SSC March 2025
शाळेचा निकाल : 100%
एकूण परीक्षार्थी : 52
एकूण उत्तीर्ण : 52
प्राविण्य श्रेणी : 32
प्रथम श्रेणी : 17
द्वितीय श्रेणी : 03
SSC March 2025
शाळेचा निकाल : 100%
एकूण परीक्षार्थी : 52
एकूण उत्तीर्ण : 52
प्राविण्य श्रेणी : 32
प्रथम श्रेणी : 17
द्वितीय श्रेणी : 03
दि. 11 /03/2025 रोज मंगळवारी स्थानिक परिसरामध्ये असणाऱ्या विटभट्टीला भेट दिली. भारत वीट सप्लायर चे संचालक शेख इमरान यांनी वीट बनविण्यास लागणारे कच्चामाल, साहित्य व प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच या उद्योगामुळे स्थानिक महिलांना व पुरुषांना योजगार सुद्धा मिळाला आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी यांनी वस्तू बनवून अनुभव घेतला.
ठिकाण : भारत वीट सप्लायर, वडोदा
वेळ : सकाळी 8.30 वा
तसेच दि. 11 /03/2025 रोज मंगळवारी स्थानिक परिसरामध्ये असणाऱ्या जिजाऊ कृषी केंद्राला भेट दिली. जिजाऊ कृषी केंद्राचे संचालक श्री. माधवराव गायकवाड यांनी कृषी केंद्रा विषयी माहिती दिली. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जावे, खते, बियाणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच तसेच त्यांनी मुलांसाठी सुरु केलेल्या अभ्यासिकाचा (वाचनालय) मुलांनी फायदा घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
ठिकाण : जिजाऊ कृषी केंद्र
वेळ : सकाळी 10 वा
श्याम वानखेडे सर, विनोद बोंबटकार सर, अविनाश चव्हाण सर, शैलेंद्र गुळवे सर मापारी मॅडम उपस्थित होते.
दि. 21/03/2025 रोज शुक्रवारला पतंजली ग्रामोद्योग उत्पादक सहकारी संस्था, वडोदा येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह भेट दिली.पतंजली ग्रामोद्योग चे अध्यक्ष श्री. राधेश्यामजी धूत यांनी तेथे होणाऱ्या विविध 45 वस्तुविषयी सविस्तर माहिती दिली. उत्पादनामध्ये विविध प्रकारचे पापड, लोणचे, चटणी इ. बाबत कामकाज व ते कशाप्रकारे बनविले जाते याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच या उद्योगामुळे स्थानिक महिलांना योजगार सुद्धा मिळाला आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी यांनी वस्तू बनवून अनुभव घेतला.
ठिकाण : पतंजली ग्रामोद्योग उत्पादक सहकारी संस्था, वडोदा
वेळ : सकाळी 9 वा
मुख्याध्यापक गजानन बोडदे सर, श्याम वानखेडे सर, विनोद बोंबटकार सर, अविनाश चव्हाण सर, शैलेंद्र गुळवे सर मापारी मॅडम उपस्थित होते.
आज दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, गड किल्ले, मावळे व इतिहासातील प्रसंग असे विविध सुरेख चित्र रेखाटले.
आज दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व चित्र काढण्यात रममान झाले. शाळेच्या भव्य मैदानात विद्यार्थी व शिक्षक चित्र काढण्यात व्यस्त झाले. मुख्याध्यापक श्री.अशोक देशपांडे सर देखील चित्र रेखाटतांना विद्यार्थी सोबत रममान झाले.
26 जानेवारी निमित्य विद्यार्थिनीनी रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशभक्ती, बेटी बचावो-बेटी पढावो, पर्यावरण, अवकाश संशोधन, परंपरा, विज्ञान असे प्रकारचे विविध विषय या रांगोळी स्पर्धेतून साकारले.रांगोळी स्पर्धेचे मार्गदर्शन शिक्षिका सौ.सपना मापारी यांनी केले.
26 जानेवारी निमित्य विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालय केले जाते.क्रीडा स्पर्धा यात विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. सोबत देशभक्ती व थोर व्यक्ती या विषयावर निबंध स्पर्धा घेतली जाते.
विद्यार्थिनीनी रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशभक्ती, बेटी बचावो-बेटी पढावो, पर्यावरण, अवकाश संशोधन, परंपरा, विज्ञान असे प्रकारचे विविध विषय या रांगोळी स्पर्धेतून साकारले.रांगोळी स्पर्धेचे मार्गदर्शन शिक्षिका सौ.सपना मापारी यांनी केले.
26 जानेवारी निमित्य विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालय केले जाते.क्रीडा स्पर्धा यात विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. सोबत देशभक्ती व थोर व्यक्ती या विषयावर निबंध स्पर्धा घेतली जाते.
चित्रकला स्पर्धा : विद्यार्ध्यांनी विविध ज्वलंत विषयावर, सैनिक तसेच देशभक्तीवर आधारित चित्रे साकारली.
आनंददायी शनिवार - अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.अविनाश चव्हाण सर आपल्या विशेष शैलीने संगीत कवायत घेत असतात. विद्यार्थी सुद्धा आतुरतेने शनिवारची वाट पंगत असतात.संगीत कवायत विद्यार्थी अतिशय उत्साहाने करताना त्यांना आनंद होतोच तसेच शारीरिक विकास होण्यास मदत होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत बुद्धीचा खेळ व विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शकाचा वापर करून प्रात्यक्षिक घेतांना विज्ञान शिक्षिका सौ.सपना मापारी