टिप्पणी : खूर असलेल्या प्राण्यांचा समावेश ⇨ अंग्युलेटा गणात केला जातो. अंग्युलेटाचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. (१) विषम पादांगुलीय (ज्यांच्या बोटांची अथवा खुरांची संख्या विषम असते असे प्राणी, पेरिसोडॅक्टिला), उदा., घोडा, टॅपीर, गेंडा व (२) सम पादांगुलीय (ज्यांच्या बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते असे प्राणी, आर्टिओडॅक्टिला), उदा., डुक्कर, हिप्पोपोटॅमस, उंट, जिराफ, हरीण, गाय, म्हैस, यांमध्ये खुरांत भेग पडलेली असते.