जयंती म्हणजे जन्मदिवस,वाढदिवस होय.थोरामोठ्यांच्या जयंत्या तसेच पुण्यतिथी(मृत्यू दिवस) साजरी करण्याची आपली पद्धत आहे.पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात.पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे.