टिप्पणी : जिभेचा आनंद. यासाठी जिव्हालौल्य असा शब्दप्रयोग रूढ आहेच.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
झाकणझुल्या
टिप्पणी : पेदरट, झाकणभर झोकून देखील जो झुलु लागतो त्याला झाकणझुल्या म्हणतात
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ट्रोलधाड
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ट्रोलभैरव
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ट्रोलवाट्रोलवी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तुडवं
टिप्पणी : एखाद्या गाण्याचं भयंकर कडवं
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
नवविद्वान/नवविदुषी, नवपंडित/नवपंडिता
टिप्पणी : नव्याने phd प्राप्त झालेले अथवा नव्याने ज्यांचे साहित्य प्रकाशित होऊ लागले ते
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
नेटक
टिप्पणी : online नाटक
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
नेटकरी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
नेतांध
टिप्पणी : एखाद्या नेत्याचे अंध समर्थन करणारा/री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
पक्षांध
टिप्पणी : एखाद्या राजकीय पक्षाचे अंध समर्थन करणारा/री
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
पुस्तक ह्या विषयावर नवे शब्द
टिप्पणी : फुस्तक - फुसके वा फुटकळ पुस्तक, पुस्तकाधीन, पुस्तकगंड - आपल्याला एखादे पुस्तक झेपणार नाही अशी भावना, पुस्तकमय, पुस्म्या = पुस्तकांचा भस्म्या, बुकासूर, पुस्तकमिरव्या/पुस्तकमिरवी
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
फासंग
टिप्पणी : फसवणूक करायला सामानाच्या पारडीखाली वजन लावले जाते त्याला ' फासंग ' असे म्हणता येईल
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
फोनाधीन, फोनाधीनता
टिप्पणी : व्यसनाधीन सारखा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
भावबोली
टिप्पणी : शब्दांतून अर्थाखेरीजही ऐकू येते ती भावबोली (देहबोलीप्रमाणे)