प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमीत हानी होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये -
पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.
१ - पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यामुळे येणारी घट. पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान भरपाई- अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)
२- हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई - हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
३- काढणी पश्चात नुकसान - चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. सदरचे नुकसान काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त १४ दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
४ -स्थानिक नैसर्गिक आपत्ती - या योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. PMFBY योजना व्यापारी व बागायती पिकांनाही विमा संरक्षण देते. मात्र यासाठी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रीमियम (रक्कम) भरावी लागणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) या योजनेचे संचालन करते.
PMFBY योजनेचे उद्देश्य
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगराईमुळे नुकसान झालेल्या पिकांना सरकारद्वारे निश्चित नियमानुसार शेतकऱ्यांना विमा कव्हर मिळेल व आर्थिक सहायता दिली जाईल.
शेतकऱ्यांची शेतीतील अभिरुची कायम ठेवण्याबरोबरच त्यांना एक निश्चित उत्पन्न उपलब्ध करणे.
शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक प्रयोग व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
कृषी क्षेत्रात कर्जाची उपलब्धता निश्चित करणे.
PMFBY साठी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी -
पिक पेरणीनंतर १० दिवसांच्या आत तुम्हाला PMFBY साठी अर्ज करावा लागेल.
पीक कापणीनंतर १४ दिवसानंतर जर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतमालाचे नुकसान झाले तर तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
विमा योजनेचा लाभ तेव्हाचे मिळेल जेव्हा नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान होईल.
पेमेंटमध्ये होणारा विलंब कमी करण्यासाठी पीक कापणीचे आकडे मिळवणे व ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी स्मार्ट फोन, रिमोट सेंसिंग ड्रोन आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो
अर्ज करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 914 5424 914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND