Marathi

आम्ही भाग्यलक्ष्मी सरला गुरूसहानी मेमोरियल प्रशालेचे इयत्ता आठवीचे विद्यार्थी आहोत. आम्ही ‘PANDEMIC- RISE AND FALL ‘ नावाचा एक प्रकल्प राबवला होता. ह्या प्रकल्पाद्वारे आम्ही अनेक विषयांमधील विविध कौशल्ये प्राप्त केले आहे.

मराठी भाषेतून आम्ही मुलाखत व प्रश्ननिर्मिती कौशल्य शिकलो. यासोबतच आम्ही संवाद्कौशल्यदेखील शिकलो. लोकांसोबत मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे, यासोबतच त्यांच्या अडचणी जाणून घेणे, हे आम्ही शिकलो. मुलाखतकाराने कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, उदा. पूर्वज्ञान, मुलाखतीचा हेतु, व्यक्तिविषयी माहिती हे सर्व आम्ही आत्मसात केले,तसेच मुलाखत घेताना कमी बोलणे,शब्दांत जवळीक असणे,वातावरणात कृत्रिमता नसणे , समोरच्या व्यक्तीचा योग्य आदर करणे, या सर्व शिकलेल्या गोष्टींचा प्रत्येक्ष मुलाखत घेताना आम्हाला उपयोग झाला. यासोबतच आम्ही पथनाट्य लेखन, चारोळया लेखन हे कौशल्य शिकून लोकांमध्ये जाऊन लसीकरणाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ही सर्व कौशल्ये शिकतांना आम्हाला वेळेचे नियोजन करणे अवघड जात होते; परंतु शिक्षकांच्या मदतीने व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आम्ही आमचे काम दिलेल्या वेळेतच पूर्ण केले.

आम्हाला वरील गोष्टी शिकताना व प्रत्येक्ष लोकांची मुलाखत घेताना खूप आनंद झाला व नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्हाला अशाप्रकारच्या प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल,आम्ही ‘भाग्यलक्ष्मी सरला गुरूसहानी मेमोरियल प्रशालेचे’ आभार मानतो.

We are together in this Pandemic

Interview with the Garbage Collectors