औपचारिक : वैपुल्य मानसिकता / आश्वस्त मानसिकता / आश्वस्तता आणि अभावग्रस्त मानसिकता/अभावग्रस्तता अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
academic bank of credit
औपचारिक : श्रेयांक खाते (विद्यापीठात credits = श्रेयांक)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
access
औपचारिक : प्रवेश, वापर, अनुमती इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
acronym
औपचारिक : आद्याक्षरी, आद्याक्षरनाम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
activist
औपचारिक : सक्रिय/कार्यरत
टिप्पणी : उदा. - पर्यावरणाच्या क्षेत्रातील कार्यरत/सक्रिय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
actuate
औपचारिक : प्रचालित
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
adaptation
औपचारिक : अनुकूलन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
adaptive, adaptive coping machanism
औपचारिक : अनुकूलित/अनुयोजक/सुसंगत, अनुयोजित व्यवस्था / सुसंगतियोग्य व्यवस्था / स्वीकारशील व्यवस्था
अनौपचारिक : जुळवून घेणारा/री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
adjustment
औपचारिक : जुळवून किंवा जमवून घेणे
टिप्पणी : १. नात्यांमधली adjustment = जुळवून घेणे २. यंत्र adjust करणे (उदा. आवाज कमी/जास्त करणे) = औ.- नियंत्रण/नियंत्रित करणे; अनौ.- कमी-जास्त, मागे-पुढे इत्यादीपैकी जे समर्पक असेल ते ३. "साहेब, जरा adjust करा ना!" = औ.- जुळवून घेणे; अनौ.- तोड काढणे / "तोडपाणी करणे" ४. "मावतील सहाजण - जरा adjust करा पुढे-मागे सरकून!" = इथेही "जुळवून घेणे" बसतंय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
admiral
औपचारिक : दर्यासारंग, सरखेल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
aero dynamics
औपचारिक : वायुगतिशास्त्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
aesthetic practice
औपचारिक : सौंदर्यलक्ष्यी रीत/व्यवहार/ आचार, अभिरुची अवकाश
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
agency
औपचारिक : अभिकरण
अनौपचारिक : मुखत्यारी
टिप्पणी : agent = अभिकर्ता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
agenda
औपचारिक : विषयसूची
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
agnostic
औपचारिक : अज्ञेयवादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
alignment
औपचारिक : सुसूत्रता, जुळवणी, जोडणी, संधान, मेळ, सुसंगती इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
allergy
औपचारिक : असात्म्य
अनौपचारिक : अलर्जी
टिप्पणी : अलर्जी रुळलेला आहे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
alone, lonely, loner, aloof
औपचारिक : एकटा, एकाकी, एकांतप्रिय, अलिप्त किंवा तुटक अनुक्रमे
टिप्पणी : 1. ती एकटीच समुद्रकिनारी फिरत होती. 2. ह्या उतारवयात गर्दीतही बऱ्याचदा एकाकी वाटतं. 3. माझी मैत्रीण नेहमी सगळ्यांची चौकशी करते. अलिप्त राहणं, तुटकपणा तिच्या स्वभावात नाही.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
alphanumeric
औपचारिक : अंकाक्षरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ambidextrous
औपचारिक : सव्यसाची
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ambisinister
औपचारिक : हस्तविकल, करविकल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
anecdotal evidence
औपचारिक : सांगोवांगी पुरावा, ऐकीव पुरावा, वानगीचा पुरावा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
anecdote
औपचारिक : किस्सा, आख्यायिका, सांगोवांगी माहिती, ऐकीव माहिती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
animist
औपचारिक : जीवात्मवादी
टिप्पणी : जीवात्मवाद हि संकल्पना लॕटिन शब्द अनिमा म्हणजे म्हणजेच निर्जीव गोष्टीत असलेल्या जीवाबद्दल वर्णन केलेले आहे. जीवात्मवाद अनुसार प्राणी, झाडे आणि निर्जीव गोष्टीत हि आत्मा असतो. जीवात्मवाद ह्या संकल्पनेचा वापर मानवशास्त्र शाखेत धर्म उलगडताना केलेला आढळतो
टिप्पणी : ही तालेबने सांगितलेली संकल्पना आहे. ह्यात अनागोंदी च्या किंवा वाईट परिस्थितीत एखाद्या गोष्टीची प्रगती होते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
anti-incumbancy
औपचारिक : सत्ताधीशांविषयी नाराजी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
antibodies
औपचारिक : प्रतिपिंडे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
antidote
औपचारिक : उतारा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ape, lemur
औपचारिक : एप आणि लीमर हे शब्द मराठीत घेत आहे.
टिप्पणी : संस्कृत शब्दकोशात वानर आणि कपि दोन्हीचे अर्थ monkey, ape असे दोन्ही दिले आहेत. हनुमान वानर (कपि कुळाचा) होता आणि त्याला शेपूट होती, असं रामायणात आहे. म्हणजे तो ape नाही आणि वानर, कपि ape नाहीत असं धरते. लीमर तर आपल्याकडे नसतातच.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
apologetic
औपचारिक : दिलगीर, क्षमेच्छुक, क्षमाकांक्षी
टिप्पणी : उदा. Am I sounding apologetic here? = माझा सूर आत्ता दिलगिरीचा वाटतो आहे का?
टीप - अपराधी म्हणजे guilty. छटा वेगळी आहे. आपण अपराधी नसलेल्या गोष्टींबाबतही दिलगीर असू शकतो.
टिप्पणी : ख्रिश्चन धर्मात apologist हा प्रकार आढळतो. तो थोड्या फार फरकाने प्रत्येक धर्मात असतोच. मात्र ख्रिस्ती धर्माचा एक अभ्यास शाखा म्हणून जे सखोल शिक्षण घेतात त्यांना apologist चा अभ्यासक्रम असतो. ह्यात ख्रिस्ती धर्मग्रंथ अर्थात बायबलचा जुना व नवा करार, ख्रिस्ताचे आयुष्य इ. मधील परस्पर विरोधी घटना वा शिकवण ह्यांचा अभ्यास होऊन त्या समर्थनार्थ स्पष्टीकरण व शंकानिरसन करण्याचे शिक्षण apologist अभ्यासक्रमात दिले जाते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
app
औपचारिक : अनुप्रयोग
अनौपचारिक : अॅप
टिप्पणी : अॅप रुळलेला आहे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
appearance
औपचारिक : बाह्य स्वरूप
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
appointment
औपचारिक : नियोजित भेट / वेळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
approach
औपचारिक : पद्धत, रीत, हाताळणी, धोरण, दृष्टिकोन यांपैकी संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
approachable
औपचारिक : संपर्कसुलभ, संवादानुकूल
टिप्पणी : मेरकल यांचे व्यक्तिमत्त्व संपर्कसुलभ आहे किंवा मेरकल संवादानुकूल आहेत असे म्हणता येईल. हे दोन्ही पर्याय छान आहेत. तसेच "मेरकल ह्यांच्याशी संपर्क साधणे/भेटणे/बोलणे कठीण जात नसे" असेही म्हणता येईल.
संपर्कक्षमचा अर्थ वेगळा होतो. "मेरकल संपर्कक्षम आहेत" म्हणजे मेरकल ह्यांच्याकडे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची क्षमता आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
appropriation (like cultural appropriation)
औपचारिक : अपहार, अधिग्रहण
अनौपचारिक : शिरजोरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
aptitude
औपचारिक : कल, गती
टिप्पणी : आवड म्हणजे interest
पण कल हा अधिक व्यापक आहे कारण कल बघताना आवड आणि बुद्धीमत्ता किंवा बौद्धिक योग्यता, अनुरूपता या दोन्हीचा मेळ घातलेला असतो.
गती - एखाद्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीत चांगली गती आहे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
arson, arsonist
औपचारिक : जाळपोळ, भडकावू / आगलाव्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
art gallery
औपचारिक : कलादालन, कलासज्जा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
artificial intelligence
औपचारिक : कृत्रिम प्रज्ञा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ascription
औपचारिक : आरोपण, श्रेय/अपश्रेय संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
asymptomatic
औपचारिक : लक्षणरहित
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
attitude
औपचारिक : वृत्ती, दृष्टिकोन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
audience (for any medium, across different media)
औपचारिक : प्रेक्षक (सर्व माध्यमांसाठी)
टिप्पणी : जरी audience मध्ये शब्दश: फक्त श्राव्य माध्यमांचाच निर्देश होत असला तरी आपण तो सर्व माध्यमांना उद्देशून असल्यासारखा वापरतो आणि संदर्भाने अर्थ (अर्थाची व्याप्ती) घेतो. असा सर्व माध्यमांना वापरायचा शब्द.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
aura
औपचारिक : वलय, प्रभा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
authorship
औपचारिक : लेखकत्व, लेखनश्रेय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
autism
औपचारिक : स्वमग्नता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
autophagy
औपचारिक : स्वभक्षण - पुनर्वापर
टिप्पणी : शरीर खराब झालेल्या पेशींचा वापर करून नवीन पेशी तयार करते
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
away day
औपचारिक : सुट्टीचा दिवस, उनाड दिवस, चर्चेचा/गप्पांचा दिवस इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
backpack
औपचारिक : पाठपिशवी
अनौपचारिक : धोकटी, गासोडी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bacronym
औपचारिक : सुशब्द
टिप्पणी : सुरुवातीच्या अक्षरांचा शब्द आणि "सु" म्हणजे चांगला.
an acronym deliberately formed from a phrase whose initial letters spell out a particular word or words e.g. Biodiversity Serving Our Nation - BISON
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
badass
औपचारिक : बेडर, खमक्या, भन्नाट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Bakery
औपचारिक : पावभट्टी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
baptise
औपचारिक : ज्ञानस्नान करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
best case, worst case
औपचारिक : चांगल्यात चांगलं आणि वाईटात वाईट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bestseller
औपचारिक : प्रचंड खपाचे, सर्वाधिक खपाचे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
big bang, singularity
औपचारिक : महास्फोट (प्रचलित शब्द), एकत्त्व / एकात्मिकता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
binging
औपचारिक : (अधाशासारखा) फडशा पाडणे
टिप्पणी : हे खाणं, पिणं, कार्यक्रम बघणं इ. सगळ्याला म्हणता येतं
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
biodata
औपचारिक : परिचयपत्र, स्वपरिचय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
biometric attendance
औपचारिक : समक्ष उपस्थिती
अनौपचारिक : ठसा हजेरी
टिप्पणी : ठसा म्हणजे impression - ते बोट, चेहरा, डोळा कशाचेही असू शकते
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
biorhythm
औपचारिक : जैवताल, जैविकताल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bipartisan
औपचारिक : उभयपक्षीय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bird's eye view
औपचारिक : "विहंगम" दृष्य
टिप्पणी : म्हणजे आकाशातून / विमानातून / उंच इमारतीवरून / डोंगरावरून दिसणारे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bizarre
औपचारिक : विचित्र/चमत्कारिक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Black Comedy / Dark Humour
औपचारिक : शोकात्म विनोद / शोकात्म प्रहसन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
blackmail
औपचारिक : बिंगवसुली, बिंगधमकी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
blessing in disguise
औपचारिक : इष्टापत्ती
अनौपचारिक : छुपे वरदान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
blocking on FB/WA
औपचारिक : कट्टी, फुली मारणे, बंदी/मनाई करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bollard
औपचारिक : बैठांब
अनौपचारिक : खुंटा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
book holder
औपचारिक : ग्रंथासन
अनौपचारिक : अडणी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
booklet
औपचारिक : माहितीपुस्तिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bookmark
औपचारिक : पुस्तकखूण, वाचनखूण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
brainstorming
औपचारिक : मनमंथन, बुद्धिमंथन, विचारमंथन , कल्पना विस्फोट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
brand ambassador
औपचारिक : ख्यातिदूत, मुद्रादूत
टिप्पणी : brand = मुद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
brand, logo
औपचारिक : brand = बोधचिन्ह, छाप logo = नाममुद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
breakthrough
औपचारिक : थारेपालट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
brunch
औपचारिक : भक्कम न्याहारी, पोटभर न्याहारी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
bucket list
औपचारिक : पिंडयादी
अनौपचारिक : ,
टिप्पणी : जी यादी पूर्ण झाल्याने कावळा पिंड खाईल ती, सर्व इच्छा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
buckwheat
औपचारिक : कुट्टू
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
buffer
औपचारिक : संदर्भानुसार अतिरिक्त, राखीव, साठीव, धक्का शोषक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
building block
औपचारिक : चिरा, वीट, रचनेचा घटक (संदर्भानुसार)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
by default/ default option
औपचारिक : आपसूक / आपसूक पर्याय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
byproduct, bystander, byroad अशा सगळ्या by ना काही एक शब्द ?
औपचारिक : सह, उप, जोड, दुय्यम, आनुषंगिक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cacophony
औपचारिक : गोंगाट, कलकलाट, कोलाहल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
calligraphy
औपचारिक : सुलेखन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
camouflage
औपचारिक : छद्मावरण, मायावरण
अनौपचारिक : मिसळून जाणे, बेमालूमपणे लपणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cancel culture
औपचारिक : बाद-मोहीम, खोड-मोहीम
अनौपचारिक : उपेक्षागिरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
canopy
औपचारिक : छत, झाडांसाठी वापरल्यास पर्णसंभार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
carbon footprint
औपचारिक : कर्बठसा, कर्बमान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
career
औपचारिक : पेशा, काम, व्यवसाय, कारकीर्द, कार्यक्षेत्र इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cargo
औपचारिक : माल
टिप्पणी : माल हाच प्रचलित शब्द आहे. त्यावरून मालधक्का, मालगुजारी, मालगोदाम असे शब्द होते. बंदरावरुन आतल्या भागात किंवा घाटचढून बैलगाडीतून होणाऱ्या वाहतूकीला मालसामानाची वाहतूक असंच म्हणायचे. "तुमचं मालसामान आलंय पाठवून देऊ काय", असं आजही विचारतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
carnal
औपचारिक : दैहिक, कायिक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cartoon
औपचारिक : व्यंगचित्र, बिंगचित्र, हास्यचित्र
अनौपचारिक : कार्टून (हा पण रुळला आहे)
टिप्पणी : दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी त्यांचे आईवडील चालवत असलेल्या "अभिरूची" मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यंगचित्रांसाठी "बिंगचित्र" असा शब्द फार लहानपणीच घडवून त्यांचे पुढचे भाषांतरिक कर्तृत्व दाखवून दिले होते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
case study
औपचारिक : नमुना अभ्यास
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cat's cradle (a game)
औपचारिक : हातभुलय्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
catharsis
औपचारिक : विरेचन, निचरा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
celebrity
औपचारिक : नामवंत, मान्यवर, वलयांकित इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
centerstage
औपचारिक : मंचाच्या मध्यभागी , केंद्रस्थान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
chauvinism
औपचारिक : वर्चस्ववाद, श्रेष्ठत्ववाद
अनौपचारिक : माज
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cheat day
औपचारिक : दांडी मारणे, बुट्टी मारणे, सुट्टीचा दिवस
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
checklist
औपचारिक : यादी
टिप्पणी : कोणतीही यादी तसं म्हटलं तर checklist च असते. काही लोक त्यावर मनातल्या मनात खुणा करतात तर काहींना प्रत्यक्ष कराव्या लागतात, एवढंच. म्हणजे मुळात इंग्रजीतला ’check'list हा शब्दच अनावश्यक वाटतो. पण ठीक आहे, त्यांनी केला तर त्यांची मर्जी. म्हणून आपण अजून एक शब्द बनवलाच पाहिजे असं नाही.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cheerleader
औपचारिक : आनंददूत, स्फूर्तिदूत, जल्लोषमूर्ती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
chef
औपचारिक : पाकतज्ज्ञ
टिप्पणी : बल्लवाचार्य चांगला असला तरी पुरुषांसाठी असल्यासारखा वाटतो. "पाकतज्ज्ञ" हा gender-neutral (लिंगभाव-विरहित?) आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
childfree
औपचारिक : संततीनिरिच्छ
टिप्पणी : स्वेच्छेने मूल न होऊ देणाऱ्या व्यक्ती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
chromatography, chromatograph
औपचारिक : वर्णविद्यापद्धती, वर्णविद्यापट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
city slicker
औपचारिक : शहरी दिडशहाणे, शहरंढळ
टिप्पणी : City slicker is an idiomatic expression for someone accustomed to a city or urban lifestyle and unsuited to life in the country. The term was typically used as a term of derision by rural Americans and Canadians who regarded them with amusement.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
civic sense
औपचारिक : वावर सभ्यता
टिप्पणी : उदा. - थुंकू नये, धक्काबुक्की करू नये, रांगेत उभे राहणे इ. गोष्टी वावर सभ्यतेत येतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Civil Society
औपचारिक : नागर संघटन, नागरी संघटन, नागरी दबावगट
टिप्पणी : ह्याचा शब्दश: अर्थ :- अशासकीय संस्था, संघटना आणि चळवळी ह्यांचे जाळे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Cliche
औपचारिक : जीर्णोक्ती
अनौपचारिक : गुळगुळीत/घिसापिटा शब्द/वाक्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
clickbait
औपचारिक : आमिषदुवा, वाचकभूल, प्रेक्षकभूल
अनौपचारिक : गाजर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
clicktivist
औपचारिक : टिचकीरत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
climax, anticlimax
औपचारिक : कळस / कळसाध्याय, विरस/विचका/फुसका
टिप्पणी : Climax-anticlimax यांना मराठी अलंकारांमध्ये समांतर असे 'सार आणि अतिसार' असे दोन अलंकार आहेत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
clone
औपचारिक : प्रतिरूप
टिप्पणी : Copy म्हणजे प्रत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
closeup, long shot
औपचारिक : निकटचित्र / समीपदृश्य, दूरदृश्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
co-ordinator
औपचारिक : समन्वयक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
code switch
औपचारिक : संकेतबदल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
coffee-table book
औपचारिक : चावडी-पुस्तक, शोभेचं पुस्तक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cognitive bias
औपचारिक : विचारभ्रम
टिप्पणी : Cognitive bias is an umbrella term that refers to the systematic ways in which the context and framing of information influence individuals' judgment and decision-making.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cognitive dissonance
औपचारिक : अंतर्विरोध, बौद्धिक/वैचारिक विसंगती
टिप्पणी : Cognitive dissonance is discomfort when people hold conflicting beliefs or when their actions contradict their beliefs. e.g. Eating meat while also thinking of themselves as an animal lover or smoking despite being aware of the adverse health effects of tobacco use.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cognitive revolution
औपचारिक : बोधनक्रांती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
comfort food
औपचारिक : मायेचा घास, विसाव्याच्या घास
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
comic timing
औपचारिक : विनोदाचे कालभान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
common sense
औपचारिक : सारासार बुद्धी, तारतम्य, व्यवहारज्ञान
अनौपचारिक : पाचपोच
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
communitarianism
औपचारिक : व्यक्ती-समष्टी वाद
टिप्पणी : Communitarianism is a philosophy that emphasizes the connection between the individual and the community. In the West, the term evokes associations with the ideologies of socialism and collectivism.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
community spread
औपचारिक : सामूहिक संसर्ग, सामूहिक प्रादुर्भाव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
composite
औपचारिक : संयुक्त
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
concourse
औपचारिक : आवार, परिसर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
confirmation bias
औपचारिक : पुष्टीग्रह
टिप्पणी : Confirmation bias is the tendency to search for, interpret, favor, and recall information in a way that confirms or supports one's prior beliefs or values.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
connoisseur
औपचारिक : रसिक, दर्दी, मर्मज्ञ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
conquest theory
औपचारिक : अभिजयाचा सिद्धांत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
constructionist
औपचारिक : आकलनदाता
टिप्पणी : Constructionist is a person who puts a particular interpretation upon a legal document.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
contact tracing
औपचारिक : संपर्कमाग
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
containment zone
औपचारिक : नियंत्रित क्षेत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Context
औपचारिक : संदर्भचौकट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
contractualist
औपचारिक : करारवादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
contronym
औपचारिक : विरोधाभासी
टिप्पणी : single word that has two contradictory meanings (e.g. dust)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
convulsive, spasmodic
औपचारिक : अपस्मारीक आणि मुरडा अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
coparcener
औपचारिक : सहहिस्सेदार, वाटेकरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
copyright
औपचारिक : स्वामित्व हक्क
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
core activity
औपचारिक : मुख्य/प्रमुख काम, पायाभूत कार्य, कार्याचा गाभा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
core business
औपचारिक : मूलभूत उद्योग
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
corporate culture
औपचारिक : उद्यम संस्कृती
टिप्पणी : व्यापारी नव्हे. त्यासाठी mercantile हा शब्द वापरला जातो.
टिप्पणी : सध्या पुरातात्त्वशास्त्रात civilization ऐवजी culture हा शब्द वापरतात. Civilization च्या वापर केल्यास civilized आणि uncivilized असा ग्रह तयार होऊ शकतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
custody
औपचारिक : मुलांची असल्यास जबाबदारी, ताबेदारी. गुन्ह्यासंदर्भात कोठडी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cut to cut
औपचारिक : काटोकाट, नेटके
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cutting corners
औपचारिक : उरकणे, घिसाडघाई, जुगाड करणे, पाट्या टाकणे यांपैकी संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cutting-edge research
औपचारिक : अव्वल/अग्रणी/अद्यतन संशोधन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cybernatics
औपचारिक : सुकाणू-यांत्रिकी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
cybernatics
औपचारिक : संदेश-नियंत्रण शास्त्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
damselfly
औपचारिक : सुई
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
data colonialism
औपचारिक : विदा वसाहतवाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Data, database, data science
औपचारिक : विदा, विदागार, विदाविज्ञान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
deduplication
औपचारिक : पुनरावृत्तीे काढून टाकणे, नि:प्रतिकरण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
deep learning
औपचारिक : सखोल स्वयंशिक्षण
टिप्पणी : We don't have to make every word *totally* self-explanatory. It should be relevant and catchy. E.g. deep learning is relevant but doesn't give you the exact meaning. They didn't call it "multi layered neural networks for machine learning". They just said, "deep learning" instead. If we try to put every detail in the word, it won't be usable.
टिप्पणी : Demon is someone who is never born but scary. Monster is someone who is living and scary. Ghost is someone who is dead and scary.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
detection (like virus detection)
औपचारिक : अस्तित्वशोध, प्रकटीकरण
अनौपचारिक : आढळ
टिप्पणी : अन्वेषण हा शब्द investigation साठी वापरला जातो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
detoxification and detox diet
औपचारिक : निर्विषीकरण आणि शोधन आहार अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
devil's advocate
औपचारिक : विरोधी चष्मा, टीकामित्र
टिप्पणी : आपल्या मुद्द्यांची, विचारांची ताकद वाढवण्यासाठी/ तपासण्यासाठी विरोधी मुद्दयांसोबत त्यांचं द्वंद्व लढवलं गेलं पाहिजे. ते लढवण्यासाठी दरवेळी समोर खरोखर विरोधक असणारी व्यक्ती गरजेची नसते. विरोधाची बाजू ठामपणे मांडेलअशी आपल्याच गोटातली व्यक्ती (किंवा आपण स्वत:) चालते.
ह्यालाच "to play devil's advocate" असं म्हणतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
digitization
औपचारिक : अंकीकरण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
dignity
औपचारिक : आत्मसन्मान, स्वप्रतिष्ठा
टिप्पणी : आत्मसन्मान म्हणजे self-respect. पण तो इथेही चांगला वाटतो आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
disclaimer
औपचारिक : अस्वीकार, श्रेयअव्हेर
टिप्पणी : अस्वीकार हा रुळायला जास्त सोपा आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
discourse
औपचारिक : चर्चाविश्व, संभाषित
टिप्पणी :
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Discover and Invent
औपचारिक : Discover = सापडणे, गवसणे, शोधून काढणे, आढळणे. Invent = शोध लावणे, विकसित करणे, नवनिर्माण, करामत
टिप्पणी : research = संशोधन करणे. एखाद्या शब्दाला २ (किंवा अधिकही) अर्थ असणे हे कोणत्याही भाषेला नवीन नाही. त्यामुळे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा, तसंच एडिसनने विजेच्या दिव्याचाही "शोध लावला" असं म्हणायला हरकत नसावी, विशेषत: हे दोन्ही अर्थ मराठीत खोलवर रुजलेले असताना. केवळ इंग्रजीत २ शब्द आहेत म्हणून मराठीतही असावेत असा आग्रह नसावा. इंग्लिशमध्ये खेळण्याला आणि वाद्य वाजवण्याला असं दोन्ही ठिकाणी play म्हणतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
discussion thread
औपचारिक : चर्चासूत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
disruptive technology
औपचारिक : भेदक तंत्रज्ञान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
distraction
औपचारिक : विचलित होणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
DIY - Do It Yourself
औपचारिक : तुतुक (तुमचे तुम्ही करा)
टिप्पणी : उदा. येथे आकाश कंदिलांचे तुतुक संच मिळतील.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
documentary
औपचारिक : माहितीपट, वास्तवपट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
doodle
औपचारिक : खरडुलं
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
dough
औपचारिक : उंडा, गोळा
टिप्पणी : उदा. - पाणी घालून चांगलं मळा, आता झाला गोळा तयार.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
dragonfly
औपचारिक : चतुर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
dress code
औपचारिक : वेषसंकेत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
dry run
औपचारिक : सरावफेरी, रंगीत तालीम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ecstasy
औपचारिक : परमानंद, अत्यानंद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
elephant-in-the-Room
औपचारिक : पोपट मेला आहे, पण सांगायचे कसे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
emotional blackmail
औपचारिक : भावनिक अडवणूक, भावनिक शोषण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
empanelment
औपचारिक : समितीवर नियुक्ती, नामिकांकन
अनौपचारिक : समितीत घेणे, निवड
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
employer
औपचारिक : नियोक्ता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
encryption, decryption
औपचारिक : सांकेतिकरण, उकल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
endemic
औपचारिक : प्रदेशनिष्ठ (त्या भागात सोडून इतर ठिकाणी न रुजणारी)
टिप्पणी : endemic (प्रदेशनिष्ठ) हा शब्द मुख्यतः रोगांसाठी ऐकायला येत असला तरी तो वनस्पती, प्राण्यांच्या जातींसाठीही वापरला जातो. Local = स्थानिक,Territorial = प्रादेशिक,Endemic = प्रदेशनिष्ठ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
endocrinology
औपचारिक : अंत:स्रावविज्ञान, संप्रेरकविज्ञान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
endothermic - exothermic
औपचारिक : ऊर्जादायी - ऊर्जाग्राही
अनौपचारिक : ऊर्जादेऊ - ऊर्जाखाऊ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
entropy
औपचारिक : विखुरण
टिप्पणी : ऊर्जेचा क्षय, विरळीकरण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
epiphany
औपचारिक : साक्षात्कार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ergonomic
औपचारिक : वापरसुलभ
टिप्पणी : वापरसुलभता शास्त्र = ergonomics. उदा. ergonomically designed furniture, tractor
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
esoteric
औपचारिक : गुह्य
अनौपचारिक : तज्ज्ञगटापुरते, विशेषज्ञांसाठीचे
टिप्पणी : गुह्य' हा शब्द शक्यतो मी तंत्रपरंपरेत गुरूकडून फक्त शिष्यांकडे प्रसारित होणाऱ्या आचार, अनुष्ठान, उपासना, साधना इत्यादी ज्ञानाकरिता वापरलेला पाहिला आहे. गुह्य शब्दात फक्त शिष्य परंपरेने पुढे होणारा ज्ञानाचा प्रसार अपेक्षित दिसतो.
औपचारिक : Ex officio पदसिद्ध, De facto वास्तविक/खरा, De jure नामधारी, Retainer धारणशुल्क,Extender विस्तारक, Honourary मानद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
exaptation
औपचारिक : कार्यांतर
टिप्पणी : Exaptation is external adaptation; where an idea or method from one domain is applied in another domain. Bird feathers are a classic example: initially, they may have evolved for temperature regulation, but later were adapted for flight. This is different from adaptation.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
excitement / excited
औपचारिक : उधाण, उचंबळून येणे, उत्तेजित/उत्तेजना
अनौपचारिक : भावनांना भरते येणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
exhaust fan
औपचारिक : उलटपंखा, फेकपंखा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
exposition, conflict, climax, denouncement
औपचारिक : ओळख/परिचय/उपोद्घात, संघर्ष, कळसाध्याय, उपसंहार/उलगडा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
F for following
औपचारिक : ब (बघत आहे)
टिप्पणी : बघतांय हां वाश्या...पुलंचं वाक्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fabricator
औपचारिक : जोडतंत्री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Facebook or WhatsApp Post
औपचारिक : प्रकटन
अनौपचारिक : टपाल / मजकूर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fantasize
औपचारिक : स्वप्नरंजन करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fantasy
औपचारिक : कल्पनाविलास, मनोराज्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
farmhouse
औपचारिक : शेतघर, शेतबंगला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fashion accessories
औपचारिक : आभूषणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fastest fingers first
औपचारिक : चपळ तो सफल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
feature rich
औपचारिक : सुविधासमृद्ध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
feedback, feedback control
औपचारिक : अनुक्रमे अभिप्राय, पूर्वानुभवी नियंत्रण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fellowship
औपचारिक : अभ्यासवृत्ती
टिप्पणी : scholarship = शिष्यवृत्ती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
file
औपचारिक : फाईल, नस्ती (नस्तीकरण), धारिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
final touches
औपचारिक : शेवटचा हात
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
finally
औपचारिक : सरतेशेवटी, अखेरीस, शेवटी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fire exit
औपचारिक : आपत्कालीन मार्ग
अनौपचारिक : आग-दरवाजा, पळवाट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
flagship
औपचारिक : अग्रणी, बिनीचे, अग्रगण्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fog, mist, haze, smog, vog
औपचारिक : Fog = धुकं, Mist = दवकं, Haze = धुसरकं, Smog = धुरकं, Vog जाळ-धुरकं किंवा ज्वाला-धुरकं
टिप्पणी : Fog - कुठल्याही नैसर्गिक कारणांमुळे जेव्हा ढगांची हवा जमिनीवर (उदा. उंचावरील हील स्टेशन इत्यादी) पोहोचते तेव्हा जमिनीवर निर्माण होणाऱ्या धुक्याला Fog असे म्हणतात.
Mist - जल आणि धूळ यांचे एकत्रित द्रवी भवन होते तेव्हा पाणी हे अत्यंत छोट्या कणामध्ये हवेत जमून राहते. हे कुठल्याही दमट थंड प्रदेशात होऊ शकते. दव निर्माण होण्यास Mist कारणीभूत ठरते.
Haze - दिसण्यास अडसर ठरणारा कुठलाही धूसर प्रकार म्हणजे Haze. ह्यात प्रदूषण किंवा धूर किंवा वाळूचे वादळ येऊ शकते. ह्यात वातावरणातील पाण्याचे द्रवीभवन होणे गरजेचे नसते.
Smog - धूर आणि पाणी याचे धुरके. प्रदूषणामुळे अथवा वणवा यामुळे होऊ शकते.
Vog - एक प्रकारचा smog ज्यात धुरास कारणीभूत ज्वालामुखी असतो म्हणूनच V for volacano.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
follow-on
औपचारिक : दुबार खेळी, लोण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
follow, unfollow (in social media)
औपचारिक : जाणून घेणे आणि नाद सोडणे (अनुक्रमे)
टिप्पणी : अनुसरण म्हणजे imitating आणि अनुनय म्हणजे appeasing
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
follower (on social media)
औपचारिक : मागोवा घेणारा, वाचक/प्रेक्षक
अनौपचारिक : बघ्या
टिप्पणी : समाज माध्यमावरचा follower म्हणजे वाचक/प्रेक्षक. मी अमुकला follow करते म्हणजे मी त्याची/तिची टपालं वाचते/बघते. उदा. "फेसबुकवर क्ष व्यक्तीला मोठा वाचकवर्ग आहे", असं म्हणता येईल.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
food processor
औपचारिक : पाकयंत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
format
औपचारिक : स्वरूप
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Forward
औपचारिक : अग्रेषित
अनौपचारिक : पुढे पाठवा/ढकला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fractal
औपचारिक : पुनराकृती (पुन: + आकृती)
टिप्पणी : A fractal is a curve or geometrical figure, each part of which has the same statistical character as the whole. Similar patterns recur at progressively smaller scales.
औपचारिक : ग्राहक- स्नेही , पर्यावरण- स्नेही किंवा निसर्ग- स्नेही, वापर-स्नेही, बाल-स्नेही, स्त्रीस्नेही, माध्यमस्नेही
किंवा
वापर-सुगम, ग्राहक-सुगम इ.
टिप्पणी : याखेरीज सोयीचे, सुटसुटीत शब्द संदर्भांनुसार वापरता येतीलच. उदा. वापरण्यास सोपा, मुलांना जमेलसे / आवडेलसे, पर्यावरणपूरक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
friendzone, ditch, breakup
औपचारिक : अनुक्रमे मित्रकंपूत टाकणे, डच्चू देणे, फाटलं आहे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
from scratch
औपचारिक : अथपासून, शून्यातून
अनौपचारिक : सुरुवातीपासून
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
frontline worker
औपचारिक : आघाडीचे शिपाई/ कार्यकर्ते, बिनीवाले, पुढच्या फळीतले
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
fungible
औपचारिक : ?
टिप्पणी : Fungibility is different from liquidity. A good is said to be liquid if it can be easily exchanged for money or another good. A good is fungible if one unit of the good is substantially equivalent to another unit of the same good of the same quality at the same time, place, etc.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
futurology
औपचारिक : भविष्यवेधशास्त्र
अनौपचारिक : भाकितशास्त्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
gadget
औपचारिक : सोपेकरण/ सोपंकरण (उपकरणसारखं)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
game theory
औपचारिक : मुत्सद्दी सिध्दांत, खेळ सिद्धांत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
gaslighting
औपचारिक : बुद्धिभेद करणे, भ्रमजाल टाकणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
geeky
औपचारिक : अभ्यासू, घासू, पुस्तकी किडा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
gender diversity
औपचारिक : लिंगवैविध्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
generalist
औपचारिक : विविधांगी, हरहुन्नरी, चतुरस्र
टिप्पणी : Generalist = a person whose knowledge, aptitudes, and skills are applied to a field as a whole or to a variety of different fields (opposed to specialist). specialist = तज्ज्ञ, विशेषज्ञ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
generic
औपचारिक : प्रजातीय, प्रजाति-, जातिसामान्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
genericised trademark
औपचारिक : सामान्यनाम होणे
टिप्पणी : उदा. वनस्पती तुपासाठी डालडा हे सामान्यनाम झाले आहे, असे म्हणता येईल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
genesis
औपचारिक : प्रारंभ किंवा उगम, उत्पत्ती, जनन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
genetic makeup
औपचारिक : जनुकीय रचना
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
genocide
औपचारिक : वंशविच्छेद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
genomic sequencing
औपचारिक : जनुकीय अनुक्रम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Geograpgy common words
औपचारिक : Strait सामुद्रधुनी,
Isthmus संयोगभूमी,
Lake सरोवर,
Archipelago द्वीपसमूह,
Bay उपसागर,
Cape भूशिर,
Island द्वीप, बेट
Lagoon तळे/सरोवर,
Gulf आखात,
Peninsula द्वीपकल्प
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
geopolitics and geopolitical
औपचारिक : भौगोलिक राजकारण, भूराजकीय
टिप्पणी : geopolitical = relating to politics, especially international relations, as influenced by geographical factors.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
glacier
औपचारिक : हिमनदी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
global positioning system
औपचारिक : जागतिक स्थानदर्शक प्रणाली
अनौपचारिक : जीपी एस
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
globalism (not globalization)
औपचारिक : वैश्विकतावाद, जगएकीकरण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
grace
औपचारिक : दिमाख, डौल, ऐट, शालीनता, स्वाभिमान, धीरोदात्तपणा यांपैकी एक संदर्भानुसार वापरता येईल.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
granularity
औपचारिक : लघुतमता, (माहितीची/विदाची) सधनता
टिप्पणी : "तपशील-सधनता" सुद्धा म्हणता येईल. More granularity means more grains i.e. finer details. उदा. - We need more granularity in this chart = ह्या तक्त्यात आपल्याला अजून लघुतमता लागेल (किंवा अजून सधनता लागेल). इतका ढोबळ नको.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
graphic design
औपचारिक : चित्र आरेखन
अनौपचारिक : ग्राफिक डिझाइन्
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
grass root level
औपचारिक : तृणमूल
अनौपचारिक : तळागाळात
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
green corridor
औपचारिक : हरित मार्ग
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
green premium
औपचारिक : हरितमूल्य
टिप्पणी : The Green Premium is the additional cost of choosing a clean technology over one that emits a greater amount of greenhouse gases. The term refers to the difference in cost between a product that involves emitting carbon and an alternative that doesn’t.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
green tea
औपचारिक : हिरवा चहा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
greenhouse gas
औपचारिक : उष्णता-धारक वायू
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
group admin
औपचारिक : गट प्रशासक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
guilty pleasure
औपचारिक : चोरटी मजा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
habitat
औपचारिक : अधिवास
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hack
औपचारिक : क्लुप्ती (इथला लु टंकताना चुकीचा आला आहे), खुबी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
half sibling, step sibling
औपचारिक : सावत्र भावंडं आणि पूर्ण सावत्र भावंडं
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
halo effect
औपचारिक : वलय प्रभाव
टिप्पणी : The halo effect is a type of cognitive bias in which our overall impression of a person influences how we feel and think about their character.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hands-on
औपचारिक : संदर्भानुसार जातीने करणे, हातोपाती, प्रत्यक्ष अनुभव, हात काळे करणे
औपचारिक : आदर्श, प्रेरणास्थान, अनुकरणीय इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
high tea
औपचारिक : चहा-फराळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Hoarding
औपचारिक : जाहिरात फलक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
holocaust
औपचारिक : नरसंहार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
home delivery
औपचारिक : घरपोच सेवा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Home maker
औपचारिक : गृहकर्मी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
homophobia, homophobic
औपचारिक : समलिंगीद्वेष आणि समलिंगीद्वेष्टा अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
honeydew melon
औपचारिक : हिरबूज
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
horizontal and vertical view of justice
औपचारिक : समतल न्यायव्यवस्था आणि श्रेणीबद्ध न्यायव्यवस्था
अनौपचारिक : आडवी आणि उभी न्यायव्यवस्था
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
host, anchor, moderator in a discussion
औपचारिक : सूत्रसंचालक, चर्चा प्रवर्तक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hostel
औपचारिक : वसतिगृह, सहनिवास
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hot spot
औपचारिक : बाधित क्षेत्र, संवेदनशील क्षेत्र
टिप्पणी : संक्रमणशील हा फक्त कोरोना किंवा रोगासंदर्भात होईल. म्हणून बाधित आणि संवेदनशील हे शब्द जास्त योग्य वाटतात. ते रोग, पूर, दुष्काळ, दहशतवाद अशा सगळ्या गोष्टींना वापरता येतील. (wifi सोडून ).
मला वाटतं, लाल-पिवळा-हिरवा असे शब्द ठेवणं जास्त सोयीचं आहे (अति/सौम्य ऐवजी). एक तर त्यामुळे चटकन नकाशा नजरेसमोर येतो. शिवाय, ते सगळीकडे वापरता येतात - वाहतुकीपासून ते प्रकल्पांच्या आढाव्यापर्यंत. हे रंग आणि त्यांचे अर्थ रुळलेले आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
House husband
औपचारिक : गृहविष्णू, गृहीण
टिप्पणी : जास्त पाठिंबा मिळालेले आणि प्रचलित शब्दांच्या जवळचे गृहीण (गृहिणी) आणि गृहविष्णू (गृहलक्ष्मी) घेत आहे. गृहस्थचा वेगळा अर्थ प्रचलित आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
human supremacy
औपचारिक : मानवी वर्चस्व, मानवी श्रेष्ठत्व / सर्वश्रेष्ठता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
humourless
औपचारिक : विनोदशून्य, विनोदहीन, नीरस, अरसिक संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hyperwar
औपचारिक : स्वयंचलित युद्ध, अतियुद्ध
टिप्पणी : Hyperwar, or combat waged under the influence of AI, is where human decision making is almost entirely absent from the observe-orient-decide-act (OODA) loop.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
hypochondriac
औपचारिक : आजारभ्रमी (आजारभ्रम झालेला/ली)
टिप्पणी : आजारी नसताना आपण आजारी आहोत असं समजून चिंता करणारी व्यक्ती.
टिप्पणी : गृहीतक हा वेगवेगळ्या विषयांत तिन्हीसाठी आलटून पालटून वापरलेला आढळतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ibidem
औपचारिक : तत्रैव, कित्ता, उपरोक्त
टिप्पणी : पुष्कळ मराठी पुस्तकात "तत्रैव" आणि "कित्ता" हे शब्द वापरले जातात. किंबहुना, एका जुन्या लेखकांनी (बहुतेक चिं. वि.) यावर "कित्ता नावाच्या लेखकाने भरपूर संशोधन केलेले दिसते, जिथे तिथे त्याचेच संदर्भ वापरलेले दिसतात" असा विनोदही केला आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
identify
औपचारिक : जाणीवपूर्वक शोधणे, हेरणे,आढळणे,नजरेस येणे,टिपणे,सापडणे, लक्षात येणे, हुडकणे , दिसणे इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
identity crisis
औपचारिक : अस्मिता संभ्रम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
impact report
औपचारिक : परिणामकारकता अहवाल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
impressive, impressionable
औपचारिक : अनुक्रमे प्रभावी आणि प्रभावक्षम
टिप्पणी : Impressive म्हणजे ’जो प्रभाव पाडतो, तो’.
'Impressionable' म्हणजे = ’ज्याच्यावर प्रभाव पडतो तो’.
incubator like business incubator/technology incubator
औपचारिक : पोषकोष (किंवा पोषकोश?) - व्यवसाय पोषकोष, तंत्रज्ञान पोषकोष
अनौपचारिक : संगोपन केंद्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
industrial and corporate
औपचारिक : औद्योगिक आणि उद्योजकीय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
infinity and infinitesimal
औपचारिक : Infinity = अनंत आणि infinitesimal =अमेय / शून्यलब्धी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
inflected language and agglutinative language
औपचारिक : विकारी भाषा आणि संश्लेषित भाषा
टिप्पणी : जिथे क्रियापदांना प्रत्यय लागून रुप बदलते, नात्यांना विभक्तिप्रत्यय लागून रुप बदलते, ती भाषा inflected (विकारी)असते.संस्कृत, मराठी, हिंदी अशा भाषा आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
infodemic
औपचारिक : माहितीचा महापूर, माहितीचा मारा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
infographic
औपचारिक : माहितीचित्र
अनौपचारिक : तक्ता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
informed in informed decision, informed opinion, informed conversation
औपचारिक : माहिती-आधारित, माहितीधिष्ठित
अनौपचारिक : माहितीपूर्वक, माहितीपूर्ण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
infotainment
औपचारिक : माहितीरंजन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
innovation
औपचारिक : नवकल्पना, नवमार्ग, कल्पकता आणि (उच्च दर्जाची असल्यास) अभिकल्पना
अनौपचारिक : नवा शोध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
insight
औपचारिक : अंतर्दृष्टी, मर्मदृष्टी, मर्मज्ञान
अनौपचारिक : समज
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
insomniac
औपचारिक : निद्रा-वंचित
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
instinctive bond
औपचारिक : उपजत बंध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
integrity, grit
औपचारिक : Grit = दृढ निश्चय, चिकाटी, निर्धार आणि Integrity = सचोटी, मूल्यनिष्ठा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
interchangeable
औपचारिक : पर्यायी, बरोबरीचे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
interesting
औपचारिक : उत्कंठावर्धक, रंजक, औत्सुक्यपूर्ण, मजेशीर, रोचक इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
interesting argument
औपचारिक : रोचक युक्तिवाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
introvert and extrovert
औपचारिक : अंतर्मुख आणि बहिर्मुख
अनौपचारिक : भिडस्त आणि बोलघेवडे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
intrusion
औपचारिक : अगोचरपणा, अतिक्रमण, नाक खुपसणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
inverter
औपचारिक : वीजधारी
अनौपचारिक : वीज-तजवीज
टिप्पणी : generator = लघुजनित्र. वीज-तजवीज हा छान शब्द inverter आणि generator दोन्हीला वापरता येईल.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ironically
औपचारिक : गंमत म्हणजे, विचित्र म्हणजे, उफराटा प्रकार म्हणजे, विरोधाभास म्हणजे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
italics, bold writing
औपचारिक : तिरपा ठसा, जाड ठसा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
itinerary
औपचारिक : प्रवासरेखा, प्रवासआखणी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Jeans
अनौपचारिक : दमकोंडी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
jet lag
औपचारिक : विमानास्कता, वेळभ्रम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
journals and research papers
औपचारिक : नियतकालिक/शोधपत्रिका आणि शोधनिबंध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
judgemantal
औपचारिक : मतोत्सुक (मत-उत्सुक)
अनौपचारिक : शेरामारू
टिप्पणी : "निवाडा"चा अर्थ मुख्यत: settlement असा होतो, "judging someone" असा नाही. पूर्वग्रहदूषित म्हणजे prejudiced. Judging someone साठी मूल्यमापन हा योग्य शब्द आहे. पण "मूल्यमापनतत्पर" किंवा "मूल्यमापन-उत्सुक" हा लांबलचक आणि वापरायला. रुळायला अवघड आहे. दरवेळी शब्द ठरविताना त्यात "सगळाच्या सगळा" अर्थ आलाच पाहिजे असा हट्ट आपण सोडायला हवा, अशी आपली भूमिका आहे. मतोत्सुक हा त्यामानाने सोपा आणि बरोबर शब्द आहे. Cambridge dictionary ने opinion हा शब्द वापरलेला आहे. Cambridge dictionary : judgemental = (1)too quick to criticize people (2)tending to form opinions too quickly, esp. when disapproving of someone or something.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
juggling/multitasking
औपचारिक : अष्टावधानीपणा, बहुकार्यता
अनौपचारिक : अष्टावधानी असणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Juice Centre
औपचारिक : रसवंती गृह, रसपान केंद्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
keyhole
औपचारिक : कळछिद्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
keyword, search tags
औपचारिक : कळीचा शब्द आणि शब्द वेध अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
kneading
औपचारिक : पीठ किंवा कणिक तिंबणे/मळणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
landscape
औपचारिक : निसर्गचित्र/निसर्गचित्रण. वाटिका-रचना
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
landslide, landfall
औपचारिक : landslide = भूस्खलन, landfall = वादळ (किनाऱ्याला) धडकणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
lapse
औपचारिक : व्यपगत
टिप्पणी : सरकारी खात्यांमध्ये हा शब्द वापरला जातो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
laptop, tablet
औपचारिक : लॅपटॉप / फिरता, टॅब्लेट / हातचा
टिप्पणी : लॅपटॉप आणि टॅब्लेट मराठीत बऱ्यापैकी रुळलेले आहेत. पण ज्यांना नवे शब्द शोधून वापरायचे आहेत, त्यांनी अवश्य वापरावेत. पण ते वापरण्यासारखे, सोपे हवे.
लॅपटॉपला 'फिरता' किंवा टॅब्लेटला 'हातचा' असं काही म्हटलं तर (ज्यांना वापरायचे आहेत त्यांना) वापरता तरी येतील.
आता फिरता आणि हातचा काय? तर ते संदर्भाने कळतं. टॅब्लेट म्हणजे औषधाची गोळी कधी आणि उपकरण कधी हे समजतं तसंच. त्यासाठी लांबलचक शब्द बनवायची गरज नाही.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
legitimize
औपचारिक : वैधिकरण, नियमित करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
letterhead
औपचारिक : शीर्षपत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
leverage
औपचारिक : उचित लाभ , योग्य तो फायदा , चतुर उपयोग इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
life and livelihood
औपचारिक : जीव आणि जीविका
टिप्पणी : जीविका, उपजीविका आणि आजीविका यांच्यातील नेमका फरक हवा आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
lighter
औपचारिक : पेटवणी, पेटव्या, शिलगवणी, चकमक
अनौपचारिक : लायटर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
lineman
औपचारिक : तारतंत्री, तारयंत्री
टिप्पणी : तारतंत्री की तारयंत्री ते ठरवावे लागेल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
linguist, polyglot
औपचारिक : linguist = भाषावैज्ञानिक polyglot = बहुभाषी, बहुभाषिक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
link (http link)
औपचारिक : दुवा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
liquidation
औपचारिक : अवसायन
टिप्पणी : `अवसाय' या संस्कृत शब्दाचा अर्थ (शिल्लक गोष्टीची) किंमत काढणे, बंद करणे, शेवट करणे असे आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
loan write off
औपचारिक : बुडीत धरणे, निर्लेखित /निरस्त करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
lock down
औपचारिक : संचार नियमन
अनौपचारिक : टाळेबंदी
टिप्पणी : वृत्तपत्रे टाळेबंदी म्हणत आहेत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
logistics
औपचारिक : हाताळणी व्यवस्था, रसद आखणी, संसाधन व्यवस्था
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
lots (of goods)
औपचारिक : गठ्ठे, गासड्या, तुकडया, संच इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Loud speaker
औपचारिक : ध्वनिवर्धक
अनौपचारिक : बोंबल्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
machine learning
औपचारिक : स्वयंशिक्षण
टिप्पणी : We don't have to make every word *totally* self-explanatory. It should be relevant and catchy. E.g. deep learning is relevant but doesn't give you the exact meaning. They didn't call it "multi layered neural networks for machine learning". They just said, "deep learning" instead. If we try to put every detail in the word, it won't be usable.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
maintenance charges
औपचारिक : देखभाल शुल्क
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mania, hypomania
औपचारिक : उन्माद आणि उन्मादसदृश अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mansplain
औपचारिक : पुरुषिकवणी
टिप्पणी : the explanation of something by a man, typically to a woman, in a manner regarded as condescending or patronizing. उदा. "त्याने पुरुषिकवणी चालू केली" किंवा "तू मला पुरुषिकवू नकोस."
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
manual (opposite mechanical or automatic)
औपचारिक : मनुष्यहाती, श्रमचालित
टिप्पणी : उदा. - ही श्रमचालित सायकल आहे किंवा हे यंत्र मनुष्यहाती चालते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
manual scavenging
औपचारिक : अमानुष भंगीकाम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
marination
औपचारिक : मुरवण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
maritorious, uxorious
औपचारिक : नवऱ्याच्या तालावर नाचणारी आणि बायकोच्या तालावर नाचणारा अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
marsupial
औपचारिक : पिशवीधारी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
marsupial
औपचारिक : पिशवीधारी
टिप्पणी : कांगारू सारखे (प्राणी)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mask
औपचारिक : संपूर्ण चेहऱ्यासाठी = मुखवटा, सुरक्षेसाठी = मुखपटल
अनौपचारिक : मुसकी (सुरक्षेसाठी)
टिप्पणी : मुसकी असा शब्द कोकणात प्रचलित आहे. तो मुख्यतः प्राण्यांसाठी वापरतात. पण वाक्प्रचार म्हणून मुसक्या आवळणे असे सगळेच म्हणतात. मुळात मुस्कट हा शब्द तोंड (थोबाड) यासाठी वापरतातच. त्यात ओठ आणि गाल दोन्ही येतात. मुस्काड , मुस्काट असेही आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
meadow
औपचारिक : मोकळवण
टिप्पणी : कुरण'सारखे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
meat substitute
औपचारिक : प्रतिमांस
टिप्पणी : मांसाहार वाटेल असा (खाऊन कळणे अवघड) शाकाहारी पदार्थ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
meeting
औपचारिक : बैठक. seminar = चर्चासत्र, conference = परिषद, discussion = चर्चा
टिप्पणी : बैठक रुळलेला आहे. म्हणून तोच ठेवावा.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
melody
औपचारिक : सुरावट, स्वरमाधुर्य, सूरमालिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
meme
औपचारिक : सोंग, मनुक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
memorandum of understanding.
औपचारिक : सामंजस्य करार , सहमती पत्रक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mental block
औपचारिक : मती कुंठित होणे, मानसिक अडसर, मनकोंडी
अनौपचारिक : अडथळा, तुंबा
टिप्पणी : मती कुंठीत हा आधीपासूनच प्रचलित आहे. थोड्या वेगळ्या छटा येणारे आणि चांगले दोन नवे शब्द घेत आहे.मानसशास्त्रात भयग्रस्त म्हणतात. इथे रोजच्या वापरासाठी आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
menu card
औपचारिक : पदार्थ सारणी, पदार्थ यादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
merger, demerger
औपचारिक : Merger = विलीनीकरण, demerger = निर्विलिनीकरण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
messy
औपचारिक : लडबडलेले,गचाळ, गलथान, गबाळग्रंथी, अस्ताव्यस्त, घोटाळकाला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
meta
औपचारिक : परा, पार
टिप्पणी : higher; beyond. अधिक उच्च; पलीकडचा, पर-, पार-, अधि-.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
metalled road
औपचारिक : खडीचा रस्ता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
method, procedure
औपचारिक : method = पद्धत, procedure = कार्यपद्धती / प्रक्रिया
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
microwave oven
औपचारिक : तरंगचूल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mindfulness
औपचारिक : अवधान, तद्रुपता, क्षणस्थ असणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
minimalism
औपचारिक : मितवाद, मितनिष्ठा
टिप्पणी : संबंधित शब्द minimalist, minimalistic = मितवादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
misinformation
औपचारिक : अपमाहिती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
misinformation, disinformation, mal-information
औपचारिक : Disinformation = माहितीकपट
Misinformation = अपमाहिती, गैरमाहिती
Mal-information = विपर्यास, माहितीविक्षेप
टिप्पणी : Misinformation म्हणजे चुकीची माहिती, अफवा इ. पण ही मुद्दाम, हेतुपुरस्सर नसते. Disinformation ही मुद्दाम, खोडसाळपणे पसरवलेली चुकीची माहिती असते. Mal-information खऱ्या माहितीवर आधारित पण संदर्भ बदलून किंवा निवडक गोष्ट उचलून कुठल्यातरी गटाला/व्यक्तीला बदनाम किंवा लक्ष्य करायला वापरली जाते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
misnomer
औपचारिक : अपसंज्ञा
टिप्पणी : पूर्वीच्या काळी जेव्हा मोठ्या घंटेवर किंवा तासावर आघात करून, वाजवून वेळ सांगितली जायची त्यामुळे वेळ सांगताना "किती वाजले" असा शब्दप्रयोग आला, पण आता घड्याळाचा शोध लागल्याने "किती वाजले" ही अपसंज्ञा होईल.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Mobile phone
औपचारिक : भ्रमणध्वनी, भ्रमणभाष
अनौपचारिक : कानशा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Model
औपचारिक : रूपक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
modular kitchen
औपचारिक : भागजोड स्वयंपाकघर, आधुनिक स्वयंपाकघर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
modus operandi and modus vivendi
औपचारिक : रीती आणि नीती (अनुक्रमे)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
moisturizing lotion
औपचारिक : ओलावा-लेप
अनौपचारिक : ओलेप
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
monetary system
औपचारिक : चलनपद्धती किंवा चलनव्यवस्था
टिप्पणी : मनी या शब्दाला सहसा द्रव्य आणि वित्त हे पर्याय (संदर्भानुसार) वापरतात. मॉनेटरी सिस्टिम म्हणजे चलनपद्धती अथवा चलनव्यवस्था असे म्हणणे योग्य.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
money laundering
औपचारिक : धनसफेदी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
monitoring
औपचारिक : संनियंत्रण (शासकीय भाषेत)
अनौपचारिक : लक्ष ठेवणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
morpheme
औपचारिक : पद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mother of pearl
औपचारिक : कार्शन
टिप्पणी : म्हणजे शिंपल्यातील आतील बाजू. ही मोत्या सारखीच चकचकीत,पांढरी, सप्तरंगी झाक असलेली असते.पाश्र्चात्य देशांत यापासून अनेक शोभेच्या वस्तू तयार करतात.सजावटी साठी वापरतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
motivational speaker
औपचारिक : प्रेरणादायी वक्ता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mulch
औपचारिक : कीट (बुंथ किंवा आच्छादनही म्हणता येईल).
टिप्पणी : जमिनिचा कस वाढण्यासाठी (पालापाचोळ्याचे) आच्छादन. कोकणात शेतकरी 'कीट' असा शब्द वापरतात.
कसा कीट तयार झाला हा ता बघा. झाडाना एवडा एवडासा कीट घातला ना की बघा कशी वर येतत ती.
वइनी, कीट नाय काय ओ?
काही जण खाजं असंही म्हणतात. दोन्हीत साचणं आणि कुजणं असे अपेक्षित असते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
multi modal transit hub
औपचारिक : बहुआयामी स्थानक, मिश्र परिवहन स्थानक
अनौपचारिक : स्थानक
टिप्पणी : शहरात एखाद्या ठिकाणी आल्यावर दुसरे वाहन करून इच्छित स्थळी जावे लागते. अशा वेळी वाहतुकीचे साधन बदलायची सोय त्याच संकुलात असावी. अनेकदा अशा सोयी विमानतळ / मुख्य रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी असू शकतात, पण त्यापुढे जाऊन शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी अशा सुनियोजित सोयी असाव्यात. त्यात केवळ एक बस बदलून दुसरी बस नव्हे, तर बस, रिक्षा, ट्रेन, भाड्याची सायकल अशा अनेक साधनांची सोय म्हणजे Multi modal transit hub.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
multi-scale
औपचारिक : बहुश्रेणी, बहुस्तरीय
टिप्पणी : एखाद्या वस्तूच्या एखाद्या गुणधर्माची किंमत परिगणित करायची असल्यास त्याच्या अगदी छोट्या (काही मायक्रोमीटर) भागाचेही गुणधर्म विचारात घेणे व थोड्या ढोबळपणे (काही मीटर आकारात) सुद्धा गुणधर्म विचारात घेणे आणि त्यांचा एकत्रित परिणाम विचारात घेऊन इच्छित राशी परिगणित करणे, म्हणजे multi-scale approach.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
musing
औपचारिक : चिंतन, मनन, मनोगत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mutation
औपचारिक : जनुकांतर, जनुक-बदल
अनौपचारिक : फेरफार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
mutual friend
औपचारिक : सामायिक मित्र
अनौपचारिक : दोघांचाही मित्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
N.A.
औपचारिक : ला, ना. (लागू नाही), बिगर शेती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
narcissist
औपचारिक : आत्मलुब्ध
टिप्पणी : स्वत:वर लुब्ध, स्वत:च्याच प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
narrative
औपचारिक : कथन
टिप्पणी : setting the narrative for elections= निवडणुकांसाठी राजकीय कथन सुरू करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
nature-nurture-culture-signature
औपचारिक : जनुक-संस्कार-संस्कृती व्यक्तिमुद्रा. जनुकीय संचित, कौटुंबिक संस्कार,भोवतालची संस्कृती (या तीन घटकांतून)अस्तित्वमुद्रा.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
need-blind
औपचारिक : गरज-निरपेक्ष
टिप्पणी : गरज विचारात न घेता. This term means an institution has an official policy of not considering applicants' financial resources when deciding whether to offer them a place.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Negative reinforcement
औपचारिक : निरुत्साहन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
net in net force, net emission, net income
औपचारिक : निव्वळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
neural network
औपचारिक : ज्ञानतंतू जाल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
new normal
औपचारिक : नवसामान्य, नवा पायंडा, नवी वहिवाट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
niche skill
औपचारिक : विशिष्ट कौशल्य, विशेष कसब
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
node
औपचारिक : तिठा, चौक, नाका, मिलनस्थान संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
non-zero
औपचारिक : शून्येतर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
normative
औपचारिक : आदर्शवादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
nostalgia
औपचारिक : गतरम्यता, स्मरणरंजन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
nostalgic
औपचारिक : गतरम्य, स्मृतिकातर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Notice board
औपचारिक : सूचनाफलक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
novel corona virus
औपचारिक : नूतन कोरोना विषाणू
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
nuances
औपचारिक : बारकावे, कंगोरे
टिप्पणी : बारकावे हे तपशीलाशी तर कंगोरे हे अर्थ छटांशी निगडित असू शकतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
nudge
औपचारिक : हळूच चावी मारणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
obsession
औपचारिक : वेड, नाद, झपाटलेपण, गारुड, मंत्रचळ इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
occupancy letter, certificate
औपचारिक : भोगवटा पत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
occupational therapy
औपचारिक : व्यवसायोपचार, कृतिजन्य उपचारपद्धती, श्रमातून मिळणारी मन:शांती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
OCD obsessive compulsive disorder
औपचारिक : मंत्रचळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
odd man out
औपचारिक : उपरा, विसंगत, वेगळा, अपसंची इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
oddball
औपचारिक : मुलखावेगळा, तऱ्हेवाईक संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
omelette
औपचारिक : अंडापोळी, अंडोळी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
online , offline
औपचारिक : जालप्रकट, जालगायब
अनौपचारिक : ऑनलाईन, ऑफलाईन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
open a can of worms
औपचारिक : मोहोळ उठवणे, मोहोळावर दगड मारणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
opinionated ideology
औपचारिक : पूर्वग्रही विचारप्रणाली
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
opportunity cost
औपचारिक : संधिमूल्य
अनौपचारिक : संधीची किंमत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
order, packing, delivery, courier
औपचारिक : मागणी, बांधाबांध/गाठोडे, वितरण/पोचवणी/पाठवणी,वितरणसेवा/जासुदसेवा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
orgasm
औपचारिक : चरमबिंदू
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
orgaziner
औपचारिक : संघटक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
out of the box
औपचारिक : चौकटीबाहेर, चाकोरीबाहेर, चाकोरी मोडून, अभिनव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
outlier
औपचारिक : पठडीबाहेरचा, चाकोरीबाहेरचा, परिघाबाहेरचा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
outsourcing
औपचारिक : उक्ते देणे
अनौपचारिक : बाहेरून काम करून घेणे, बाहेर काम देणे इ.
टिप्पणी : दरवेळी सगळा अर्थ शब्दात आलाच पाहिजे, असा हट्ट नाही. जवळचा, सोपा, रुळलेला म्हणून "उक्ते" चांगला आहे. to outsource - उक्ते देणे, outsourcing - उक्तवारी.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
overreact
औपचारिक : आक्रस्ताळेपणा, आकांडतांडव, पराचा कावळा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
overview effect
औपचारिक : अवलोकन प्रभाव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
overwhelmed
औपचारिक : (भावनेने) भारावून जाणे / सद्गदित होणे, (कामाने) जीव दडपून जाणे
अनौपचारिक : अति होणे, खूप होणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
oxymoron
औपचारिक : वदतो व्याघात
टिप्पणी : उदा. कर्कश्श शांतता, भयंकर आवडलेला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
palindrome
औपचारिक : सर्वतोभद्र (संस्कृत) आणि मुरजबंध हिंदी
अनौपचारिक : सतततस
टिप्पणी : सर्वतोभद्र हा शब्द मंदिर स्थापत्य आणि मूर्ती शास्त्रातही वापरतात- चारही बाजूंनी समान दिसणारी रचना. वराहमिहीरने जादुई गणिती चौरसांना (magic squares) सर्वतोभद्र असे नाव दिले होते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pallet (used in warehouse)
औपचारिक : पाट
टिप्पणी : पाट चांगला आणि सोपाही आहे. शिवाय पॅलेटशी साधर्म्य आहे. त्यामुळे सहज रुळेल. (हा लाकडी फळ्यांचा गोदामात वापरतात)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Pamphlet
औपचारिक : माहितीपत्रक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pandemic, epidemic
औपचारिक : pandemic = जागतिक महासाथ, जागतिक महामारी. epidemic = प्रादेशिक साथ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
parachute
औपचारिक : हवाई छत्री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
paradigm
औपचारिक : परिदर्श
अनौपचारिक : ढाचा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
paranoia/paranoid
औपचारिक : भयभ्रम /भयशंक/कटशंक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Passive immunization
औपचारिक : प्रतिपिंडांची लस
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
passive-aggressive
औपचारिक : छुपा आक्रमक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
patent
औपचारिक : एकस्व
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
paternalism
औपचारिक : पालकवाद
अनौपचारिक : बापगिरी
टिप्पणी : जिथे पालकत्वाच्या भूमिकेतून दुसऱ्याच्या चांगल्यासाठी त्याच्या/तिच्या वर्तनाचे नियंत्रण करत असल्याचा दावा असतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
patron
औपचारिक : आश्रयदाता, पाठीराखा, आधारस्तंभ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pecan nut
औपचारिक : पिकान काजू, गोडा अक्रोड
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pendrive
औपचारिक : पेंद्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
performance
औपचारिक : कामगिरी (काही वेळा सादरीकरण. उदा. - गाण्याचं)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
performing art
औपचारिक : ललित कला, प्रयोगक्षम कला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
periodization
औपचारिक : कालखंड निर्णयन
टिप्पणी : categorizing past into discrete blocks of time. उदा. मौर्यकाळ, स्वातंत्र्यपूर्व काळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
peripheral vision
औपचारिक : कडेची दृष्टी, काठावरची दृष्टी, परिघीय दृष्टी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
personalized, customized
औपचारिक : अनुक्रमे व्यक्तीनुरूप आणि हवे तसे/लागेल तसे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
phase
औपचारिक : टप्पा, खंड, अध्याय, अवस्था इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
phobia
औपचारिक : भयगंड
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
phone/tone
औपचारिक : स्वन
टिप्पणी : भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना स्वन म्हणतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
phonetic
औपचारिक : उच्चारसंगत (तर्कसंगत सारखा), उच्चारसुसंगत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
photo album
औपचारिक : छबीसंग्रह
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
placebo
औपचारिक : आभासी औषध, विश्वासोपचार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
playgroup. nursery, jr and senior KG
औपचारिक : playgroup = खेळगट, nursery = शिशुगट, KG = बालगट ( लहान, मोठा)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
plural voting
औपचारिक : अतिरिक्त मताधिकार, अनेकमताधिकार
टिप्पणी : एका व्यक्तीला एकाहून अधिक मते देण्याचा अधिकार असणे किंवा त्याच्या मताला एकाहून अधिक मतांचे वजन असणे या अर्थी Plural voting हा शब्दप्रयोग वापरला आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
polemics
औपचारिक : खंडन मंडन, धर्ममीमांसा, धर्मचर्चा
टिप्पणी : polemics मध्ये इतर धर्मांच्या काही मतांवर आक्षेप घेण्याचा आक्रमणात्मक भाग असतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
policy, strategy, tactics, diplomacy
औपचारिक : policy=धोरण, strategy=रणनीती/नीती/व्यूहरचना, tactics= डावपेच, diplomacy = राजनय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
political economy
औपचारिक : अर्थकारण, आर्थिक रणनीती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
politics of identity
औपचारिक : अस्मितेचे राजकारण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
polymath
औपचारिक : बहुज्ञ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
portmanteau
औपचारिक : समास (अक्षरलोपी समास), संयोगशब्द
टिप्पणी : दोन शब्दांना जोडून एक शब्द बनवणे - उदाहरणार्थ web-based seminar = webinar किंवा विरुष्का
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
portmanteau
औपचारिक : संयोगशब्द, अक्षरलोपी समास
टिप्पणी : Portmanteau मध्ये गम्मत अशी आहे की बर्याचदा एका शब्दातील आधीचा अर्धा भाग आणि दुसर्या शब्दातील नंतरचा अर्धा भाग वापरतात. उदाहरणार्थ, webinar, motel, podcast, etc.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
portrait
औपचारिक : व्यक्तिचित्र, रुपचित्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pose
औपचारिक : मुद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
positivism
औपचारिक : प्रत्यक्षार्थवाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Poster
औपचारिक : भित्तीपत्रक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pot luck (pot lunch)
औपचारिक : अंगतपंगत, गोपाळकाला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
preamble
औपचारिक : पूर्वपीठिका, उद्देशिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
prebiotic
औपचारिक : जैविक घटक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
predictable
औपचारिक : भाक्य, सहजभाक्य
अनौपचारिक : ठरीव, साचेबद्ध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
preloved
औपचारिक : जपलेले
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
prescription
औपचारिक : औषधांची चिठ्ठी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
presstitude
औपचारिक : आश्रित माध्यमे
अनौपचारिक : विकाऊ पत्रकार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
prima facie
औपचारिक : सकृतदर्शनी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
prime time
औपचारिक : प्रमुख वेळ, मोक्याची वेळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
privileged background
औपचारिक : भाग्यशाली पार्श्वभूमी, समृद्ध वारसा/परंपरा
अनौपचारिक : जन्म-मटका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Pro bono
औपचारिक : जनहितार्थ, नि:शुल्क
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proactive
औपचारिक : स्वयंस्फूर्त, पुढाकार घेणारा/घेणारी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
probiotic
औपचारिक : जैवअनुकूल / जैवानुकूल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
problem of plenty
औपचारिक : भारंभार पर्याय, नको तेवढे पर्याय, भरपूरचा भस्मासुर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
prodigy/gifted child
औपचारिक : बालबृहस्पती, बालपंडित
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proof in childproof, waterproof, foolproof etc
औपचारिक : प्रतिबंधक / रोधक / रोधी / सुरक्षित
टिप्पणी : उदा. जलरोधी, बालकरोधी, मूढरोधी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proof phase and scale-up phase
औपचारिक : चाचणी टप्पा आणि विस्तार टप्पा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proof reading
औपचारिक : मुद्रितशोधन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proofing (for bread)
औपचारिक : फुगायला ठेवणे,फूग आणणे, फुगवण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Prototype
औपचारिक : प्रारूप
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
proximity bias
औपचारिक : सामीप्यग्रह
टिप्पणी : Proximity bias is the tendency to overestimate the prevalence of social phenomena (or performance) because it is closer to you.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
pseudo
औपचारिक : व्याज (उदा. - व्याजस्तुती, व्याजतर्क),
आभासी, छद्म, नकली
टिप्पणी : निर्व्याज हा विरुद्धार्थी शब्द
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
public database
औपचारिक : सार्वजनिक विदागार, खुले विदागार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
quality time
औपचारिक : निगुतीने दिलेला वेळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
qualms
औपचारिक : संदर्भानुसार तमा, फिकीर, संकोच, चलबिचल इ.
टिप्पणी : उदा. (१) I have no qualms in stating that .... -- याचे भाषांतर करताना '.... अमुकामुक ... असे (स्पष्टपणे) म्हणताना मला मुळीच संकोच वाटत नाही' असे लिहावे लागेल. (२) He had no qualms in committing that unlawful act -- यासाठी, 'ते बेकायदेशीर कृत्य करताना त्याने कसलीही फिकीर/तमा बाळगली नाही' असे म्हणता येईल.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
quantum
औपचारिक : पुंज
टिप्पणी : quantum physics = पुंज भौतिकी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
quantum field
औपचारिक : पुंजक्षेत्र
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
quarantine
औपचारिक : विलगीकरण, विलग करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
queer theory
औपचारिक : विलैंगितेचा सिद्धान्त
टिप्पणी : वि हा विशिष्ट गोष्ट दाखवतो
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Quid pro quo
औपचारिक : देवाण-घेवाण, मांडवली
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
quintessential
औपचारिक : व्यवच्छेदक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rainwater harvesting
औपचारिक : पर्जन्यसंचय
अनौपचारिक : पाऊस साठवण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
random
औपचारिक : यादृच्छिक, अनियत
अनौपचारिक : अनियत
टिप्पणी : अनियत हा 'अकारण'च्या धर्तीवर - योग्य आणि सोपा आहे.
सनियत - अनियत असे शब्द वापरता येतील.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
reactive
औपचारिक : प्रतिक्रियाशील
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ready reckoner
औपचारिक : संदर्भदर सूची, मानकदर सूची
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
real time
औपचारिक : तत्क्षणीचं, क्षणोक्षणीचं, सद्यस्थितीतील इ. संदर्भानुसार
टिप्पणी : उदा. real time guidance system = क्षणोक्षणी मार्गदर्शन करणारी यंत्रणा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
receptor
औपचारिक : प्रापक, संग्राहक, ग्राहक
टिप्पणी : प्रापक, संग्राहक हे शासन व्यवहार कोशात आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
reciprocation
औपचारिक : पारस्परिकता, उभयान्वय
अनौपचारिक : प्रतिसाद
टिप्पणी : व्यवहारात किंवा मैत्रीत असणारे साद-प्रतिसाद संबंध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
recovery (in business)
औपचारिक : पूर्वपदावर येणे, पूर्वस्थितीत येणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
recycle, upcycle
औपचारिक : recycle = पुनर्वापर/पुनर्चक्रीकरण, upcycle = नववापर
टिप्पणी : नववापर उदा. जुन्या कपड्यांची पिशवी शिवणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Reductionist behaviorism
औपचारिक : रूपांतरित वर्तनवाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Reference
औपचारिक : संदर्भ, निर्देश्य
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rehoming
औपचारिक : पुनर्वसन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
reimagine
औपचारिक : नवविचार, नवकल्पना
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
reminder
औपचारिक : स्मरणनोंद,स्मृतिगजर, आठवणगजर
अनौपचारिक : आठवंजर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rendezvous
औपचारिक : नियोजित भेट, संकेतभेट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
renewable fuel
औपचारिक : शाश्वत इंधन, शाश्वत ऊर्जास्रोत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
repechage
औपचारिक : पुनर्संधी
टिप्पणी : कुस्ती, नौकानयन इ. खेळांमध्ये पुन्हा एकदा संधी मिळणारी फेरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
repoussé
औपचारिक : ठोककाम, ठोक्याचं नक्षीकाम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
resonance
औपचारिक : अनुनाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
resource person
औपचारिक : साधन व्यक्ती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
result oriented approach
औपचारिक : साध्य केंद्रित दृष्टिकोन
अनौपचारिक : लक्ष्यावरची नजर हटू देत नाही
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
review, feedback
औपचारिक : Feedback = अभिप्राय, प्रतिक्रिया Review = आढावा, पुनरावलोकन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rhetorical question
औपचारिक : सूचक प्रश्न
टिप्पणी : rhetorical question = a question asked to make a point rather than to get an answer.
उदा. - पाण्याचा टँकरच कसा गळतो, तेलाचा का नाही? किंवा "आपल्याला जिंकायचंय की नाही?" किंवा "त्याने सरी घातली म्हणून आपण दोरी घालणार का?"
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
right handed
औपचारिक : उजखुरा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
risk mitigation
औपचारिक : जोखीम व्यवस्थापन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
road and street
औपचारिक : "रस्ता = Road" आणि "पथ = Street".
टिप्पणी : रस्ता = जास्त वेगवान वाहतूक, वाहनांसाठी. पथ = सावकाश, सगळ्यांसाठी, पादचाऱ्यांचा विचार.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
roadmap
औपचारिक : योजनाचित्र, आराखडा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rollercoaster ride
औपचारिक : रोमहर्षक, श्वास रोखून ठेवणारी, चित्तथरारक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
romanticism
औपचारिक : छायावाद, कल्पनारम्यतावाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
rubric
औपचारिक : निकष-कोष्टक, निकष-तक्ता
टिप्पणी : rubric म्हणजे काही निकष आणि त्यांचं महत्त्व किंवा मूल्यमापन ह्यांचा तक्ता/कोष्टक असतं. ते मुख्यतः शिक्षण क्षेत्रात वापरलं जातं. पण इतर ठिकाणीही वापरतात. उदा. कार्यालयातल्या कामाचं किंवा एखाद्या प्रकल्पाचं मूल्यमापन करायला.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
running buddy, walking buddy
औपचारिक : पळसाथी, चालसाथी
टिप्पणी : उदा. - शेजारच्या आजी-आजोबांबरोबर मी सकाळी फिरायला जाते. ते माझे "चालसाथी" आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sanitizer
औपचारिक : जंतुनाशक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Scattering
औपचारिक : विकीरण
अनौपचारिक : पसरणे
टिप्पणी : scattered = विकीर्ण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
scavenger
औपचारिक : scavenger प्राणी असल्यास मृतभक्षी. सफाई करणाऱ्या लोकांना 'सफाई कर्मचारी'.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
scenario
औपचारिक : दृश्यस्थिती, परिस्थिती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
scroll
औपचारिक : चाळणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sea mail
औपचारिक : दर्याडाक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
seafood
औपचारिक : म्हावरं, सागरमेवा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
seaplane
औपचारिक : जलविमान, सागरी विमान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
searchable
औपचारिक : शोधसुकर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
seasick
औपचारिक : बोट लागलेला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
season (of TV serial)
औपचारिक : पर्व, सत्र
अनौपचारिक : हंगाम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
secularism
औपचारिक : धर्मनिरपेक्षता, इहवाद (?)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
self belief
औपचारिक : आत्मधारणा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
self-fulfilling prophecy
औपचारिक : स्वयंपूर्त भाकीत/ स्वयंसिद्ध भाकीत /स्वयंपूर्त भविष्यवाणी
टिप्पणी : उदा. - एखादी व्यक्ती आपल्याला महत्त्वाचं काम/प्रकल्प देणार नाही अशी अटकळ बांधून / भाकीत करून आपण त्या व्यक्तीशी फटकून वागतो, अंतर ठेवतो. त्यामुळे संबंध बिघडतात आणि खरोखरीच काम मिळत नाही.
किंवा उलटही. आपण गुणवंत आहोत असं समजल्यामुळे एखाद्या विषयात खूप काम केले जाते, भर दिला जातो आणि त्यामुळे खरोखरीच त्यात गती निर्माण होते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
self-medication
औपचारिक : स्वयं-उपचार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
selfie
औपचारिक : स्वछबी
अनौपचारिक : स्वचि (स्वचित्र)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sense of entitlement
औपचारिक : अधिकारभान (सकारात्मक), अवाजवी अधिकार वाटणे (नकारात्मक)
अनौपचारिक : बापाचा माल (नकारात्मक)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sense of proportion
औपचारिक : प्रमाणभान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sense of risk
औपचारिक : जोखीमभान
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sense perception
औपचारिक : ऐंद्रिय आकलन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
serf
औपचारिक : गुलाम, दास, भूदास
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sermon on the mount
औपचारिक : गिरिप्रवचन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sexism, sizeism, ageism
औपचारिक : लिंगभेद, शरीरठेवण भेद / चणभेद, वयोभेद अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
shape. size
औपचारिक : shape = घाट, बांधा size = माप, प्रमाण. "आकार" हा शब्द संदर्भानुसार दोन्हीसाठी.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sharing a post
औपचारिक : टपाल प्रसारित करणे, सहप्रचीत करणे
टिप्पणी : पोस्ट साठी आपण टपाल (अनौपचारिक) घेतलेला आहे. खरं तर, "पोस्ट शेअर" सुद्धा रुळलेला आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
shellfish
औपचारिक : तिसऱ्या, शिंपल्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
signboard
औपचारिक : निर्देशपाटी
अनौपचारिक : पाटी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
simulation/ simulate
औपचारिक : प्रतिरूप करणे आणि सदृशीकरण
टिप्पणी : Simulation साठी प्रतिरूप आणि सदृशीकरण घेत आहे. उदा. - (१)वैमानिक आधी प्रतिरुपावर शिकतो आणि मग विमानात जातो.
(२) भविष्यात काय होईल ह्याचं आपल्या मेंदूत सदृशीकरण होत असतं आणि त्यातून मनाची तयारी होते.
(३) संगणकावर आम्ही तुम्हाला प्रतिरूप करून दाखवतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
skit
औपचारिक : नाटिका
टिप्पणी : १) स्किट - नाटिका. रेडिओ वरील नाटिकेला श्रुतिका (ती फक्त ऐकायची म्हणून). साधारण २०-२५ मिनिटे चालणाऱ्या सगळ्याच नाटकांना हा शब्द वापरतात.
२) नाट्यछटा - एकाच कलाकाराने केलेलं छोटं (१ तासांपर्यंत) केलेलं सादरीकरण. त्यापेक्षा जास्त वेळ असेल तर त्यालाच एकपात्री प्रयोग म्हणतात.
३) एकांकिका - अर्धातास ते १ तास चालणारे नाटक.
४) दीर्घांक - दीड तासांपर्यंत चालणारे नाटक
५) नाटक - दोन तास किंवा त्यापुढे कितीही वेळ चालणारा नाट्य प्रयोग.
बाकी प्रहसन शोकांतिका वगैरे त्या त्या नाट्यप्रयोगातील मनोरंजनाचा प्रकार झाला.
विशेष टीप - स्किटस् शक्यतो विनोदी प्रहसनात्मक असतात. इतर मनोरंजनाचे प्रकार (शोकांतिका, वीरगाथा, प्रेम कथा) नाटिका या प्रकारात तितकेसे खुलत नाहीत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
skywalk/skybridge
औपचारिक : आकाशपथ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
slow poisoning
औपचारिक : संथ विषप्रयोग, संतत विषप्रयोग
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
small town
औपचारिक : शहरगाव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
smiley
औपचारिक : स्मिताली
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
smog
औपचारिक : धुरके
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
snail mail
औपचारिक : कूर्मपत्र
टिप्पणी : Snail mail is a letter carried by conventional postal delivery services.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
snooze
औपचारिक : बटनाला "स्थगित" आणि कृतीला "शेपूटझोप"
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
social and prosocial behaviour
औपचारिक : सामाजिक वर्तन आणि समाजाभिमुख वर्तन अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
social conditioning
औपचारिक : सामाजिक संस्कार, सामाजिक जडणघडण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
social distancing
औपचारिक : वावर संहिता (आचार संहितेच्या धर्तीवर)
अनौपचारिक : वावर आवर
टिप्पणी : उदा. - सध्या वावर संहितेमुळे लग्नकार्ये होत नाहीत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Social Media, likes
औपचारिक : समाज माध्यम, पसंती
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
soft power
औपचारिक : सौम्य वर्चस्व
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
soft target
औपचारिक : सोपं सावज, आयते गिऱ्हाईक, कुणीही यावे टपली मारून जावे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
solicitor general
औपचारिक : महान्यायवादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
some disease/covid positive
औपचारिक : बाधित, ग्रस्त
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
somebody's network
औपचारिक : परिवार, गोतावळा, गणगोत, परिचित, जनसंपर्क लोकसंग्रह, मित्रपरिवार, संपर्कजाल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sophisticated / sophistication
औपचारिक : अभिरुचीपूर्ण / अभिरुची. आधुनिक / आधुनिकता (काही वेळा)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sorority
औपचारिक : भगिनीभाव, भगिनीसमाज
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
soulmate
औपचारिक : आत्मसखा/सखी, प्राणसखा/सखी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
soundscape
औपचारिक : नादचित्र, ध्वनिपट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
speculation, conjecture, hunch
औपचारिक : अटकळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
spoiler alert
औपचारिक : रहस्य विचका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
spring (in appliance/tool)
औपचारिक : उसंडिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stakeholders
औपचारिक : हितसंबंधी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stand (for camera, phone etc)
औपचारिक : अडणी
टिप्पणी : बंब, शंख, कॅमेरा अशा कुठल्याही गोष्टींसाठी जो "स्टॅन्ड" असतो, त्याला अडणी म्हणता येते.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
standpoint theory
औपचारिक : स्थान विशिष्टता सिध्दांत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stem cell
औपचारिक : मूळपेशी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stepany
औपचारिक : बदलीचाक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stepping stone
औपचारिक : पायरी, शिडी, पहिली पायरी, पायरीचा दगड, टेकू इ. संदर्भानुसार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stereotypical
औपचारिक : साचेबद्ध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stipend, honorarium
औपचारिक : Stipend = विद्यावेतन, honorarium = मानधन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
stopwatch
औपचारिक : थबकघड्याळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
streetsmart
औपचारिक : चलाख, व्यवहारचतुर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
suave
औपचारिक : साळसूद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
subtext
औपचारिक : आंतरसंहिता
टिप्पणी : उदा. "मोकळा अवकाश असलेल्या संहिता एकार्थ राहत नाहीत. त्याला अनेक आंतरसंहिता असतात आणि नट त्यातली कुठली पृष्ठभागावर आणतात त्यावर त्या त्या क्षणी नाटकाचा अर्थ ठरत असतो." - एलकुंचवार.
आंतर बरोबर आहे का?. अंतर्संहिता, सुप्तसंहिता असे हवे का?
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
subversion (of political/cultural system)
औपचारिक : उच्छेद, उलथवणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
succession
औपचारिक : वारसा, वारसाहक्क
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
suggestion
औपचारिक : सुचवणी / सुचवण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
summons
औपचारिक : हजेरी-आदेश
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sunny side up
औपचारिक : बलकवर, मोतिया, सूर्यमुखी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Suo Motu
औपचारिक : स्वाधिकारे, स्वत:हून
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
super (superwoman, supercomputer, super spreader, supercritical)
औपचारिक : महा
टिप्पणी : बहुतेक ठिकाणी "महा" चालेल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
super-spreader
औपचारिक : अतिसांसर्गिक, अतिप्रसारक, शीघ्र संवाहक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
supersede
औपचारिक : अधिक्रमित करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
surveillance capitalism
औपचारिक : भोचक भांडवलशाही, पाळतखोर भांडवलशाही
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
sustainable
औपचारिक : शाश्वत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Synchronize/synchronization
औपचारिक : ताळमेळ/मेळ, मेळ घालणे, एकलय
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
syndicalism
औपचारिक : संघसत्तावाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
synergy
औपचारिक : संयुक्तशक्ती, संक्रिया
अनौपचारिक : ताळमेळ, मेळ
टिप्पणी : the interaction of elements that when combined produce a total effect that is greater than the sum of the individual elements, contributions. so २+२=५ अपेक्षित आहे
औपचारिक : सामायिकतेची शोकांतिका, समष्टीची शोकांतिका
टिप्पणी : गोष्टी सामायिक असण्यातून उद्भवलेली शोकांतिका
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
transboundary
औपचारिक : आंतरसीमावर्ती
टिप्पणी : उदा. Transboundary water sharing = आंतरसीमावर्ती जल वाटप
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
transcription, transcreation, transliteration
औपचारिक : ध्वनिलेखन, शब्दांकन, लिप्यंतर अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
travel back in time
औपचारिक : भूतकाळात शिरणे/पोहचणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
triage
औपचारिक : अग्रक्रम, निकडनिवड
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
trial and error
औपचारिक : प्रयत्न-प्रमाद पद्धत, चुकत-माकत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
tribalism
औपचारिक : समूहवाद, जनजातीवाद, टोळीवाद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
trope
औपचारिक : संदर्भानुसार रूपक अलंकार, व्यवच्छेदक लक्षण,नेहमीची खूण,ठोकळेबाज लक्षण,ओळखीचा ठसा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
twitter toolkit
औपचारिक : ट्विटर सामुग्री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
typo (typographical mistake)
औपचारिक : टंचू
टिप्पणी : टंकलेखन चूक.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
typochondriac
औपचारिक : शुद्धलेखकू
टिप्पणी : typochondriac म्हणजे typing/spelling च्या चुकांबद्दल अती काळजी घेणारा.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ubiquitous
औपचारिक : सर्वव्यापी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ultra violet, infra red
औपचारिक : अतिनील, अवरक्त/उपारुण अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
uncanny
औपचारिक : लोकविलक्षण
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
unfriend
औपचारिक : मैत्री संपवणे, अमित्र करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
unfurling (flag)
औपचारिक : फडकवणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
unicorn ( billion dollar startup)
औपचारिक : उद्योगरत्न
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Unlearning
औपचारिक : पाटी कोरी करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
update
औपचारिक : ताजी माहिती, ताजी घडामोड, ताजी बातमी, अद्यतन
टिप्पणी : updated = अद्यतनित
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
upkeep
औपचारिक : निगा राखणे/ देखभाल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
urgency, sense of urgency
औपचारिक : निकड, निकडीचे भान अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
urtext
औपचारिक : मूळसंहिता
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
use case
औपचारिक : उदाहरण दाखला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
utopia, dystopia
औपचारिक : रामराज्य आणि कल्पस्थान अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
vacation homes
औपचारिक : सुट्टीची निवासस्थाने
अनौपचारिक : सुट्टीची घरे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
validation
औपचारिक : वैधता, ग्राह्यता, प्रमाणीकरण, पडताळणी इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
variant
औपचारिक : विभेद
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
vegan diet
औपचारिक : शुद्ध शाकाहार, केवलशाकी, अप्राणिज आहार
टिप्पणी : शाक म्हणजे वनस्पती. खरं तर, दूध यायला नको त्यात. प्रचलित शब्दांचे प्रचलित अर्थ पुसून नवे रुजवणं कठीण असल्याने
non veg = सामिष / मांसाहार
vegetarian (non-meat) = निरामिष / शाकाहार
vegan (plant based) = शुद्ध शाकाहार, अप्राणिज आहार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ventriloquist
औपचारिक : शब्दभ्रमकार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
vested interest
औपचारिक : (गुंतलेले) हितसंबंध
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
vibe
औपचारिक : स्पंदन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
victimhood
औपचारिक : बळीगंड, पीडितपणा
टिप्पणी : -
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
viral (in social media)
औपचारिक : वाऱ्यासारखा पसरलेला, बोभाटा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
virtual world, virtual reality
औपचारिक : आभासी जग, आभासी वास्त्तव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
voice culture
औपचारिक : कंठसाधना, आवाजसाधना
टिप्पणी : साधना ही करावी लागते. संस्कार होतो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
volte face
औपचारिक : टोपी फिरवणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
vulnerable
औपचारिक : असुरक्षित, सहजलक्ष्य, सहजभेद्य, प्रभावधार्जिणा, कमकुवत, दुर्बल , शबल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
wannabe
औपचारिक : इच्छुक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
warmup, cooldown and supplementary exercises
औपचारिक : अनुक्रमे चेतना व्यायाम, निवारक व्यायाम आणि पूरक व्यायाम
अनौपचारिक : अनुक्रमे तयारी व्यायाम, आवरी व्यायाम आणि पूरक व्यायाम
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
water colour, oil colour, acrylic colour
औपचारिक : जलरंग, तैलरंग, रासायनिक रंग
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
water footprint
औपचारिक : जलठसा, जलमान
टिप्पणी : एखाद्या वस्तूच्या निर्मितीत किती पाणी खर्च होतं तो त्या वस्तूचा जलठसा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
web design
औपचारिक : संकेतस्थळ आरेखन
अनौपचारिक : वेब डिझाइन्
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
website
औपचारिक : संकेतस्थळ
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
weekend
औपचारिक : सप्ताहांत, साप्ताहिक सुट्टी
अनौपचारिक : सासु (साप्ताहिक सुट्टी)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
well-read
औपचारिक : बहुपठित (बहुश्रुतसारखा) किंवा बहुश्रुत
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
whale, dolphin
औपचारिक : देवमासा, गादामासा अनुक्रमे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
whataboutry
औपचारिक : राधासुतप्रश्न, समदोषबचाव
टिप्पणी : संदर्भ - "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?"
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Whatsapp (or similar) Forwards
अनौपचारिक : ढकलगप्पा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
whisper
औपचारिक : कुजबूज
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
whistleblower
औपचारिक : जागल्या
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
white supermacist
औपचारिक : गोरे वर्चस्ववादी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
win-lose, lose-win, lose-lose
औपचारिक : win-lose (लाभ-हानी) ,lose-win (हानी-लाभ) आणि lose-lose (उभयहानी)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
win-win and no-win
औपचारिक : उभयलाभ आणि लाभहीन
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
wind chimes
औपचारिक : किंकिणी
अनौपचारिक : झुळूकझंकार
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
wind machine
औपचारिक : वातयंत्र
टिप्पणी : नाटकात वाऱ्याचा आवाज काढण्यासाठी किंवा रंगमंचावर वारं आणण्यासाठी हे यंत्र वापरतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
window shopping
औपचारिक : नजरहाट
टिप्पणी : बाजारहाट'सारखा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
withdrawal symptoms
औपचारिक : मुक्तिपीडा
टिप्पणी : मुक्तिपीडा म्हणावं .... म्हणजे व्यसनातून किंवा वाईट सवयींमधून मुक्ती मिळवताना जी पीडा सोसावी लागते ती. अभाव, माघार पेक्षा ही मुक्ती आहे. उदा. "तो व्यसन सोडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याला सध्या मुक्तिपीडा येत/होत असतात."
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
work contract
औपचारिक : कार्यसंविदा, कार्य कंत्राट
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
you are welcome (धन्यवादला उत्तर)
औपचारिक : "त्यात काय एवढं?", "अरे अर्ध्या रात्री बोलाव खुशाल", "आपल्या माणसांसाठी इतकं तर करणारच", "राहू दे गं" इ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
zeitgeist
औपचारिक : कालमानस, कालसत्त्व
टिप्पणी : the defining spirit or mood of a particular period of history as shown by the ideas and beliefs of the time.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
zero-sum, non-zero-sum
औपचारिक : बेरीजशून्य, बेरीज-वरकड / बेरीज-उणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
इन्शा अल्लाह
औपचारिक : देव करो आणि ....
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
उत्तर "लॉक" करणे
औपचारिक : शिक्कामोर्तब करणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तकिया कलाम
औपचारिक : पालुपद
टिप्पणी : तेच तेच वाक्य, शब्द धरून बसणे .. वारंवार उच्चारणे