३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
महा ई-सेवा केंद्र रासा
महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. ७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते.
आता आपल्या रासा गावामध्ये सेतू सुविधा सुरु झाल्या आहे. आता आपल्याला दाखले मिळवण्याकरिता वणी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. तरीही सर्व नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. सध्या आपल्याकडे खालील कागदपत्रे काढून मिळेल.
*अधिक माहितीसाठी संबंधीत कागदपत्राच्या नावावर खाली क्लिक करावे*