अधिक माहितीसाठी फोटो व टेक्स्टवर क्लिक करा.. Click On Images & Text & Get Information
शहरी शेतीचे काम विस्तारीत करतांना सातत्याने नवनवीन प्रयोग करावे लागतात. त्यामुळे आमच्या राहत्या घरी भाजीपाल्याचे टेरेस गार्डेन तयार केले आहे. रोज पाणी देणे व आठवड्यातून एकदा थोडी फार कामे करणे हेच काय ते बागेसाठी कामकाज. तरीही आम्हाला आठवड्याच्या चार पाच भाज्या मिळतात. आमचे टेरेस गार्डेन म्हणजे ऑरगॅनिक फार्मिंगची लॅब मानतो. ज्यात विविधतेने प्रयोग करत असतो. बरं हे प्रयोग माझ्या घरच्या बागेत नाहीत तर इतरही चालूच असतात. शिवाय आम्ही जी काही कीडनियंत्रक, संजीवक बनवतो त्यातही प्रयोग सुरू असतात. त्यामुळे प्रयोग करायचे म्हणजे प्रयोगशाळा ( लॅब) आलीच.