मित्र हो जुने ज्ञान जितके महत्वाचे तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त व संयुक्तिक हे नवीन ज्ञान असते. त्याचे कारण आपण जगतो त्याच काळातील आकलना संबंधी ते असते. आपल्या जगण्याशी त्याचा प्रतेक्ष संबंध असतो.
त्यामुळे सतत नवीन वाचले पाहिजे आणि नाव निर्मिती केली पाहिजे. त्या अनुषंगाने मी माज्या वाचनात आलेल्या नवीन गोष्टी थोडक्यात सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करणांर आहे.
हि संकल्पना २१ व्या सहायकाला वापरली आहे कारण शहरीकरण दर या शतकात जास्त असणार आहे. लोक शहरा कडे येणार आहेत. शहरे विस्तारणार आहेत. शहरातील गर्दी वाढत जाईल . त्या बरोबर अनेक समस्या हि येत आहेत आणि येतील. हवामान बदलाचा फटका जसा कृषी अर्थव्यवस्थेला बसला आहे तितकाच प्रसंगी त्या पेक्षा जास्त शहरांना बसेल.
जवळपास 70% जागतिक ग्रीनहाउस गॅस (हरीतगृहीय वायू ) उत्सर्जनासाठी शहर जबाबदार आहेत आणि त्याचवेळी 90% शहर किनारपट्टी प्रदेशात वसलेली आहेत , अर्थात जगभरातील बहुतेक शहरातील लोक हवामान बदलास बळी पडतात व पडणार आहेत. त्या मुळे सर्व शहरवासीयांनी पृथ्वीच्या शाश्वत विकासासाठी एकत्र येऊन सर्व प्रथम शहरे शाश्वत व पर्यावरण पूरक करणे गरजेचे आहेत.
शहरे स्मार्ट कराच परंतु ती शाश्वत कशी होतील त्याकडे आपले जास्त लक्ष आसवे तरच भविष्यात मानवी जीवन आनंदी असेल. संधर्भ ...Thomas et. al. 2019