३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते.
* गावनिहाय लाभार्थी कुटुंबांची यादी *
वरील यादीमध्ये ज्या कुटुंबांचा समावेश आहे त्यांनी "आयुष्मान कार्ड" काढुन घ्यावेत. हे कार्ड काढण्याकरिता जवळच्या कुठल्याही "आपले सरकार सेवा केंद्रा" वर जाऊन आपली ओळख पडताळणी (KYC) करुन हे कार्ड काढून घ्यावेत.
* आयुष्मान कार्डचे फायदे *
पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.
सर्व सरकारी रुग्णालये व पॅनलमध्ये असलेल्या कोणत्याही नामांकित प्रायव्हेट दवाखान्यामध्ये संपूर्ण मोफत उपचार करू शकता.
लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.
या योजनेमध्ये दारिद्र रेषेखालील (BPL) सर्व कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या लोकांकडे BPL कार्ड आहे त्यांनी आवर्जून आपले हे कार्ड बनवून घ्यावे.
तसेच इतर कुटुंबांनी सुद्धा ज्यांचे नाव वरील यादीमध्ये आहे त्यांनीही हे कार्ड काढून घ्यावेत.
मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते.
अधिक माहितीसाठी आपण "आपले सरकार सेवा केंद्र रासा(धांडे) येथे संपर्क करू शकता