३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
* पीएम-किसान योजना *
पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे.
1.12.2018 पासून ते कार्यान्वित झाले आहे.
योजनेंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000/- उत्पन्नाचा आधार दिला जाईल.
योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले.
राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख करेल.
हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
गावनिहाय ओळख पडताळणी (KYC) बाकी शेतकऱ्यांची यादी 👇
महत्वाचे :
ज्या शेतकऱ्यांना पीएम- किसान योजनेचे पैसे मिळत आहे, त्यांनी ओळख पडताळणी (KYC) करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही.
ओळख पडताळणी (KYC) करण्यासाठीची अंतिम मुदतवाढ ३१ जुलैपर्यंत झाली आहे. तरीही ३१ जुलैच्या अगोदर लवकरात लवकर KYC करून घ्यावे.
आपण के.वाय.सी.(ओळख पडताळणी) दिलेल्या मुदतीच्या आत न केल्यास आपल्या बँक खात्यात पीएम -किसानचे हप्ते(रू २०००) येणे बंद होणार.
ज्या व्यक्तीचे नाव वरील यादीमध्ये आहे, त्यांनी स्वतः सेतु केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे, कारण त्या व्यक्तीचे मशिनमध्ये बोटाचे ठसे घ्यावे लागतात.
येताना सोबत आपले आधार कार्ड व बँक पासबुक(ज्या बँकेच्या खात्यात पीएम-किसानचे पैसे जमा होत आहे ते). नसल्यास फक्त आधार कार्ड घेऊन आले तरी चालेल.
तसेच सोबत चालुवाला एखादा मोबाईल पण घेऊन यावे.
येताना शक्यतोवर 8888245734 या नंबर वर फोन करून यावे
ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत "पीएम- किसान" साठी नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करून घ्यावी जेणेकरून योजनेच्या लाभाचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणे सुरु होईल.
अधिक माहितीसाठी आपण "आपले सरकार सेवा केंद्र रासा(धांडे)" येथे संपर्क करू शकता.