Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

मंद बुद्धीच्या मुलांसाठी

ज्या मुलांची बुद्धी मंद आहे अशा मुलांकडून श्रीज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी क्रमांक १ व २ , तसेच ओव्या क्रमांक १९ ते २५ व अध्याय १२ मधील ओव्या क्रमांक १ ते १९ त्यांच्या आदी अंती प्रणव ( ॐ ओंकार) लावून रोज मोठ्या आवाजात म्हणून घ्याव्यात. थोड्याच दिवसात त्यांच्या बुद्धीत चांगला फरक पडलेला दिसेल...!

१) देवासमोर बसून 'सप्तशती'तील कुंजीका स्तोत्राचे नऊ पाठ मोठ्याने करावेत.

२) देवघरातील देवांची तोंडे एकमेकांच्यासमोर येणार नाहीत अशा पद्धतीने त्यांची मांडणी करावी. तसेच देवांची तोंडे दक्षिण दिशेकडेही नसावीत.

३) ज्यांना शक्य असेल त्यांनी मारुतीच्या मंदिरात शनिप्रदोषाच्या दिवशी किंवा शिवाच्या मंदिरात सोम प्रदोषाच्या दिवशी तीन तास जळेल असा तेलाचा दिवा तेवत ठेवावा.

४) घराबाहेर दारावर गदाधारी मारुतीचा फोटो लावावा. ( पर्वतधारी वा अन्य प्रकारच्या मारुतीचा नको )


' भीमरूपी स्तोत्र ' वाचताना प्रत्येक दोन ओळीनंतर ' श्रीराम जयराम जय जय राम ' हा मंत्र म्हणावा. यायोगे मारुतीची कृपा लवकर होते. संकटकाळी हे वाचन अशा प्रकारे रोज ५ किंवा १६ वेळा करावे. उत्तम अनुभव येईल.


शांत झोपेसाठी

पुष्कळ लोकांना शांत झोप क्वचितच लागते. अशांनी आपल्या उशिमध्ये शमीची पाने भरावीत व त्या उशीवर झोपावे.

त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी पुढील प्रभावी मंत्राचा १०८ वेळा देवीचे स्मरण करीत जप करावा.

या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।

नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमः।।


उत्तम पुत्रप्राप्तीसाठी

पिंपळाच्या कोवळ्या पाच पानांचा विडा देवीसमोर ठेवून खलील मंत्राचा १०८ वेळा जप करावा व तो विडा पती व पत्नी अशा दोघांनी भक्षण करावा.

मंत्र -

कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम।

श्रियं वासय मे कुलं मातरं पदममालिनीम्।।


असाध्य कामात सफलतेसाठी पंचमुखी हनुमान कवच

एखादे असाध्य कार्य सिद्ध करून घेण्यासाठी मारुतीची उपासना फार उपयोगी पडते. रोज

मारुतीचे दर्शन घेऊन मारुतीला किमान ५१ प्रदक्षिणा घालाव्यात व रोज १० प्रमाणे १० दिवसात ' पंचमुखी हनुमान कवच ' चे संकल्प सोडून १०० पाठ पूर्ण करावेत. कोणतेही

अवघड कार्य आश्चर्यकारक रीतीने पूर्ण होते. मात्र या काळात परान्न घेऊ नये व पूर्ण ब्रम्हचर्य पाळावे. स्तोत्र वाचताना हनुमंतासमोर दीप व उदबत्ती लावणे अर्थातच आवश्यक आहे.