Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

महाराष्ट्रातील उपास्य देवतांमधे भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या उपासनेला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. दत्त उपासनेचे व नाथ पंथाचे फार जवळचे नाते आहे. नाथपंथाबद्दल समाजात फार गैरसमजुती आहेत. नाथपंथ म्हणजे चमत्कार करणाऱ्या जोग्यांचा एक पंथ आहे असे समजले जाते. नाथपंथात काही शाबरी मंत्राच्या सहाय्याने माणसाचा पशु करण्यात येतो असाही एक प्रवाद आहे. संबंधित दत्त भक्ती सद्गुरु अनुग्रहाद्वारे कराता यावी ; म्हणुन दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन आध्यात्मिक ऊबंटुसामुहिक रात्रप्रहर स्वामी सेवा राबवली जात आहे.

नाथपंथहठयोग यांची पण सांगड घालण्यात येते. नवनाथांचे महावाक्य ' अलख निरंजन ' याकडे लक्ष दिल्यास वरील सर्व समजुतींत फारसे तथ्य नाही. नाथपंथ मार्ग पुर्ण अद्वैतवादी आहे. परब्रम्ह निरंजन स्वरुप अहोरात्र चिंतनाद्वारे जीवनमुक्त व्हावेत असा आदेश या पंथातील सर्वश्रेष्ठ भगवान गोरक्षनाथांनी दिला.

ज्या पंथात अंजन ( अज्ञान ) टाकण्याचा मुख्य आदेश आहे ; तो पंथ या अज्ञानजन्य विश्व संसारात कसा रस घेणार ? हा विश्व प्रपंच या आत्मस्वरुपावर निर्माण झालेला मायारुपी भ्रम आहे. तो नष्ट करण्याऐवाजी भ्रमातुनच चमत्काराला अनन्य साधारण महत्व देत भ्रमातुन नाथ पंथी योगी कसा सापडेल ?

आदिनाथ, दत्तात्रेय, मछ्यिंन्द्रनाथ, गोरखनाथ वगैरे परंपरा लक्षात घेतली तर नाथ पंथ हा दत्त संप्रदाय अंतर्गत आहे.

प्रथमतः दत्त उपासकांनी ध्यानात ठेवावे की दत्त उपासना ही तुम्हाला श्रीमंती, वैभव व प्रपंचसुख फार प्रमाणात लाभू देणार नाही. ही सर्वसंगपरित्यागाची उपासना आहे. या मार्गात विरक्ती, विदेही व वियोगाची अपेक्षा आहे. मात्र या मार्गातील साधकाचा पुर्ण अधःपात अगर सर्वनाश केव्हाही होत नाही. या उपासनेचा संकेत त्रिपुरा सुंदरी जी चैतन्यशक्ती तिच्याशी जीव चैतन्य एकरुप करणे हा आहे.

उपासना कशी करावी याबाबत आध्यात्मिक माहिती देतो

प्रथमतः दत्तगुरु चरणी अनन्य श्रद्धा ठेवावी. इतर दैवते पुजत असले तरीही आपली सर्व निष्ठा दत्तचरणीच दृढ करावी.आपल्या खोलीत दत्त प्रभुंची बसलेली मनोहरी तस्वीर कोणत्याही गुरुवारी आणुन मनोभावे भिंतीवर लावावीत. रोज सकाळी उठल्यावर तोंड धुवून परत अंथरुणात बसुन एकाग्रतेने तस्वीरीकडे एकदा बघुन डोळे बंद करावेत..

मनातल्या मनात... ' जय गुरु दत्ता l श्री स्वामी समर्थ ll ' जप स्मरावा. दररोज २० मि. ही मानस पुजा करावी. अगदी सोपी आहे.