गीत : झिंगाट
फिल्म : सैराट- २०१६
गायक : अजय-अतुल
शब्द : अजय-अतुल
संगीत : अजय-अतुल
अरं उरात होतंय धड धड लाली गालावर आली आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झालीआता अधीर झालोया, बघ बधिर झालोयाआन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुयाउडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंयाझालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाटआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलंतुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलंहात भरून आलोया, लई दुरून आलोयाआन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोयाआगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंयाझालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाटसमद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाईकधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आईआता तराट झालुया तुझ्या घरात आलुयालई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोयाआगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोयाझालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट