अर्थ/टिप्पणी : जगरहाटी, विश्वाचे चलन वलन. संस्कृतातला सृ धातू म्हणजे वर / खाली सरणे, ज्यातून आपल्याला सृष्टी, सर्जन, अभिसरण, संसार इ. शब्द प्राप्त होतात. त्याआधी सम् लावला की त्यातून तुलनेने एकाच परिमाणातून उद्भवणारा परिणाम निर्देशित होतो. म्हणजेच जे "सरणे" होते ते पुन्हापुन्हा होणारे असते (दुसरा असाच उपयोग - स्मरण आणि "सं"स्मरण) - सबब संसृती म्हणजे जगाचे रहाटगाडगे. पुन्हा पुन्हा त्याच स्थितीत येणारे चक्रवत विश्व.