I wrote this article after a 10-day sojourn in Hiroshima during our 87-day Japan travel sent to Alive. Here is its Hindi version sent to Grihshobha.
As Rashtriya Swayamsevak Sangh completes 100 years of its existence, its tight grip on governance without any structure formalized under the Indian laws raises serious questions. This article discusses this issue. Here, as a sub-page under the Articles menu is a brief pitch sent to Sarita. The English pitch sent to Caravan is available here. Here is the version sent to Alive.
This article written on June 01, 2025 at Japan in the backdrop of the recent military confrontation between India and Pakistan, questioning the religious and political undertones lent to the operation without going into the merits or demerits of the military operation itself. It has been published in the internal monthly newsletter of The Secular Community which I currently chair.
अस्वीकृती: नावे काल्पनिक आहेत. कोणताही साम्ययोग निव्वळ योगायोग समजावा.
एका सुंदर, छोट्या शहरात दोन आनंदी कुटुंबे राहत होती – दाने आणि साने. त्या शहरातील नियम मोठ्या बांधकामाला खासगी गाड्यांना परवानगी देत नव्हते. फक्त लहान हॅचबॅक कार वापरण्यास मुभा होती. दाने आणि साने या दोन्ही कुटुंबांकडे छोटी मारुती कार होती. ते त्यांच्या कारमधील प्रवासाचा खूप आनंद घेत. कधी कधी ते एकत्र सहलीला जात आणि उत्तम सामाजिक जीवन जगत.
हळूहळू शहराची लोकसंख्या आणि वाहतूक वाढू लागली. शहराचा विस्तार करण्याऐवजी सरकारने नियम बदलले आणि एफ.एस.आय. वाढवला, त्यावर टी.डी.आर. लोड करायची परवानगी दिली मोठ्या गाड्यांना परवानगी दिली. दाने आणि साने यांची छोटी वाहने जुनी झाली होती, पण अजूनही उत्तम स्थितीत होती. योग्य देखभालीने ती आणखी दहा वर्षे चालू शकली असती.
पण आता मोठ्या गाड्या परवानगीस पात्र झाल्यामुळे, दोन्ही कुटुंबे मोठी आणि प्रशस्त गाडी घ्यायची का यावर विचार करू लागली. तेवढ्यात एका श्रीमंत बस डीलरने त्यांच्या दारात हजेरी लावली. तो म्हणाला, “तुमच्या गाड्या लहान आहेत. मला त्या विकून टाका. त्याबदल्यात, मी तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला मोठ्या बसमध्ये ३०% मोठी सीट देईन. शिवाय, मी त्या बसला तुमच्या आडनावावरून ‘दाने बस’, 'साने बस' असे नाव सुद्धा देईन.” दाने कुटुंबाने ही ऑफर स्वीकारली, पण साने कुटुंबाने नकार दिला.
दाने कुटुंबाची कथा: डीलरने दाने यांची लहान कार नष्ट केली आणि त्यांना नवीन बसमध्ये पाच आसने दिली. उरलेल्या ४५ जागा त्याने शहरात नोकरीसाठी आलेल्या लोकांना विकल्या. हे प्रवासी एकमेकांना किंवा दाने कुटुंबाला ओळखतही नव्हते. डीलरने एका चालकाची नेमणूक केली, पण त्याचा पगार त्या ५० प्रवाशांना मिळून द्यावा लागणार होता. त्याने बसच्या पुढील भागावर “दाने बस” अशी पाटी लावली, आणि सर्व पैसे घेऊन निघून गेला.
आता ही बस त्या ५० प्रवाशांची मालमत्ता झाली. दाने कुटुंबाला ४५ अपरिचित लोकांमध्ये मिसळावे लागले. हे प्रवासी जाती, धर्म आणि परंपरांच्या आधारे विभाजित होते आणि त्यांच्यात सतत भांडणे होत. बसच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला खर्च आणि मतभेद वाढल्यामुळे तिची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. वारंवार बिघाड होऊ लागले आणि दाने कुटुंबाचे सुख, समाधान हरवले. पण त्यांनी स्वतःची गाडी डीलर आणि त्या ४५ प्रवाशांसाठी समर्पित केली होती, त्यामुळे त्यांना “दानशूर” ही पदवी मिळाली.
साने कुटुंबाची कथा: साने कुटुंबाने शांतपणे विचार केला. त्यांना ठाऊक होते की त्यांची गाडी अजून दहा वर्षे व्यवस्थित चालू शकते. त्यांनी कारची उत्तम देखभाल करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, मोठ्या आधुनिक गाडी साठी बचत करण्यास सुरुवात केली.
कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने आपल्या उत्पन्नानुसार “नवीन गाडी फंड”मध्ये योगदान द्यायला सुरू केले आणि हिशेब व्यवस्थित ठेवला. नियम तयार करून त्यांनी दरमहा एस.आय.पी. द्वारे कमी जोखमीच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत होती, त्यामुळे त्यांना सरासरी १२%च्या वर परतावा मिळाला. दहा वर्षांच्या शेवटी त्यांच्याकडे चांगली बचत झाली. त्यांच्या छोट्या गाडीच्या ठिकाणी टॉप-एंड लक्झरी इनोव्हा उभी झाली आणि साने आनंदाने जीवन जगत राहिले. त्यांना “दानशूर” ही पदवी मिळाली नाही, पण लोकांनी त्यांचे आडनाव "शहाणे" असे ठेवले!
Loksatta often publishes a column called "Tagada" (roughly meaning "demand of an explanation") in their Pune section on Tuesdays, where readers are invited to voice their dissatisfaction over the affairs of the civic administration. I contributed my article पीएमसीचा नदी प्रकल्प फक्त ‘ग्रीनवॉशिंग’ आहे का? which they published as नदी नक्की जिवंत ठेवायची आहे ना?
This 500-word article is sent to the resident editor in response to the entire series of three articles published by Indian Express Pune Feb 2025. Also sent a similar article पीएमसीचा नदी प्रकल्प फक्त ‘ग्रीनवॉशिंग’ आहे का? to Loksatta on 11/2/2025.
This is a critique on the river project of PMC. It was originally written for Indian Express, and some material from it has been quoted by the newspaper in their second article of the 3-article series.
This article tells the story of three friends who are pained by witnessing the abject poverty in rural/tribal India and question the theory of re-birth or after-life proffered by religions in this regard. It is published both in Hindi in the April-Pratham issue of Sarita and in Marathi in the June issue of Grihshobhika . The original draft is here.
This article is written for the college newsletter of Prof Rajesh, BiL of Shewta
निवडणुकांमध्ये सत्तेसाठी, आणि त्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचा त्याग करणाऱ्या व्यवस्थांनी समाजाला असहाय अवस्थेत ढकलले आहे. अशा परिस्थितीत विवेकवादी नागरिकांवर सत्याच्या आधारे जनजागृती करून योग्य दिशा दाखविण्याची मोठी जबाबदारी आहे. या विषयावर माझा लेख आजचा सुधारकच्या ०१ जानेवारी २०२५ च्या अंकात वाचावा.
Secularism and Religious Beliefs is one of my articles published in The Secular Community monthly Newsletter
शहराच्या गोंगाटापासून दूर आस्ट्वागॉय झीलच्या काठावर नॉर्डिक निसर्ग आणि नॉर्वेजियन समाजाच्या प्रेमात पडावे असे ठिकाण आहे फ्रॉयसेट गाव… (गृहशोभिका, डिसेंबर २०२४, पाने ६२-६३: मासिकाच्या अंकात शब्दसीमा असल्याने मूळ लेख कमी करण्यात आला.)
In this article published jointly with Ameet Singh under Myspace in Times of India Pune on 13 Dec 2024 I have explained the official mandates of PMRDA and PMC, and how, by deviating from their duties, they have left the tree administration of Pune metropolitan region totally neglected.
The article is a highly condensed form of the original 2-part article supported by two other documents: Write-up titled A Roadmap for PMRDA to Successfully Carry Out Tree Census and Write-up titled Provision of Land Parcels for Compensatory Plantation to Survive for Centuries
एप्रिल १, २०२३ रोजी आजचा सुधारक मध्ये प्रकाशित या लेखात पुण्यातील नास्तिक परिषदेत दिलेल्या अविनाश पाटील ह्यांच्या भाषणावर टीका केली आहे.
एप्रिल १, २०२३ रोजी आजचा सुधारक मध्ये प्रकाशित या लेखात पुण्यातील नास्तिक परिषदेत दिलेल्या विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावर टीका केली आहे.
ऑक्टोबर १, २०२३ रोजी आजचा सुधारक मध्ये प्रकाशित "धर्मग्रंथ-दहन आंदोलने" या लेखात भारत आणि दोन प्रगत देशांतील धर्मग्रंथ-दहन आंदोलने आणि संबंधित कायद्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे.