३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
* ई- श्रम कार्ड *
देशातील असे अनेक मजदुर तसेच कामगार आहेत जे आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवण व्यतीत करत आहे.ज्यामुळे त्यांचा पाहिजे तसा विकास देखील घडुन आलेला आपणास दिसून येत नाही आणि अशाच दुर्लक्षित झालेल्या कामगार तसेच मजदुर वर्गाचा सर्वागिण विकास घडवून आणण्यासाठी,केंद्र सरकारने श्रमिक वर्गासाठी सुरू केलेली एक विशेष योजना म्हणजेच ई श्रम कार्ड.
ई-श्रम कार्डचे काही अत्यंत महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-
ई श्रम कार्ड हे आपल्या आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहे.
असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या काम करत असलेल्या कामगारांपर्यत,मजदुरांपर्यत सामाजिक सुरक्षेची योजना पोहचविणे,त्यांच्या डेटाला राष्टीय स्तरावर एकीकृत करणे हा यामागील सरकारचा प्रमुख हेतु आहे. म्हणजेच याने असंघटित क्षेत्रातील मजदुरांना ह्या योजनेचा पुरेपुर फायदा घेता येणार आहे.
तुम्हाला ई श्रम कार्ड प्राप्त झाल्यास सरकारी योजनेच्या माध्यमातुन मिळणारे लाभ सरळ तुमच्या बँक खात्यात जमा होणार.
ई श्रमवर नोंदणी केल्यानंतर जर समजा आपला अपघात झाला आणि आपण त्यात मृत झालो तर आपल्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणुन दोन लाखापर्यतची नुकसान भरपाई दिली जात असते.आणि समजा आपण अघतातात दगावलो नाही पण आपल्याला काही शारीरीक अपंगत्व आले तर अशा परिस्थितीत देखील आपणास एक लाखापर्यत नुकसान भरपाई मिळत असते.