३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
आपले सरकार सेवा केंद्र रासा च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. रासा गावातील व आजुबाजुंच्या गावातील (बोर्डा, कुंभारखणी, मारेगाव, कोरंबी, साखरा, दरा,इंजासन, बोपापूर, दहेगाव, घोन्सा, झमकोला, इत्यादी व इतरही गावातील) सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आनंद होतो की, बँकिंग सेवा, सरकारी सेवा, निमशासकीय सेवा, खाजगी सेवा, विमा सेवा इत्यादी सर्व ऑनलाइन सेवा तुम्हाला पुरविण्याकरिता आम्ही येथे तत्पर आहोत. या सेवा मिळवण्याकरिता आता आपल्याला दूर अंतरावर वणीला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. शहरामध्ये जाऊन गर्दीमध्ये रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच तुमची प्रवासाला लागणाऱ्या पैशाची व तुमच्या मौल्यवान वेळेची पण बचत होणार. तुमची चक्कर व वेळ वाया जाऊ नये म्हणुन आपण येण्यापूर्वी फोन करून यावे. एकंदरीत तुमचे जीवन सुकर करणे हाच सरकारचा व आमचा प्रयत्न. डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात मेनू बार वर क्लीक करून तुम्हाला सर्व सेवांची माहिती घेता येईल. धन्यवाद !
* बँकेच्या सेवा *
"आपले सरकार सेवा केंद्रा" ची भूमिका