Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

चांगला नवरा मिळावा म्हणुन कुमारिकांनी करावयाचे गोपाळकृपष्णाचे व्रत


एका रविवारी सायंकाळी पावशेर दुध आणुन तापवुन ते विरजावे. सोमवारी सकाळी सचैल स्नानादी कर्मे करुन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करा. केसात पांढरी फुले लावावीत. श्रीकृष्ण चे प्रसन्न चित्ताने मनन करता ते दही रवीने घुसळुन त्याचे निघेल तेवढे लोणी एका चांदीच्या नैवेद्यच्या वाटीत ठेवावे. ( चांदीची वाटी नसल्यास दुसरी पर्यायी वाटी वापरावी. ) व त्यावर तुळशी पत्र व खडी साखरेचे २ -४ खडे ठेवुन मनोमनी गोपाळकृष्णास नैवेद्य दाखवावा.

नंतर प्रार्थना करावी की, " गोपाळकृष्णा, मी तुझी लेक आहे, माझा विवाह उत्तम रितीने पार पडुन मला पति सुख लाभण्यासाठी व सौभाग्यासाठी मी तुला हा नैवेद्य अर्पण करित आहे. तो गोड मानुन माझी मनोकामना पुर्ण करावीस अशी प्रार्थना आहे ". नंतर लोणी - साखर स्वतः खावी ईतरांना देऊ नये. असे चार सोमवार व्रत करावेत.

घरातील वातावरण आनंदी असावेत. असे व्रत चार सोमवारी करावेत. चौथ्या सोमवारी वरील प्रमाणेच नैवेद्य दाखवावा. काही तरी गोड पदार्थ बनवुन गोपाळकृष्णास नैवेद्य दाखवावा. नंतर गाईला घास घालावा व कुत्र्याला चतकोर चपाती - भाकरी घालावी. शक्यतो पक्षांसाठी चपाती भाकरीचे बारीक तुकडे करवुन घालावेत. त्या दिवशी भोजनास ईतर लोकांना बोलवु नये.

मासिक पाळीची अडचण झाल्यास पुढील सोमवारी व्रत करावे. परत चारही सोमवार करण्याची गरज नाही.

भगवान गोपाळकृष्णाला अशा रितीने प्रसन्न केल्यास तो परमात्मा मुलीच्या मागे उभा राहुन तिचे कल्याण करतो हे निश्चित.