Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

अनेक कामना पूर्ण करणारे व्रत

श्री संतोषी माता

सर्वांना संतोष देणारी ती संतोषी माता. तिच्या व्रताचे माहात्म्य असाधारण आहे. म्हणून असंख्य उपासक भविकतेने संतोषी मातेचे व्रत आचरीत असतात. एक आदिशक्तीची जी असंख्य रूपे आहेत, त्यापैकीच एक संतोषी माता होय. आदिमाया सर्व जगाची उलथापालथ घडवून आणते. म्हणून तिची कृपा झाली की मनुष्याला काही कमी पडणार नाही.

ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला दूर लोटत नाही त्याप्रमाणेच संतोषी मातादेखील आपल्या भक्ताचा अव्हेर करीत नाही. जो आपला अहंकार सोडून शुद्ध भावनेने संतोषी मातेला शरण जाईल व नियम पाळून तिचे व्रत पार पाडील त्याला त्याच्या मनासारखे फळ मिळणारच यात शंका नाही.


संतोषी मातेचे व्रत पाळणाऱ्याने पुढील गोष्टी जरूर पाळाव्यात.

१) स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतो.

२) व्रत करणाऱ्याने शरीराने व मनाने अगदी शुद्ध व पवित्र असावे.

३) घरात स्वच्छता असावी. वातावरण प्रसन्न असावे.

४) व्रत घेणाऱ्याने मद्यमांस पूर्ण वर्ज्य करावे.

५) व्रत दर शुक्रवारी असे चार महिने ओळीने करावे. या शुक्रवारी पूर्ण उपवास करावा. निदान एकभुक्त तरी राहावेच. सोळा शुक्रवार पूर्ण झाल्यावर नंतरच्या शुक्रवारी उद्यापन करावे.

६) व्रताच्या दिवशी म्हणजे त्या त्या शुक्रवारी व्रत करणाऱ्याने व घरातल्या सर्वांनी पण आंबट पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.

७) प्रत्येक शुक्रवारी संतोषी मातेच्या फोटोची पूजा करावी. पूजेत गूळ व चणे नैवैद्याला असावेत. त्या शुक्रवारी एकादशी किंवा असाच उपवासाचा दिवस असेल तर फक्त गूळच दाखवावा.

८) उद्यापनाच्या दिवशी देवीची पूजा करून ब्राह्मण व कुमारिकेला भोजन द्यावे.

९) सोळा शुक्रवारात खंड पडू देऊ नये. स्त्रियांनी अडचण असल्यास त्या शुक्रवार घरातल्या दुसऱ्या कोणाकडून तरी पूजा करवावी.

१०) पूजा झाल्यावर संतोषी मातेची कहाणी वाचावी व इतरांना ऐकवावी. संतोषी मातेची कहाणी झाल्यावर अन्नपूर्णादेवी व महालक्ष्मी यांच्याही कहाण्या वाचाव्या. नंतर संतोषी मातेच्या पोथीवर हळद कुंकू वाहून नमस्कार करावा.

११) अन्नपूर्णा मातेचे व्रत करताना घ्यावयाचा दोरा सव्वा मीटर घ्यावा. त्याचे एकवीस तुकडे करून गाठी मारून पुन्हा दोरा बनवावा. या दोऱ्याला हळदीने पिवळे करावे. व्रतकाळात स्त्रियांनी तो दोरा गळ्यात बांधावा. पुरुषांनी उजव्या हातात बांधावा.

पूर्ण श्रद्धा ठेवून संतोषी मातेचे व्रत पूर्ण करणाऱ्याला इच्छित फळ मिळायलाच पाहिजे. उद्यापन झाल्यावरही संतोषी मातेची दर शुक्रवारी उपासना चालू ठेवणे जास्त फलदायी ठरते.