श्री.चैनसुख मदनलाल संचेती महाराष्ट्राच्या राजकिय पटलावरिल हे नाव सुपरिचीत आहे ते संयम आणि कर्तव्य परायणता यामुळे आजवरच्या आपल्या राजकिय प्रवासात जनसंघापासुन ते भरतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यात महत्वाची भुमिका बजावणारे चैनसुख संचेती हे भाजपच्या जुण्या जाणत्या पदाधिकायांपैकी एक जेष्ठ आमदार आहेत. समाजनिष्टेने प्रेरित होऊन विद्यार्थी दषेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व त्यानंतर जनसंघाच्या चळवळीत सहभगी झालेला हा तरूण कार्यकर्ता बिकट परिस्थीतीतही पक्षकार्यात तळमळीने कार्य करित राहीला. एका भीषण अपघातातून मरणाच्या दारातून परत येऊन आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करण्याचे संकल्प आणखी दृढ केले. पुढे, भाजपा नगर सेवक म्हणून प्रत्यक्ष राजकारणाचा त्यांचा सुरु झालेला हा प्रवास बुलढाणा जिल्ह्याातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे सलग 25 वर्ष आमदार ते भाजपा महाराष्ट् प्रदेष उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यातील नेतृत्व गुणांची ओळख करूण देतो. मराठी, हिंदी, राजस्थानी, तामिळ व इंग्रजी भाषा अवगत असल्याने कित्तेक वेळा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून देशांतर्गत पक्षासाठी केलेले प्रचार कार्य आपल्याला त्यांच्या वक्तृत्व शैलीची ओळख करून देते.या सर्व प्रवासात पक्ष संघटन आणि राजधर्म पाळत समाजहित डोळ्याासमोर ठेऊन ते आजवर धडाडीने कार्यरत आहेत.
एक विद्यार्थी कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी किंवा पार्टीचा प्रदेष उपाध्यक्ष म्हणून चैनुभाऊंचा प्रवास अधिक संगर्षमय रोचक आणि तरूणांसाठी प्रेरणादायक राहिलेला आहे. बहुआयामी चैनुभाऊंच्या व्यक्तिमत्वाला अनेकविद्य पैलू आहेत. उत्तम वक्ता, विकासदृष्टी, अभ्यासू वृत्ती, अचुक गुण ग्राह्याता, बलोपासना व क्रीडा प्रेम, विद्यार्थी हितदक्ष, अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे ध्येय या आणि अशा अनेक गुणांच्या माध्यमातून चैनुभाऊंचे कार्य सिध्दीस जातांना दिसत आहे. त्यामुळेच आजतागायत चैनुभाऊंनी आमदार म्हणून सलग 5 वेळा निवडून येत आपला गड अबाधित राखलेला आहे. यामागचे कारण म्हणजे चैनुभाऊंनी सामान्यातील सामान्य व्यक्तीची घेतलेली काळजी, वैयक्तिक जनसंपर्क, सुख, दुःख, सण, उत्सवसमारंभ इत्यादींच्या माध्यमातुन नागरिकांषी जुळलेली नाळ आणि मतदार संघातील समस्या, प्रष्न, अडचणी सोडवून विकास घडवून आनण्याची प्रचंड इच्छाषक्ती. यामुळेच चैनुभाऊ आजसुध्दा तितकेच लोकप्रिय आमदार, सन्माननिय नेते आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत.
आपल्या सामाजिक कार्यात रोजगार निर्मिती,आर्थिक सशक्तीकरण, प्रगत शिक्षण व प्रशिक्षण आणि जनकल्याणाचे धोरण मनस्वी बाळगून भाऊंनी कित्तेक निष्क्रिय व रोगी संस्थ्यांमध्ये प्राण फुंकले त्याचबरोबर अथक परिश्रमाने कित्तेक संस्था उभारल्यास व त्यांचे मार्गदर्शनही करत आहेत. भाऊंच्या मार्गदर्शनखाली व भाऊंच्या हाती धुरा असलेल्या काही संस्था:
१) गो.वि.महाजन कनिष्ठ महाविद्यालय,मलकापूर
२) के.के. अग्रवाल महाविद्यालय,मलकापूर
३) मलकापूर एजुकेश सोसायटी,मलकापूर
४) स्व.मदनलालजी किसनलालजी संचेती सेवा समिती,मलकापूर
५) आदर्श विद्यालय, उमाळी ता.मलकापूर
६) स्व.सरस्वतीबाई अर्जुनराव वानखेडेआदर्श महाविद्यालय, शेलगांव मुकुंद ता.नांदुरा
७) भिकमचंद गांधी विद्यालय, सावरगांव नेहू
८) आदर्श विद्यालय, मानेगांव ता. जळगांव जामोद
९) आदर्श विद्यालय, अलमपूर ता.नांदुरा
१०) वि.ज.भ.ज.आश्रमशाळा, वाघोळा,ता.मलकापूर
११) स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा ता.मलकापूर
१२) कॅटल ब्रीडिंग डेअरी फार्म
१३) संजय गांधी निराधार योजना
१४) दक्षता समिती
१५) बृहन महाराष्ट्रायोग परिषद, महाराष्ट्र राज्य
१६) वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी, मलकापूर
१७) कृषी उत्पन्न बाजार समिती.
१८) मलकापूर अर्बन बँक
१९) महाशक्ती डेअरी फार्म
२०) आदर्श विद्यालय,जांबूळधाबा ता.मलकापूर