G.B. Digital

G. B. Digital

मातीत हात घालून आम्ही औषधं पिकवत आहोत व पिकवून देत आहोत. पण हा विचार सर्वदूर पोहचण्यासाठी आम्ही पहिल्यापासूनच माध्यमांची मदत घेतली आहे.

प्रिंन्ट व व्हिज्यूअल मिडीया सोबत सोशल मिडीयावर आम्ही इच्छुकांना होम कंपोस्टींग व भाज्या कशा पिकवाव्यात याचे मार्गदर्शन करत आलो आहोत. करत आहोत व करत रहाणार आहोत. त्यासाठी विविध संकेतस्थळे, यू ट्यूब चॅनेल, सोशल मिडीयावरील सर्व व्यासपिठावर राहण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणे करून इच्छुकांना त्याचा फायदा होईल व पर्यायाने आपले व आपल्या वंसुधरेचे आरोग्य चांगले राखता येईल हा प्रयत्न आहे.

या विषयावर सातत्याने वर्तमान पत्रात लेख लिहीत असतो. खरं तर नाशिक मधील सर्व वृत्तपत्रांचे व त्याचा गाडा चालवणार्या संपादकाचे, पत्रकारांचे आभार मानतो की त्यानी आळी पाळीने गच्चीवरची बाग या कार्याला सातत्याने बातम्या, लेख, सदर स्वरूपात प्रसिध्दी देण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहेत. या सार्याचे वेळोवेळी पुस्तक रूपात माहिती प्रकाशीत केली आहे.