भावनांचे मज्जासंस्थे निगडीत जीवशास्त्र
संशोधनाचा सारांश
जीवनातील अनुभवांचा मेंदूवर खोलवर परिणाम होत असतो. आमच्या प्रयोगशाळेत पुढील मुद्द्यांवर सखोल संशोधन होतं (१) भावनांसंबंधी मज्जासंस्थाअंतर्गत प्रक्रिया (न्यूरोसर्किट्री) समजणे, (२) अनुभव आणि मूड वृधींगत करणारी औषधं (सेरोटोनीन माध्यमी सायकेडेलिक्स आणि त्राण प्रतिरोधके) द्वारे भावनांचं नियंत्रण, आणि (३) सततची चिंता, उदासीनता, स्किझोफ्रेनिया इत्यादी मानसिक विकारात भावनांसंबंधी न्यूरोसर्किट्रीतील बदल ओळखणे. मनोविकृती असुरक्षिततेच्या प्रायोगिक प्राण्यांच्या मॉडेल्सचा (प्रमुख्याने लहानपणी अनुभवलेला त्राण- अर्ली लाईफ स्ट्रेस संबंधी) वापर करून आम्ही आण्विक, पेशीसंबंधी, अपजनुकीय (एपिजेनेटिक), जैव-ऊर्जिक (बायोएनर्जेटिक्स), कार्यात्मक बदलांचा अभ्यास करतो, विशेषत: जे दीर्घकालीन वर्तणूकीत आमुलाग्र हातभार लावतात. आम्ही पर्यावरणीय, औषधीय, आनुवंशिक किंवा किमोजेनॅटिक (DREADDs) साधनांचा वापर करून प्रारंभिक मानसिकदृष्टया डगमळीत काळाचे (क्रिटिकल पीरियड) मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याबाबत संशोधन करतो. आम्हाला ताणतणावच्या न्यूरोसर्किट्री विकासामध्ये उद्भवणार्या बदलांमध्ये रस आहे. उदा. प्रौढपणी अनुभवलेल्या तणावाचा न्यूरोसर्किट्री प्रतिक्रियांवर थेट परिणाम कसा होतो?, मनोविकारात प्रतिकूल बदलांसाठी पाया कसा रचला जातो? आम्ही सेरोटोनीन आणि सेरोटोनीन अवलंबित रीसेप्टरचा भावनांसंबंधी न्यूरोसर्किट्रीतील वर्तणूक आणि कार्यात्मक क्षमतेवर होणारा बदल मनोविकृती असुरक्षिततेच्या प्रायोगिक प्राण्यांच्या मॉडेल्सच्या साहाय्याने करतो. आम्ही वर्तणूकीमध्ये बदल घडवून आणणारी न्यूरोसर्किट्रीमध्ये बायोएनर्जेटिक्सच्या विविधतेचा, विशेषतः सुत्रकणिका (मायटोकोंड्रीया) निर्मिती आणि कार्यप्रणालीचा, मनोविकार विकासात आणि उपचारात काय भुमिका आहे याचा सखोल अभ्यास करतो. आमचे कार्य अर्ली लाईफ स्ट्रेस संबंधी पेशींमधील अकाली वृद्धपण, मज्जासंस्थासंबधित दाह (न्यूरोइन्फ्लेमेशन) आणि अकार्यक्षम सुत्रकणिका यामधील संभाव्य संबधांचा पाठपुरावा करत आहे.
आम्ही अतितत्पर प्रतिरोधक उपचार तसेच निरंतर प्रतिरोधक उपचारांमुळे उद्भवलेल्या आण्विक आणि पेशीय रूपांतरांची देखील तपासणी करतो. या रूपांतरांपैकी वयस्क न्यूरल स्टेम सेल्स (मुलपेशींचे) नियमन आणि भावनासंबंधित महत्वाच्या न्यूरोसर्किट्रीमधील मेंदूपेशींची जडणघडण समाविष्ट आहे. आम्हाला न्यूरोप्लास्टिक (मेंदूची कार्यात्मक लवचिकता) बदल आणि त्यांचे मूडसंबंधित वर्तणूकीतील योगदान या संशोधनातसुध्दा रस आहे.
भावनांच्या न्यूरोसर्किट्रीचा गुंता समजण्यासाठी आम्ही फार्माकोलॉजिकल आणि अनुवांशिक पध्दती तसेच आण्विक, पेशीय, जैविक आणि वर्तणुकीसंबंधी माध्यमांचा विस्तृत अभ्यास करतो.
Credits: Dr. Pratik Chaudhari