ई-श्रम नोंदणी
मेगा कॅम्प
ई-श्रम नोंदणी
मेगा कॅम्प
2 लाख रुपयांचा मोफत विमा
ई-श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे, जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल, जे एक वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. तुम्ही देखील असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असाल आणि आजपर्यंत तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज केला नसेल किंवा या कार्डसाठी पात्रता काय असावी याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ई-श्रम म्हणजे काय? या कार्डसाठी काय पात्रता हवी? जाणून घ्या.
नोंदणी कोण करू शकतो ?
लहान शेतकरी , मजूर , सुतार, गवंडी , लोहार , प्लंबर ,सुरक्षा कर्मी कामगार ,रस्त्यावर विक्रेते, घरगुती कामगार, बांधकाम कामगार , नाई , दूध उत्पादक शेतकरी, भाजी आणि फळ विक्रेते, वीटभट्ट्या आणि दगडखाणीतील कामगार , सामान्य सेवा केंद्रे, ऑटो चालक, व्यवसाय करणारे किंवा कुठेही काम करणारे , ई
असंघटित कामगार
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे.
नोंदणीसाठी वय
ई-श्रम कार्डसाठी वय १६ वर्षांपेक्षा जास्त आणि ५९ वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतो. या वयामधील कोणतीही व्यक्ती कार्ड बनवू शकते.
कोण नोंदणी करू शकत नाही?
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असंघटित क्षेत्रात काम करणारे जे कामगार आयकर देत नाहीत. म्हणजेच, जर कामगार करदाता असेल तर त्याला ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा अधिकार नाही. फक्त तिथे असाच कामगार नोंदणी करू शकतो, जो EPFO, ESIC किंवा NPS चा सदस्य नाही
कोणते विद्यार्थी ई श्रम कार्ड काढू शकतात?
ज्या विद्यार्थ्यांचे वय 16 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, आणि ते अभ्यासासोबत उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारच्या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत, असे विद्यार्थी तुम्ही असला तर तुम्ही ई-श्रम कार्ड काढू शकता !
पण जे विद्यार्थी फक्त आपले शिक्षण करत आहेत असंघटित क्षेत्रात काम करत नसतील असे विद्यार्थी कार्ड काढू शकत नाहीत.
संघटित क्षेत्र कोणते - मजूर, शेतमजूर आणि भूमिहीन शेतमजूर. फेरीवाले व रस्त्यावरील विक्रेते, टॅक्सी व रिक्षाचालक, खासगी वाहनचालक, उपाहारगृह, कॅन्टीन, भोजन कंत्राटदार, समारंभांमध्ये सजावटीची कामे घेणारे कंत्राटदार आदींकडे कामे करणारे कामगार, मॉल मध्ये काम करणारे कष्टकरी, सफाई कर्मचारी यांना असंघटित कामगार म्हणतात.
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड ला मोबाईल नं. लिंक असने आवश्यक
बैंक पासबुक
शिक्षण असेल तर निकाल
नोंदणी करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 9145424914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND