मंगल आरती जय जय सद्ग़ुरु स्वामी गगनगिरी
नाथ अवतारी बैसले स्वामी गडावरी||ध्रु.||
लेऊनी भस्म घेऊनी चिमटा संकट निवारिती
जो जो येईल शरण तयाला दाखविती प्रचिती||१||
जलाशयी रमती जलातुनी तिनेत्र जागविती
निसर्ग प्रेमी स्वामी फुलविती चराचरी प्रिती||२||
शांतमूर्ति स्थितप्रज्ञ श्रीस्वामी गगनगिरी
करिती अनाथा सनाथ दीनानाथ सदा श्रीहरी||३||
भावभक्तिच्या नवसुमनांच्या माळा घेऊन हाती
पंचप्राण पंचज्योति ओवाळू आरती ||४||
★ Refer book ❛चैतन्यलहरी❜ available in most of the Gagangiri Maharaj ashrams.
๑۩۞۩๑|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||๑۩۞۩๑