Experiments

२०१३ पासून पूर्ण वेळ या गच्चीवरची ( विषमुक्त भाजीपाला निर्मीती) बागेचे पूर्ण वेळ काम करत आहे. खरतर हे काम नव्हे प्रयोग हे २००० पासूनच सुरू झाले होते. हा छंद जोपासताना गारबेज टू गार्डेन ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केलेत. या प्रयोगातून अपेक्षीत काही तत्व, निष्कर्ष हाती आले तरी सातत्याने त्यावर प्रयोग सुरूच ठेवावे लागतात. सुक्ष्म व गुंतागुंतीच्या समन्वयातून निसर्ग हा फुलत असतो. त्याचा प्रत्येकवेळस सारखाच परिणाम येईल याची खात्री नसते. त्यातून काही ठोस हाती लागल्यावर ते आम्ही गच्चीवर बाग फुलवणार्या इच्छुकांपर्यंत पोहचवतो.