्ति तू दिगंबरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ३ ।।
परात्परा परमहंसा । परमपूज्य गगनेश्वरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ४ ।।
पतितपावना दीनरक्षणा । वंदितो निखिलेश्वरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ५ ।।
भक्तवत्सला भक्तरक्षका । दीनवत्सल ईश्वरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ६ ।।
आदि अंत भेद रहित । अज्ञान हरण दिवाकरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ७ ।।
देव संस्तुत श्रीगुरू । परात्पर परमेश्वरा ।।
भक्ति दे, ज्ञान दे, वैराग्य दे । करुणाकरा ।। ८ ।।
इति श्रीगगनगिरी अर्गला स्तोत्रं संपूर्णम्-
★ Refer book ❛चैतन्यलहरी❜ available in most of the Gagangiri Maharaj ashrams.
๑۩۞۩๑|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||๑۩۞۩๑