आज 12 जून 2026 मलकापूर येथे समग्र शिक्षा पंचायत समिती, मलकापूर यांच्या वतीने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलत ॲलिम्को साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य वितरण करतांना मा.आ.चैनसूखजी संचेती व दिव्यांग विद्यार्थ्यांनी कु.आंचल अंबादास सुशिर (स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा.) सदर विद्यार्थ्यांनी ही मूकबधिर व कर्णबधिर आहे.
अलिम्को काय आहे?
ALIMCO (अलिम्को) चा फुल फॉर्म Artificial Limbs Manufacturing Corporation of India असा आहे. ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक ना-नफा सरकारी कंपनी आहे.मराठीमध्ये याला भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम असे म्हणतात.ALIMCO ची मुख्य कामे:कृत्रिम अवयवांची निर्मिती: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम हात-पाय (Prosthetics), व्हीलचेअर, श्रवणयंत्रे (Hearing aids) आणि इतर आवश्यक साहित्याची निर्मिती करणे.योग्य दरात वितरण: हे सर्व साहित्य वाजवी आणि परवडणाऱ्या दरात किंवा सरकारी योजनांमधून मोफत दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवणे.सरकारी योजनांची अंमलबजावणी: ही संस्था भारत सरकारच्या ADIP आणि RVY (राष्ट्रीय वयोश्री योजना) यांसारख्या प्रमुख योजना राबवते.PMD-VK केंद्र: नागरिकांना घरच्या जवळ सेवा मिळावी म्हणून देशभरात 'प्रधानमंत्री दिव्याशा-वयोश्री केंद्र' (PMD-VK) चालवले जातात.
आज विद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आज विद्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मानकर सर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. श्री.अविनाश चव्हाण सर यांनी महाराणा प्रताप यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
स्व. आबासाहेब देशमुख विद्यालयाने 96.66% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. पवन पुंडलिक गायकवाड याने 84.40% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून, रोशनी गजानन गायकवाड व साहिल हरिदास गायकवाड यांनी 84.20% गुणांसह संयुक्त द्वितीय, सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे 84.00% गुणांसह तृतीय, आशिष बबन तायडे 83.00% गुणांसह चतुर्थ तर श्रद्धा प्रदीप हिवरखेडे हिने 82.40% गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे.
विषयवार नैपुण्यात तुषार सदाशिव गायकवाड याने विज्ञान विषयात 100 पैकी 93 गुण तर पायल महादेव गायकवाड हिने गणित विषयात 91 गुण व करिष्मा अशोक वानखेडे हिने सामाजिक शास्र विषयात 90 मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🌹 सर्व विद्यार्थांचा गुणगौरव करतांना मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचारी वृंद 🌹
वडोदा गावचे नाव उंचावले: पवन गायकवाड दहावीत 84.40% गुणांनी विद्यालयात प्रथम
Rokhthok Maharshtra Live May 09, 2026
https://www.rokhthokmaharashtra.in.net/2026/05/8440.html
वडोदा, दि. 9: "कष्टाचे मोल कधी वाया जात नाही," या उक्तीची प्रचिती देत स्व. आबासाहेब देशमुख विद्यालय, वडोदा येथील पवन पुंडलिक गायकवाड याने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 84.40% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पवनच्या या घवघवीत यशाने त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण गायकवाड कुटुंबाचे आणि वडोदा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.संयमी स्वभाव, ध्येयाप्रती निष्ठा आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर पवनने हे यश खेचून आणले. रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास, प्रत्येक चाचणी परीक्षेची केलेली काटेकोर तयारी आणि अपयशाच्या भीतीवर मात करून घेतलेली मेहनत आज सार्थकी लागली. त्याच्या पुस्तकातील प्रत्येक पान कष्टाची साक्ष देत होते आणि आज निकालाच्या रुपाने त्या पानांना यशाचा सुगंध आला आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे फळ
पवनच्या या यशात त्याच्या इतकेच वाटेकरी आहेत त्याचे आई-वडील श्री. पुंडलिक अजाबराव गायकवाड आणि सौ. प्रतिभा पुंडलिक गायकवाड मुलाच्या शिक्षणासाठी केलेली धडपड, त्याच्या पाठीशी उभे राहून दिलेला भक्कम आधार आणि त्याच्यावर टाकलेला विश्वास आज सार्थकी लागला. आईने पहाटे उठून प्रेमाने बनवलेला डबा असो किंवा वडिलांनी परिस्थितीशी झुंज देत पूर्ण केलेली फी असो, या प्रत्येक गोष्टीतून पवनच्या यशाचा पाया रचला गेला. आज पवनच्या मार्कशीटवर केवळ त्याचे नाव नाही, तर त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांचे प्रतिबिंब आहे.
विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी
यावर्षी स्व. आबासाहेब देशमुख विद्यालयाने 96.66% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. पवन पुंडलिक गायकवाड याने 84.40% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून, रोशनी गजानन गायकवाड व साहिल हरिदास गायकवाड यांनी 84.20% गुणांसह संयुक्त द्वितीय, सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे 84.00% गुणांसह तृतीय, आशिष बबन तायडे 83.00% गुणांसह चतुर्थ तर श्रद्धा प्रदीप हिवरखेडे हिने 82.40% गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे.
विषयवार नैपुण्यात तुषार सदाशिव गायकवाड याने विज्ञान विषयात 100 पैकी 93 गुण तर पायल महादेव गायकवाड हिने गणित विषयात 91 गुण व करिष्मा अशोक वानखेडे हिने सामाजिक शास्र विषयात 90 मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. "आजचे यश म्हणजे परिश्रम, चिकाटी आणि जिद्द याचे यशस्वी फलित असून उद्याच्या उज्वल भविष्याचे पाऊल आहे. तुमचे यश आमचा अभिमान आहे," अशा शब्दांत विद्यालयाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पवनचे मामा श्री. सुनिल बाबुराव संबारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "पवनची मेहनत, संयम आणि जिद्द आज फळाला आली. त्याच्या यशात त्याच्या आई-बाबांच्या कष्टांचा वाटा अनमोल आहे. त्याची स्वप्नं अशीच उंच भरारी घेवोत, हीच सदिच्छा."
या घवघवीत यशाबद्दल पवन पुंडलिक गायकवाड आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे वडोदा ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
- मलकापूर प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिन विद्यालयात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब श्री .ज्ञानेश्वर मानकर सर यांनी केले . राष्ट्रीय गीत (वंदे मातरम )-राष्ट्रगीत -राज्यगीत घेऊन मानवंदना देण्यात आली.या वेळी वर्ग 8 व वर्ग 9 चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. वर्ग 8 व वर्ग 9 मधून प्रथम ,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्याचा भेटवस्तू व गुणपत्रिका देऊन गुणगौरव करण्यात आला.
आज विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.श्री.अविनाश चव्हाण सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
आज विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. बेलाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.देविदास नाफडे सर यांनी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मानकर सर,सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.श्री.अविनाश चव्हाण सर यांनी महात्मा फुले यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
दिनांक १ एप्रिल 2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून श्री. ज्ञानेश्वर मानकर सर रुजू झाले . विद्यालयातर्फे सरांचे सहर्ष स्वागत सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात केले.
दिनांक १ एप्रिल 2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून श्री. ज्ञानेश्वर मानकर सर यांनी पदभार स्विकारला .
23 मार्च 2026 रोजी विद्यालयात शहीद दिवस साजरा करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई यांनी प्रतिमेस हरार्पण करून अभिवादन केले.तसेच सर्व शिक्षकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
वर्ग 8 वी मध्ये शिक्षिका सौ .श्रद्धा लढे मूल्यवर्धन तासिका विद्यार्थ्यांना गटचर्चा करायला सांगून समाजमाध्यमे हा संबोध स्पष्ट करीत आहेत.
डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया मार्च २०२६ मध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा एक पुरस्कार सोहळा भातृमंडळ मलकापूर येथे आयोजित केला होता. डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित 'आयडियल टीचर डायनॅमिक इंडिया अवॉर्ड' सोहळा अंतर्गत स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा येथील सौ.सपना जितेंद्र मापारी यांना आदर्श शिक्षिका डायनॅमिक इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
19 मार्च 2026 रोजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई यांनी प्रतिमेस हरार्पण करून अभिवादन केले.तसेच शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर,श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.विरेंद्रसिंह जाधव,श्री.सोपान सपकाळ,श्री.ऋषिकेश चिमकर सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञान शिक्षिका सौ. सपना जि. मापारी यांनी महत्त्व सांगितले आणि सर सी.व्ही.रामन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविला.
इतिहास: सर सी. व्ही. रामन यांच्या शोधाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय,बुलढाणा व अदिती बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट,बुलढाणा यांच्या विद्यमाने विद्यालयात मानसिक आरोग्य कार्यशाळा आयोजा करण्यात आले.वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना समुपदेशन श्री.अजय कांडेलकर,जिल्हा समन्वयक,बुलढाणा यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर, शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर,श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे आदी उपस्थित होते.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली त्यामध्ये भारत वीट निर्मिती,वडोदा व जिजाऊ कृषी केंद्र,वडोदा याठिकाणी भेट देऊन सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.भारत वीट निर्मिती केंद्राचे संचालक शे.रेहान यांनी विद्यार्थ्यांना वीट निर्मिती,वाहतूक ,कच्चा माल याविषयी सखोल मार्गदर्शन केले .तसेच जिजाऊ कृषी केंद्राचे संचालक श्री.माधवराव गायकवाड व सौ.वनिताताई गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कृषीविषयक व व्यावसायिक मार्गदर्शन केले. क्षेत्रभेटीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर, शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर,श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.ऋषिकेश चिमकर व सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली त्यामध्ये भारत वीट निर्मिती,वडोदा व जिजाऊ कृषी केंद्र,वडोदा याठिकाणी भेट देऊन सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.भारत वीट निर्मिती केंद्राचे संचालक शे.रेहान यांनी विद्यार्थ्यांना वीट निर्मिती,वाहतूक ,कच्चा माल याविषयी सखोल मार्गदर्शन केले .तसेच जिजाऊ कृषी केंद्राचे संचालक श्री.माधवराव गायकवाड व सौ.वनिताताई गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कृषीविषयक व व्यावसायिक मार्गदर्शन केले. क्षेत्रभेटीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर, शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर,श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.ऋषिकेश चिमकर व सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
दि.11 FEB 2026 रोजी वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.व्ही.ए.गवई तर प्रमुख अतिथी श्री.आर.एस.नारखेडे, मुख्याध्यापक आदर्श विद्यालय,मानेगाव, श्री.एस.आर.राजपूत, प्राचार्य आदर्श विद्यालय,उमाळी, श्री.जी.के.बोदडे,से.नि.मुख्याध्यापक,वडोदा,श्री.एल.पी.तिजारे मुख्याध्यापक,आदर्श विद्यालय.सावरगाव नेहु,श्री.एस.पी.वानखेडे स.शि.आदर्श विद्यालय.सावरगाव नेहु उपस्थित होते. याप्रसंगी वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला प्रोजेक्टर भेट दिला.कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.जी.के.बोदडे यांनी केली. वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील प्रसंग कथन केले.सर्व अतिथी व अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
1 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यालयात संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिक्षक श्री.अविनाश चव्हाण सर यांनी प्रतिमेस हरार्पण करून अभिवादन केले तसेच सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.विरेंद्रसिंह जाधव,श्री.सोपान सपकाळ,श्री.ऋषिकेश चिमकर सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर विद्यालयात आयोजित करण्यात आले. दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.या शिबिराचा उद्देश सिकलसेल आजाराची आरोग्य तपासणी करणे हा होता. हे शिबिर उमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आयोजित करण्यात आले होते. सिकलसेल हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे जो शरीरातील लाल रक्तपेशींना प्रभावित करतो.
दि. 30 जानेवारी 2026 रोजी विद्यालयात वर्ग 10 च्या विद्यार्थी साठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय गवई सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विनोद वाघ सर आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय,उमाळी हे होते. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा.सोनाली चौहाण व प्रा.नंदा परमार हे सुद्धा उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त साक्षरता शपथ
असाक्षर मुक्त गावाची शपथ प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आली.श्री.अविनाश चव्हाण सर हे
शिक्षक आणि विद्यार्थी 'असाक्षर मुक्त गाव' (साक्षर गाव) करण्याची शपथ देत आहेत.
स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा व जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा, वडोदा यांचा सामुहिक संगीत कवायत सराव दि.23 जानेवारी 2026 ला विद्यालयात घेण्यात आला.
दि.24 जानेवारी रोजी विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन केले.२३ विड्यार्थ्यानी विक्रेता म्हणून सहभाग घेऊन खरी कमाईचा अनुभव घेतला.सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने मेळाव्यात सहभागी झाले.आनंद मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय भाऊसाहेब श्री.आर.एस.नारखेडे सर (मुख्याध्यापक आदर्श विद्यालय,मानेगाव) उपस्थित होते.प्रमुख अतिथीच्या हस्ते स्वरस्वती पूजनाने आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गवई सर यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले.प्रथम ग्राहक म्हणून प्रमुख अतिथी भाऊसाहेब श्री.आर.एस.नारखेडे सर यांनी आनंद मेळाव्यास सुरुवात केली. आर्थिक व्यवहारासाठी कुपन व्यवस्था करण्यात आली. आनंद मेळाव्यात 4500 रुपयांची उलाढाल झाली.
👉 Click here to view VIDEO
19 मार्च 2026 रोजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर यांनी प्रतिमेस हरार्पण करून अभिवादन केले.तसेच श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.विरेंद्रसिंह जाधव,श्री.सोपान सपकाळ,श्री.ऋषिकेश चिमकर सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विद्यालयात दि. 19 जानेवारी ते 23 जानेवारी क्रीडा सप्ताह दरम्यान शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा प्रकारामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रीडा प्रकारात 100 मी धावणे,200 मी धावणे,निंबू चमचा,गोळा फेक,थाळी फेक, कब्बड्डी,खो खो,तीन पाय शर्यत,पोत्याची शर्यत,लंगडी,रिले,क्रिकेट,बुद्धिबळ,रांगोळी,संगित खुर्ची,स्लो सायकल,रस्सी खेच क्रीडा प्रकार घेण्यात आले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हरार्पण व पुष्प वाहून अभिवादन केले.तसेच श्री.अविनाश चव्हाण सर,सौ.सपना मापारी,सौ.श्रद्धा लढे,श्री.विरेंद्रसिंह जाधव,श्री.सोपान सपकाळ,श्री.ऋषिकेश चिमकर सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. वर्ग 9 मधील कु.श्रावणी गायकवाड व वर्ग 10 मधील कु.रोशनी गायकवाड, कु.कृष्णा उगले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील प्रसंग विषद केले. सौ. सपना मापारी मॅडम यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंग विषद केले. सूत्रसंचालन श्री.अविनाश चव्हाण सर यांनी केले.
सन 2025-2026 मध्ये विद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा दिली त्यामध्ये सर्व 20 विद्यार्थी यशस्वी झालेत. वर्ग 9 मधील भागवत गायकवाड व स्नेहल गायकवाड या दोघांनी प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
🌹 सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. 3 केंद्रस्तरीय मूल्यमापन
दि. 8 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. 3 केंद्रस्तरीय मूल्यमापन झाले. केंद्रप्रमुख श्री.शेखर खर्चे सर व श्री.अनिल मोरे सर यांनी शाळेची पाहणी करून व शालेय रेकॉर्ड तपासून शाळा व शाळेतील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. 3 च्या व सर्व कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले. सरांनी शालेय सुधारणा व रेकॉर्ड विषयी महत्वपूर्ण सूचना दिल्या.
दि.8 जानेवारी : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग समिती श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम ता. तिवसा जि.अमरावती यांचे विद्यमाने ग्रामगीता जीवन विकास परीक्षा गट 2/परिचय परीक्षा दि .8 जानेवारी रोजी विद्यालय घेण्यात आली.विद्यालयातील 25 विद्यार्थांनी परीक्षेत सहभाग घेतला.
स्व.आबासाहेब देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा
वडोदा : दि. 3 डिसेंबर 2026 रोजी स्व.आबासाहेब देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. सन 2013 ला 10 वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री.ऐरुळकर सर तसेच शिक्षक श्री.शेगोकार सर होते.विद्यार्थी मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या शालेय जीवनातील अनुभव व सुखद आठवनींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी तसेच प्रमुख अतिथिंनी आपले अनुभव व्यक्त केले. मेळाव्यात विद्यालयातील श्री.विनोद बोंबटकार सर,श्री.अविनाश चव्हाण सर, श्री.विरेंद्र जाधव बाबूजी,श्री.सोपान सपकाळ,श्री.ऋषिकेश चिमकर आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रविण नवथळे तर आभार प्रदर्शन वैशाली ब्राम्हदे यांनी केले.मेळाव्याचे यशस्वीतेसाठी मधुसूदन भुईकर,अमोल वनारे,मंगेश दांडगे,आकाश वानखडे,शिवशंकर भारती,अक्षय सुलताने,बाबुराव तायडे,आकाश दुतोंडे,शे.अहमद,पवन तायडे, मंगेश वाघ यांनी प्रयत्न केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
दि. 3 डिसेंबर रोजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हरार्पण मुख्याध्यापक श्री. विजय गवई यांनी तसेच कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. श्री. अविनाश चव्हाण सर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
दि. 24 डिसेंबर 2025 रोज बुधवार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शेती व तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री.अनिल कैलास मास्कर सहाय्यक कृषी अधिकारी वडोदा व श्री. प्रमोद श्रीराम सोनोने उपकृषी अधिकारी धरणगाव हे उपस्थित होते. कार्यशाळेत शेतकरी बंधूंसाठी कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI अँप विषयी व त्यांच्या वापराविषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जेणेकरून ॲपचा फायदा गावातील सर्व शेतकरी बंधू पर्यंत पोहोचवता येईल तसेच ईपीक पाहणी,मृदा परीक्षण, पिकांची काळजी, शेती उद्योग इ. विषयी तज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक व कृषी अधिकारी यांनी शाळेतील परसबागेची पाहणी केली व शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यशाळेस श्री.विनोद बोंबटकार,श्री.अविनाश चव्हाण,सौ.सपना मापारी,श्री.विजय लांजुळकर,श्री.ऋषिकेश चिमकर, सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दि.18 डिसेंबर 2025
विषय : कैन्सर रू्णाच्या मदतीकरीता मिस्टर हिदुस्थानी द बॅक बेन्चर्स हा एकपात्री नाटकाचा प्रयोग :अनिल सिताराम महाजन मो.8080815354 (बि.ए.बि.पी.एड. कॉन्व्हेंट स्कुल माजी शारिरीक शिक्षक) यांनी सादर केला. शिवाजी Education & Welfare Trust संस्था ही शैक्षणिक, क्रिडा,सामाजिक, सांस्कृतिक,व्यसन मुक्ती समाज जागृती क्षेत्रात प्रचार व प्रसाराचे कार्य करीत असून,ही एक शासन मान्य ट्रस्ट आहे.विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या वैयक्तोक व बौध्दीत विकास व्हावा. आत्मविश्वास ब्दिगुणीत व्हावा. स्टेट डेरिंग निर्माण व्हावे, जेणे करून त्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल, करीता सदर संस्था वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबावत असतो.सदरहू एकपात्री प्रयोग हा श्री.अनिल महाजन यांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या मदती करीता स्टेज शो असून त्यांचा कालावधी फक्त १ तासाचा आहे. विनोदातुन शिक्षणाकडे वळविणारा आणि विद्यार्थ्यांचा आत्मबल द्विगुणित करणारा,असे हे मनोरंजन पर सादरीकरण आहे.
दि. 15 डिसेंबर 2025 रोजी विद्यालयात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर यांनी प्रतिमेला हरार्पण करून अभिवादन केले.तसेच शिक्षक श्री.विनोद बोंबटकार सर , श्री.अविनाश चव्हाण सर, सौ.सपना मापारी, सौ.श्रद्धा लढे व विजय लांजुळकर यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दि.10 डिसेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षण विभाग,पंचायत समिती,मलकापूर व तालुका विज्ञान शिक्षक संघटना मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डी.ई.एस.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दाताळा येथे करण्यात आले. विद्यालयातील वर्ग 10 मधील कु.गायत्री श्रीरंग गायकवाड व ऋतुजा कृष्णा हिंगणे या विद्यार्थिनीनी प्रदर्शनात सहभाग घेतला. मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका सौ.सपना जितेंद्र मापारी यांनी केले.
दि. 07 डिसेंबर 2025 रोजी विद्यालयाची एकदिवसीय सहल सिंदखेड राजा-लोणार-हिवरा आश्रम -बालाजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली. प्रथम सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळ व जिजाऊ सृष्टीला भेट देण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल व तेथील ठिकाणांची माहिती सिंदखेड राजा येथील इतिहास शिक्षक श्री.राजू धुरंधर यांनी विद्यार्थाना माहिती दिली.त्यानंतर लोणार येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवराला भेट दिली तेथे लोणार येथील विज्ञान शिक्षक श्री.विकास आव्हाळे सर यांनी विद्यार्थाना सरोवराविषयी माहिती दिली. विद्यार्थानी सरोवर परिसराचा व जंगल परिसराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट दिली नंतर बुलडाणा येथील बालाजी दर्शन घेऊन मोताळा येथे भोजनानंतर सहलीची सांगता वडोदा येथे झाली.
दि. 9 डिसेंबर 2025 रोजी समग्र शिक्षा कार्यालय,मलकापूर अंतर्गत तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये विद्यालयातील आंचल अंबादास सुशीर,निशा प्रवीण आमोदे,श्रुती दादाराव तायडे,कविता राऊत,सारिका शिवदास इंगळे या पाच दिव्यांग विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.100 मी धावणे या स्पर्धेत आंचल अंबादास सुशीर हिने प्रथम क्रमांक व निशा प्रवीण आमोदे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.संगित खुर्ची स्पर्धेत निशा प्रवीण आमोदे हिचा प्रथम क्रमांक आला.चित्रकला स्पर्धेत आंचल अंबादास सुशीर हिचा द्वितीय क्रमांक आला.शिक्षण विस्तार अधिकारी,श्री.एन.बी.शिंदे साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री.एन.जे.फाळके साहेब यांचे हस्ते विद्यार्थिनीना प्रमाणपत्र व ट्रॉफी प्राप्त झाले.
🌹सर्व विद्यार्थिनीनीचे हार्दिक अभिनंदन🌹
दि.6 डिसेंबर 2025 रोजी विद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी त्याच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री.गवई सर यांनी हरार्पण केले तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी फोटोस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दि. 3 डिसेंबर 2025 रोजी बेलाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नाफडे सर यांनी शाळेला तपासणी निमित्त भेट दिली. विद्यार्थी उपस्थिती,यु डायस पोर्टल माहिती,विद्यार्थी हजेरी,दाखल खारीज रजिस्टर,विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती,VSK अँप उपस्थिती,PAT ऑनलाईन मार्क्स,तक्रार पेटी नोंदी,शिष्यवृत्ती परीक्षा इ. बाबत अवलोकन केले. वर्गातील मुलांशी संवाद साधला.
योगसाधना म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच आंतरिक शांती मिळवण्यासाठी केली जाणारी एक प्राचीन भारतीय साधना आहे. यात योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या विविध पद्धतींचा समावेश होतो, ज्यांचा उद्देश शारीरिक लवचिकता, संतुलन आणि मानसिक एकाग्रता वाढवणे हा असतो. योगसाधना व ध्यान केल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मविश्वास, आत्मविकास व समावेशक दृष्टीकोन या बाबींचा विकास होतो. याच उद्देशाने योगसाधना व ध्यान आयोजित केले जाते.
दि.२८ नोव्हेंबर 2025 रोजी विद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री.गवई सर यांनी हरार्पण केले तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी फोटोस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आज दि. 26 नोब्हेंबर 2025 रोजी विद्यालयात "संविधान दिवस" साजरा करण्यात आला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशीका प्रतिमेला हरार्पण करण्यात आले विद्यार्थ्यानी गीत गायन, संविधान महत्व विषद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मख्याध्यापक श्री. गवई सर व शिक्षिका सौ.मापारी मॅडम यांनी संवेधान विषयी माहिती सांगेतली.संचालन श्री.चव्हाण सर यावेळी निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा.रांगोळी स्पर्धा, ऑनलाईन प्रश्नमंजषा, मानवी साखळी असे मूल्यवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आले
"नशा मुक्त भारत,खुशाल भारत "
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी विद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी शपथ घेतली व संकेत स्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त केले.
योगसाधना म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच आंतरिक शांती मिळवण्यासाठी केली जाणारी एक प्राचीन भारतीय साधना आहे. यात योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या विविध पद्धतींचा समावेश होतो, ज्यांचा उद्देश शारीरिक लवचिकता, संतुलन आणि मानसिक एकाग्रता वाढवणे हा असतो. योगसाधना व ध्यान केल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मविश्वास, आत्मविकास व समावेशक दृष्टीकोन या बाबींचा विकास होतो. याच उद्देशाने शनिवारी योगसाधना व ध्यान आयोजित केले जाते.
दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी विद्यालयात अनुलोम संस्थेद्वारे भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व व इतिहास पि.पि.टी व चित्राफिती द्वारे विषद करण्यात आले . या करिता संस्थेचे प्रतिनिधी श्री. गौरव तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर होते तर कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दि. 14 नोव्हेंबर 2025
आज विद्यालयात बालदिन - पं.जवाहरलाल नेहरू जयंती साजरी करण्यात आली. पं.जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेचे पूजन व हरार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर यांचे हस्ते करण्यात आले.पं.जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेस पुस्प अर्पण करून सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिवादन केले.
दि. 10,11 व 12 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण टप्पा -1 संपन्न झाले. विद्यालयातील शिक्षक श्री.विनोद बोंबटकार व श्री.अविनाश चव्हाण यांनी तीन दिवशीय प्रशिक्षणाला उपस्थित होते.
प्रशिक्षण स्थळ : डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलीटेकनिक,मलकापूर
योगसाधना म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच आंतरिक शांती मिळवण्यासाठी केली जाणारी एक प्राचीन भारतीय साधना आहे. यात योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या विविध पद्धतींचा समावेश होतो, ज्यांचा उद्देश शारीरिक लवचिकता, संतुलन आणि मानसिक एकाग्रता वाढवणे हा असतो.
योगसाधना व ध्यान केल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मविश्वास, आत्मविकास व समावेशक दृष्टीकोन या बाबींचा विकास होतो. याच उद्देशाने शनिवारी योगसाधना व ध्यान आयोजित केले जाते.
VIKSIT BHARAT BUILDTHON या केंद्रशासनाच्या उपक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला. कार्यक्रमाअंतर्गत टीम बनविणे आवश्यक होते. विद्यालयातील 25 विद्यार्थ्यांच्या 5 टीम अशा प्रकारे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टिमने प्रकल्पकार्य करून आयडिया सबमिट केला व सर्वांनी प्रमाणपत्र प्राप्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय गवई,सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
🌹🌹🌹 सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप शुभेच्छा...🌹🌹🌹
Viksit Bharat Buildathon-2025
या केंद्रशासनाच्या उपक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला.कार्यक्रमाअंतर्गत टीम बनविणे आवश्यक होते. विद्यालयातील 25 विद्यार्थ्यांच्या 5 टीम अशा प्रकारे नियोजन करण्यात आले. प्रथम सत्र परीक्षा सुरु असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी टिमने प्रकल्पकार्य करून आयडिया सबमिट केला व सर्वांनी प्रमाणपत्र प्राप्त केले.
🌹🌹🌹 सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप शुभेच्छा...🌹🌹🌹
Team : Adarsh -SIM547360
आत्मनिर्भर भारत - जलविद्युत प्रकल्प
टीम :
आशिष बबन तायडे
दिपक राहुल मोरे
सुपेश संतोष डोंगे
यश श्याम तायडे
अनंता प्रमोद डोबळे
मार्गदर्शक :
1. विनोद ओंकार बोंबटकार (सहाय्यक शिक्षक)
2. सौ.सपना जितेंद्र मापारी (सहाय्यक शिक्षिका)
Team : Roshni -SIM234290
आत्मनिर्भर भारत : प्रकल्प - पाणी वाचवा
टीम :
रोशनी गजानन गायकवाड
मंजुषा महादेव पाचपोर
प्रांजली प्रमोद सुरळकर
स्नेहल प्रमोद गायकवाड
आरती चांगदेव गायकवाड
मार्गदर्शक :
1. विनोद ओंकार बोंबटकार (सहाय्यक शिक्षक)
2. सौ.सपना जितेंद्र मापारी (सहाय्यक शिक्षिका)
Team : Excel-SIM508563
विकसित भारत
प्रकल्प : जल पुनर्भरण (Rain Water Harvesting)
टीम :
श्रावणी प्रमोद गायकवाड
दिपाली सारंगधर हिवरखेडे
पायल योगेश लांडे
रश्मी प्रकाश गायकवाड
गायत्री श्रीरंग गायकवाड
मार्गदर्शक :
1. विनोद ओंकार बोंबटकार (सहाय्यक शिक्षक)
2. सौ.सपना जितेंद्र मापारी (सहाय्यक शिक्षिका)
Team : Gurudev-SIM511209
विकसित भारत - प्रकल्प : महिला व बालविकास
टीम :
वैष्णवी कैलास गायकवाड
सुविधा वासुदेव शिम्ब्रे
आंचल अंबादास सुशीर
पायल महादेव गायकवाड
रुपाली अजय उके
मार्गदर्शक :
1. विनोद ओंकार बोंबटकार (सहाय्यक शिक्षक)
2. सौ.सपना जितेंद्र मापारी (सहाय्यक शिक्षिका)
Team : Sahil - SIM528261
आत्मनिर्भर भारत
प्रकल्प : पवनचक्की द्वारे विज निर्मिती
टीम :
साहिल हरिदास गायकवाड
समर्थ प्रमोद इंगळे
सुचित गजानन गायकवाड
पवन पुंडलिक गायकवाड
सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे
मार्गदर्शक :
1. विनोद ओंकार बोंबटकार (सहाय्यक शिक्षक)
2. सौ.सपना जितेंद्र मापारी (सहाय्यक शिक्षिका)
CERTIFICATE FOR APPRECIATION
प्रमाणपत्र
श्री.विनोद ओंकार बोंबटकर
आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा
यांना विकसित भारत बिल्डॅथॉन (VBB 2025) दरम्यान विद्यार्थी नवसंशोधकांना दिलेल्या अपवादात्मक मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाबद्दल प्रदान करण्यात येत आहे, ज्यामुळे तरुण मनांमध्ये सर्जनशीलता, समस्या-निवारण आणि नाविन्यपूर्णतेला चालना मिळाली.
नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याची आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील कल्पनांना पाठिंबा देण्याची तुमची बांधिलकी एक उज्वल आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी योगदान देते.
आज दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यालयात थोर शास्रज्ञ, पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेस हरार्पण करून डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
विद्यालयात महात्मा गांधी जयंती स्जारी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
२ ऑक्टोबर हा मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांचा जन्मदिवस असून महात्मा गांधी जयंती भारतासह जगभरात साजरा केला जाते . संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. २ ऑक्टोबर याच दिवशी महान राजकारणी, तत्वज्ञानी आणि वकील मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म १८६९ मध्ये, भारतातील पोरबंदर येथे झाला . महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी अहिंसक मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. गांधीजींनी सत्याग्रह, शांतता आणि सत्य या तत्त्वांचा प्रचार केला, ज्यामुळे जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा मिळाली.
"स्वच्छता हि सेवा" 2025 अंतर्गत उपक्रम राबविण्यात आले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा यांचे पत्रानुसार व कार्यालय शिक्षण विभाग बुलडाणा यांचे नियोजनानुसार
1) दि.25/09/2025 रोजी "एक दिवस ,एक घंटा ,एक सोबत या उपक्रमामध्ये शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
2 )दि .26/09/2025 रोजी शाळेत विद्यार्थांना स्वच्छता विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
दि.22/09/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, उमाळी मार्फत किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उमाळी येथील महिला डॉक्टर,नर्स,सखी सावित्री संघ सदस्य महिला व शिक्षिका सौ.सपना मापारी उपस्थित होत्या.सखी सावित्री संघ सभा सुद्धा आयोजित करण्यात आली.
सत्र 2024-2025 मध्ये दि.26 एप्रिल 2025 रोजी झालेल्या MTSE (महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा) परीक्षा विद्यालयातील 35 विद्यार्थी यांनी दिली होती.त्यात 31 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.वर्ग 10 मधून क्षितिजा सदाशिव गायकवाड व वर्ग 9 मधून सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे याने प्रथम क्रमांक मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
वर्ग 9 मधून यश प्राप्त विद्यार्थी:
आरती रविंद्र आमोदे,अनंता प्रमोद डोबाळे ,सुपेश संतोष डोंगे,गौरव सुनिल गायकवाड, पल्लवी राजेंद्र गायकवाड ,पवन पुंडलिक गायकवाड ,रोशनी गजानन गायकवाड ,साहिल हरिदास गायकवाड ,सूचित गजानन गायकवाड ,ऋतुजा कृष्णा हिंगणे,दिपाली सारंगधर हिवरखेडे,सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे,समर्थ प्रमोद इंगळे,दिपक राहुल मोरे,मंजुषा महादेव पाचपोर,शेजल गोपाल सातपूतळे,सुविधा वासुदेव शिम्ब्रे,आशिष बबन तायडे,यश श्याम तायडे
वर्ग 10 मधून यश प्राप्त विद्यार्थी:
योगिता गजानन भाकरे,पूजा प्रविण देशमुख,पूनम गजानन देशमुख ,क्षितिजा सदाशिव गायकवाड ,राधा प्रमोद गायकवाड ,सृष्टी अमृतराव गायकवाड ,विशाखा संजय गायकवाड ,ओम संजय सपकाळ ,अर्शिया परवीन शेख नफीस,रोहिणी गणेश शेळके,तनिशा मिलिंद तायडे,अर्पिता संतोष इंगळे
🌹 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा 🌹
8 सप्टेंबर : 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन विद्यालयात साजरा करण्यात आला.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेला हरार्पण करण्यात आले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व कर्मचारी यांचे पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वर्ग 10 च्या काही विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक होऊन प्रतीशाळा दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.विजय गवई यांनी स्विकारले.श्री .गवई सर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनावर प्रकाश टाकला व शिक्षक दिनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मंजुषा पाचपोर हिने केले तर आभार प्रदर्शन कु.आरती गायकवाड हिने केले.
शिक्षण विभाग पं.स.मलकापूर द्वारा आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा म्युन्सिपल हायस्कूल,मलकापूर येथे आयोजित करण्यात आला. भाषण स्पर्धेत विद्यालयातील वर्ग 10 ची विद्यार्थिनी कु.रोशनी गजानन गायकवाड हिने सहभाग घेतला.स्पर्धेसाठी मार्गदर्शन सौ.सपना मापारी यांनी केले.
विद्यालायात 16 ऑगस्ट 2025 रोजी कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
👉 You tube - Click here
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मध्ये गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून मा.सुरेशभाऊ संचेती सचिव,स्व.मदनलालजी - किसनलालजी संचेती सेवा समिती,मलकापूर हे उपस्थित होते.
शाळेतून प्रथम : कु.क्षितिजा सदाशिव गायकवाड
शाळेतून द्वितीय : कु.तनिशा मिलिंद तायडे
शाळेतून तृतीय : कु.योगिता गजानन भाकरे
वर्ग 9 मधून प्रथम : सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे
वर्ग 8 मधून प्रथम : कु.पायल सुजित तायडे
दि.15 ऑगस्ट 2025 रोजी "गोकुळ अष्टमीस" संतश्रेष्ठ ज्ञानदेवांची 750 वी जयंती असल्याने दि.14 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत "पसायदान" म्हणण्यात यावे असे मा.मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश असल्याने विद्यालयात "पसायदान" म्हणण्यात आले.
पसायदान म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या (भावार्थ दीपिका) शेवटी लिहिलेली विश्वशांतीसाठीची प्रार्थना. यात त्यांनी सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली आहे. पसायदान माहिती : पसायदान, संत ज्ञानेश्वरांनी रचलेली एक प्रसिद्ध प्रार्थना आहे, जी त्यांनी आपल्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाच्या (भावार्थ दीपिका) शेवटी लिहिली आहे. हे एक विश्वशांतीसाठीचे मागणे आहे, ज्यामध्ये सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची भावना आहे. पसायदान'चा अर्थ: पसाय: म्हणजे 'प्रसाद' किंवा 'कृपा'.- दान: म्हणजे 'देणे'.- पसायदान: म्हणजे 'कृपादान' किंवा 'प्रसादाच्या रूपात मिळालेले दान'. पसायदानात काय आहे? पसायदानात, ज्ञानेश्वरांनी परमेश्वराला (ईश्वराला) प्रार्थना केली आहे की, सगळ्या दुष्टांचे वाईट गुण कमी व्हावेत आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळावी.सगळ्या जीवांमध्ये मैत्री आणि प्रेम वाढावे.अज्ञानाचे (अंधाराचे) तिमिराचे नाश होऊन, सर्वांना खरा धर्म (सत्य) दिसू लागो.ज्याला जे हवे आहे, ते त्याला मिळावे. सगळ्या मंडळींना (लोकांना) नेहमी चांगले संत आणि सज्जन लोक मिळत राहो. सगळ्यांना कल्पवृक्षाप्रमाणे (सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या) आणि चिंतामणीप्रमाणे (सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या) गोष्टी मिळाव्यात.
पसायदान'चे महत्व : पसायदान हे केवळ एक प्रार्थना नाही, तर ते ज्ञानेश्वरांचे विश्वकल्याणाचे, विश्वशांतीचे आणि समतेचे (सर्व समान आहेत, असा भाव) प्रतीक आहे. हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे आणि सुंदर रचना आहे, जी आजही लोकांना प्रेरणा देत आहे.
दि.13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रांगोळया साकारल्या.
दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयात अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देव द्वारा आयोजित राज्यस्तरीय श्रीमद्भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला विद्यालयातील 60 विद्यार्थी व शाळेचे माजी 5 विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षेचे सर्व कामकाज श्री.अविनाश चव्हाण सर यांनी पाहिले. परीक्षा दरम्यान श्री.श्याम वानखेडे सर,श्री. विनोद बोंबटकार सर,सौ.सपना मापारी मॅडम, श्री.ऋषिकेश चिमकर यांनी सहकार्य केले.
दि.1 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी विद्यालयात साजरी करण्यात आली.
-> तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२०— १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.[१] साठे हे मांग (अस्पृश्य) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.[२] साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
सक्षम भारताची सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेला एक नियोजनबद्ध उपक्रम जीवनविद्या मिशन संस्कार शिक्षण प्रशिक्षण अभियाना अंतर्गत आज 17 जुलै 2025 रोजी दुसऱ्या सत्रात वर्ग 8 व वर्ग 9 चे विद्यार्थी सहभागी झाले. गुगल मिटिंग द्वारे सत्र घेण्यात आले. तासिकेस श्री.श्याम वानखेडे सर ,श्री.विनोद बोंबटकार सर उपस्थित होते व तासिकेची सुरुवात व शेवट श्री.अविनाश चव्हाण सर यांनी केला.
"एक पेड माँ के नाम-2.0" या अभियान अंतर्गत विद्यालयातील 135 विदयार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या आईच्या सन्मानार्थ आईसोबत एक झाड लावून त्याचा फोटो वर्गशिक्षकांना पाठविलेला आहे. Eco Clubs For Mission LiFE या वेबसाईटवर विद्यालयाने रजिस्ट्रेशन करून सर्व विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करून सर्वांना मोबाईलद्वारे प्रमाणपत्र दिलेले आहेत.
शाळेला सुद्धा सहभागीता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी शाळेतील वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र,उमाळी मार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरण डॉ.योगिता सावंत व त्यांच्या टीमद्वारे करण्यात आले.
लसीकरणानंतर सखी सावित्री सभा घेण्यात आली. सभेला सखी सावित्री संघाच्या सदस्या,शाळेतील शिक्षिका सौ.सपना मापारी,डॉ.योगिता सावंत व आरोग्य सेविका हजर होत्या सभेमध्ये डॉ.योगिता सावंत व आरोग्य सेविका यांनी शाळेतील मुलींना आरोग्य मार्गदर्शन केले व मुलींच्या शारीरिक समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले.
दिनांक 19 जुलै शनिवार रोजी पालक-शिक्षक सभा घेण्यात आली.सभेला वर्ग 9 व वर्ग 10 मधिल विद्यार्थ्यांचे पालक हजर होते. सभेमध्ये NMMS शिष्यवृत्ती नवीन व नुतनीकरण फॉर्म भरणे व 10 वी नंतर NMMS शिष्यवृत्ती नुतनीकरण करण्याबाबत मार्गदर्शन NSP नोडल ऑफिसर व गणित शिक्षक श्री.विनोद बोंबटकार यांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर यांनी पालकांना शाळेतील शिस्त,अभ्यास व विविध उपक्रमाबाबत माहिती दिली तसेच श्री.विनोद बोंबटकार,श्री.श्याम वानखेडे सर व श्री,अविनाश चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांशी चर्चा केली.
स्व.मदनलालजी-किसनलालजी संचेती सेवा समिती, मलकापूर संस्थेचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मा.श्री.चैनसुखजी संचेती यांनी आज दि.23 जुलै 2025 रोजी शाळेला स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय वडोदा येथे भेट दिली. त्यांच्यासोबत संस्थेचे सचिव मा.श्री.सुरेशभाऊ संचेती, प्राचार्य मा.श्री.शैलेंद्रसिंग राजपूत सर,अभियंता मा.श्री.सावला साहेब होते. त्यांनी शाळेच्या विकासाच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही संबोधित केले.
सक्षम भारताची सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेला एक नियोजनबद्ध उपक्रम जीवनविद्या मिशन संस्कार शिक्षण प्रशिक्षण अभियाना अंतर्गत आज 17 जुलै 2025 रोजी पहिले सत्रात वर्ग 8 व वर्ग 9 चे विद्यार्थी सहभागी झाले. गुगल मिटिंग द्वारे सत्र घेण्यात आले. तासिकेस श्री.श्याम वानखेडे सर ,श्री.विनोद बोंबटकार सर उपस्थित होते व तासिकेची सुरुवात व शेवट श्री.अविनाश चव्हाण सर यांनी केला.
दैनिक तरुण भारत अभियान अंतर्गत आज 17 जुलै 2025 रोजी शालेय परिसर स्वच्छता करण्यात आली व तुळस लावा - पर्यावरण वाचवा या उद्देशाने शाळेच्या आवारात तुळस लावण्यात आली.
श्री.अविनाश चव्हाण,स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय
आज दिनांक 15 /07/ 2025 रोजी स्थळ- लीलाधर भोजराज चांडक विद्यालय येथे भारतीय स्काऊट गाईड संदर्भात रजिस्ट्रेशन तथा उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य- काळपांडे मॅडम तथा प्रमुख पाहुणे श्री. फाळके साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मलकापूर हे होते सर्वप्रथम बेडेन पावेल स्काऊट गाईडचे संस्थापक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आज श्री फाळके साहेबांचे स्वागत करण्याची संधी मिळाली यानंतर विविध मान्यवरांचे भाषण झाले सौ पवार मॅडम यांनी स्काऊट गाईड चे महत्व अधोरेखित केले कला,क्रीडा, हस्तकला, कॅम्पिंग,ट्रेकिंग सामाजिक बांधिलकी, सामुदायिक सेवा, विविध उपक्रम,शिस्त नेतृत्व या सर्व घटकांविषयी माहिती दिली.स्व. आबासाहेब देशमुख विद्यालया कडून श्री.अविनाश चव्हाण. सहाय्यक शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.
MTSE परीक्षा 2025 व वर्ग 8 शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मुख्याध्यापक श्री.विजय गवई सर यांनी केला.
MTSE -2025 परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सत्र 2024-2025 मध्ये Maharashtra Talent Search Examination (MTSE) विद्यालयातील वर्ग 9 च्या 23 व वर्ग मधील 13 अश्या 36 विद्यार्थांनी परीक्षा दिली. परीक्षेमध्ये वर्ग 9 मधील 19 विद्यार्थी व वर्ग 10 मधील सर्व 13 विद्यार्थी यांनी यश संपादन केले आहे.वर्ग 9 निकाल 82.60 तर वर्ग 10 निकाल 100% लागलेला आहे.
वर्ग 9 प्रथम : सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे,द्वितीय : रोशनी गजानन गायकवाड,तृतीय : सुपेश संतोष डोंगे
वर्ग 10 प्रथम : क्षितिजा सदाशिव गायकवाड, द्वितीय : योगिता गजानन भाकरे तृतीय : ओम संजय सपकाळ
🌹 सर्व यशस्वी विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन 🌹
दि. 10 जुलै 2025 रोजी शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.मुख्याध्यापक श्री.विजय गवई यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बेलाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अनिल खर्चे सर उपस्थित होते. आशीर्वाद नर्सरी, धानोरा ता.नांदुरा यांचे मार्फत शाळेसाठी मोफत 40 रोपांचे योगदान लाभले. शाळेतील लावण्यात आलेल्या रोपांची संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
दिनांक 30 जून 2025 रोजी आ.भाऊसाहेब श्री.गजानन बोदडे सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी 1 फेब्रुवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत विद्यालयात सेवा दिली आहे.या अल्पावधीत त्यांनी विद्यालयात पिण्याचे पाणी,कार्यालयसाठी संगणक,मैदान सपाटीकरण अश्या अनेक सुविधा मिळवून दिल्यात.त्यांचे पुढील आयुष्य सुखसमाधानाचे व निरोगी राहो.
दिनांक 05 जुलै 2025 रोजी स्व.मदनलालजी-किसनलालजी संचेती सेवा समिती,मलकापूर व संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा यांचे वतीने आदर्श विद्यालय,उमाळी येथे सरांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला. सदर सोहळ्यासाठी संस्थेतील सर्व मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग तसेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आवर्जून हजर होते.
👉 Click here - Clip-1
आज दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन बोदडे सर यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सहाय्यक शिक्षक श्री.श्याम वानखेडे सरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.
आज 23 जून 2025 सोमवार रोजी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या व सर्व विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या आवारातून विद्यार्थ्यांचे लेझीमसह वाजत गाजत स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. मागिल वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 8 ते 10 च्या सर्व विद्यार्थ्यांना खिचडी व मिष्ठान्न(शिरा) वाटप करण्यात आले.
21 जून 2025 शनिवार रोजी योग दिन साजरा करण्यात आला.सकाळी 7 वा मुख्याध्यापक: गजानन बोदडे सर,सर्व शिक्षक,कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले.श्याम वानखेडे सर,विनोद बोंबटकार सर व अविनाश चव्हाण सर यांनी योग प्रात्यक्षिक करुन घेतले.तसेच विद्यार्थांना योग विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
दि.23/05/2025 रोजी विद्यालयात मलकापूर पंचायत समिती स्थरावरील सहायता कक्षामार्फत 11 वी प्रवेश प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. 11 वी प्रवेश प्रक्रीयेमध्ये विद्यार्थांना कोणतीही अडचण येणार नाही याचे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. तसेच विद्यार्थांच्या शंकांचे समाधान सुद्धा करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.दिपक डहाके सर,प्रा.अनंता पाटील सर, प्रा.सुधाकर इंगळे सर होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक गजानन बोदडे सर यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्याम वानखेडे सर यांनी केले.कार्यशाळेस वर्ग शिक्षक विनोद बोंबटकार सर,अविनाश चव्हाण सर,विरेंद्रसिंह जाधव,सोपान सपकाळ ,ऋषीकेश चिमकर व 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतून घवघवीत यश मिळालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार विद्यार्थ्यांचे घरी जाऊन करतांना मुख्याध्यापक गजानन बोदडे सर,वर्गशिक्षक विनोद बोंबटकार सर,श्याम वानखेडे सर,अविनाश चव्हाण सर, सौ.सपना मापारी, विरेंद्रसिंह जाधव बाबूजी,सोपान सपकाळ व ऋषिकेश चिमकर तसेच 95% गुण घेऊन प्रथम आलेली क्षितिजा गायकवाड हिचा बुलडाणा येथे गुणगौरव करताना भाऊसाहेब देशपांडे सर.
SSC March 2025 - प्रथम पाच
प्रथम : क्षितीजा सदाशिव गायकवाड - 95.00%
द्वितीय : तनिशा मिलींद तायडे - 93.20%
तृतीय : योगिता गजानन भाकरे - 90.80%
चतुर्थ : सृष्टी अमृतराव गायकवाड - 90.00%
पाचवी : विशाखा संजय गायकवाड - 89.60%
क्षितीजा सदाशिव गायकवाड : गणित 97
तनिशा मिलींद तायडे : गणित 96
स्व.आबासाहेब देशमुख विद्यालयचा शालांत परीक्षेचा उत्कृष्ट निकाल
स्व.आबासाहेब देशमुख विद्यालयचा शालांत परीक्षेचा उत्कृष्ट निकाल: शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवत तालुक्यातील वडोदा येथील स्व.मदनलालजी-किसनलालजी संचेती सेवा समिती द्वारा संचालित स्व. आबासाहेब देशमुख विद्यालयाने यावर्षी सुद्धा 100% निकाल दिला आहे. दहावीच्या परीक्षेत 52 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य श्रेणीत 32, प्रथम श्रेणीत 17 तर द्वितीय श्रेणीत 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून प्रथम कु.क्षितिजा सदाशिव गायकवाड 95.00%, द्वितीय कु.तनिषा मिलिंद तायडे 93.20%, तृतीय कु.योगिता गजानन भाकरे 90.80% आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मा.आ.चैनसुखजी संचेती, सचिव सुरेशभाऊ संचेती, मुख्याध्यापक गजानन बोदडे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे
🌹 सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹