Experience

इच्छुकांकडे व्यावसायिकरित्या विषमुक्त भाजीपाल्याची बाग फुलवण्याचाअनुभव हा वैयक्तिक रित्या हा पूर्ण वेळ आठ वर्षाचा असला तरी त्यापूर्वीपासूनच शेतीचा अभ्यास सुरू केला होता. घरच्याच गच्चीवर अनेक प्रयोग केले. आधि केले मग सांगीतले या संतवचनाप्रमाणे अनुभवलेले संचीत हे गच्चीवरची बाग या पुस्तक रूपात आम्ही प्रकाशीत केले . सातत्याने http://www.organic-vegetable-terrace-garden.com/ बागेविषयी या कंटेंट ब्लाॅग वर लिखाण होत असते. आतापर्यंत ४५ हजार लोकांनी वाचले आहे. नाशिक मधे सध्या आम्ही पाचशे ठिकाणी भाजीपाल्याची बाग फुलवून दिली आहे. अर्थातच प्रत्येक ठिकाणी कचरा व्यवस्थापन हे सृजनशील पध्दतीने करण्यास प्राधान्य देत आहोत.