गंमत थोडीशी....

(एका सॉफ्टवेअर इंजीनियरची मनोगाथा)

...

मी कोडिंग केले नाही ____ टेस्टिंग ही केले नाही

मी रिपोर्ट सुद्धा साधा ____ कधी पाठवलेला नाही

मी कोडिंग केले नाही...

...

भवती डेवलपमेंट चाले ____ ती विस्फारुन बघताना

कुणी प्रोग्राम चालवताना ___ कुणी बग फिक्सिंग करताना

मी मठ्ठासारखा बसलो ____ टीम मेंबर सोबत जेव्हा

कंपाइल कराया देखिल ____ त्याने हेल्प केली नाही

मी कोडिंग केले नाही...

...

बेजबाबदार मी आहे ______ मूळ प्रोजेक्ट जिथल्या तेथे

दिवसात ओर्कुटिंग करतो ___ सांजेस उरकतो चॅटिंग

पण डोक्यातुन कुठलेही ____ फंडू प्रोग्रामिंग नाही

सी-प्लस-प्लस जमले नाही __ लीनक्स ही कळले नाही

मी कोडिंग केले नाही...

...

डोक्यावर लटके जेव्हा ____ डेडलाइन ची तलवार

निर्लज्जागत मी घेतो _____ कॉपी-पेस्ट चा आधार

मी मॅनेजरला भ्यालो _____ सूपरवाइझरला भ्यालो

मी पगारसुद्धा माझा ______ वाढिव मागितला नाही

मी कोडिंग केले नाही...

...

मी असतो जर अभ्यासू _____ पी.एच.डी. झालो असतो

मी असतो पैसेवाला _______ तर डॉक्टर झालो असतो

मज ले-ऑफ करुनी कोणी ___ हसले वा रडले नाही

एम.बी.ए. झालो नाही ______ एम.एस. ही झालो नाही

मी कोडिंग केले नाही...

...

- अनामिक