सौ.स्नेहा रणजीत कलाटे
अध्यक्षा:-रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनसौ.स्नेहा रणजीत कलाटे
अध्यक्षा:-रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनप्रथम राष्ट्र.. मग पक्ष.. नंतर स्वतः
समाजकारण असो अथवा राजकारण कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यात सातत्य व निष्ठा अत्यावश्यक असते. वाकडच्या उच्चशिक्षित स्नेहा रणजित (आबा) कलाटे हे असेच एक व्यक्तिमत्व होय. चिंचवडचे लोकनेते स्वर्गीय आ.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य करीत असताना लक्ष्मणभाऊ यांनी घालून दिलेल्या विचारांची पताका सक्षमपणे व निष्ठतेने पेलवत सामाजिक कार्य अखंड सुरू आहे. तसेच शहराध्यक्ष मा शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राहताना मोठे दीर संतोषदादा गुलाब कलाटे यांच्या सुनियोजनात तसेच पती रणजित गुलाब कलाटे यांच्या साथीने तसेच वाकड पंचक्रोशीतील सर्व सहकारी मित्र परिवार यांच्या साहाय्याने सामाजिक कार्यात सातत्य आणि निष्ठा जपली आहे. त्यामुळेच स्नेहा कलाटे यांचा वाकड पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेशी असणारा अभूतपूर्व संपर्क प्रत्येकाला आपलासा वाटतो. वाकड पंचक्रोशीत सामाजिक कार्य करीत असताना अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख अल्पावधीतच स्नेहा कलाटे यांनी निर्माण केली आहे. अत्यंत सुसंस्कृत उच्चशिक्षित कुटुंबाचा वारसा लाभलेल्या स्नेहा कलाटे या वाकड परिसरात प्रत्येकाच्या मनावर आपल्या कार्यातून अधिराज्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा चेतलेला हा आढावा...
स्नेहा कलाटे यांनी फाउंडेशनद्वारे हजारो समाजाभिमुख उपक्रमांचा धडाका लावला आहे. सर्व सामन्यांच्या मनाचा ठाव घेत सामाजिक कामांची घोडदौड कायम उत्साही आणि प्रभावी ठेवण्यात कलाटे यांना यश आले आहे. कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहा कलाटे अष्टपैलू, बहुआयामी, चौफेर व भरीव कामगिरी करित आहेत.
डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलेल्या स्नेहा यांचे वडील कालिदास वाडेकर व आई शीला कालिदास वाडेकर हे दोघेही चाकण (पुणे) औद्योगिक नगरीतील राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व. दोघेही सक्रिय राजकारणी समाजसेवक दोघांनीही चाकण नगरीचे सरपंचपद भूषविल्याने लहानपणापासून त्यांची समाजाबाबतची धडपड, आत्मीयता, रंजल्या-गांजलेल्या दीनदुबळ्यांबाबत असलेला जिव्हाळा त्यांनी अनुभवला.ज्या समाजात आपण राहतो, वाढतो अनब जीवन जगायला शिकतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. समाजाचे ऋण कायम आपल्यावर असते, ही आग्रही विचारधारा असलेल्या स्नेहा कलाटे लहानपणीच समाजसेवेकडे ओढल्या गेल्या. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर समाजसेवेचे धडेही त्यांनी गिरवले. त्यामुळे पुढे जाऊन समाजसेवेतच आपण स्वतःला वाहून घ्यायचे,असा निश्चय लग्नापूर्वीच त्यांनी केला होता.
२०११ मध्ये वाकडचे रणजित कलाटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर परमेश्वर कृपेने सासरकडील मंडळी देखील अतिशय समाजशील निघाली.मोठे दीर संतोष कलाटे व पती रणजित कलाटे हे बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करण्याबरोबर सक्रिय समाजसेवेत असल्याने या तिघांच्या एकमतातून व संकल्पनेतून २०१२ मध्ये रणजित आबा कलाटे सोशल फाऊंडेशनची स्थापना झाली. अध्यक्षपदाची जबाबदारी आपसूकच स्नेहा कलाटे यांच्यावर सोपविण्यात आली. मग सुरू झाला समाजहिताच्या उपक्रमांचा झंझावात. पती आणि दीर यांच्या स्वः कमाईतील उत्पन्नापैकी काही भाग समाजासाठी खर्च करायचा असे त्यांचे आर्थिक गणित आहे. त्यानुसार आजतागायत असंख्य समाजाभिमुख उपक्रमांचा धडका लावला आहे. संतोषदादा कलाटे त्यांना नेहमी सांगतात, आपल्या सत्कर्माची नोंद कुठे तरी होत असते, त्यामुळे आपण कसलीही अपेक्षा न ठेवता निःस्वार्थी समाजसेवा केली पाहिजे. आपल्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती रिकाम्या हाताने परतला नाही पाहिजे,त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहणे यातच आपला आनंद असला पाहिजे. या शिकवणी नुसार अविरत समाजसेवा सुरू आहे.
वाकड,पिंपळे निलख परिसरात १० हजार छत्र्यांचे वाटप केले. कोकण पूरग्रस्तांना ५१ हजार रुपयांची मदत केली. ११ ते ३० वयोगटातील खेळाडूंसाठी वाकड-पिंपळे निलख बॅडमिंटन प्रीमियर लीगचे आयोजन केले. धूर फवारणी, कीटक नाशक, औषध फवारणी केली. गो-शाळेला चारा अनब अनाथाश्रमाला अन्नधान्याची मदत केली. दिवाळी फराळाचे घरपोच वाटप. पाच हजार गरजू कुटुंबियांना सर्व समावेशक दिवाळी कीटचे वाटप. महिलांसाठी एकवीरा देवी व अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचे आयोजन. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्यागौरी गणपती सजावट स्पर्ध्येत एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशिन, ओव्हन, गॅस शेगडी या पाच मुख्य बक्षिसांसह उत्तेजनार्थ पाचमहिलांना पैठणी सोन्याची नथ तर प्रोत्साहनपर २५ मिक्सर, प्रदान केले.
कोजागिरी,दिवाळीनिमित्त ज्येष्ठांसाठी फराळ, विरंगुळा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन. मोफत ई-श्रमकार्ड, आधारकार्ड, युनिव्हर्सल पास यांचे स्मार्ट कार्ड वाटप शिबिर व २० हजार कालनिर्णय दिनदर्शिकांचे वाटप. ज्येष्ठ नागरिकांसाठी पांडू, पावणखिंड व ८३ हे चित्रपट दाखविण्यात आले.आयर्न मॅन प्रसाद पाटील यांचा कौतुक सन्मान सोहळा. सनी इस्टेट सोसायटीला फायर सिस्टम कार्यान्वित केली. ऑस्टिन प्लाझा सोसायटीत गणपती मंदिराला पत्र्याचे शेड बसविले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकारातून स्नेहाअंगण सोसायटीची पाणी समस्या गंभीर असल्याने बोअरवेल खोदून देत समस्या सोडविली. अतुल एक्सलेन्सी सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. सॅनिटायझर वाटप व औषध फवारणी केली. पोलिसांना भौतिक सुविधा पुरविण्यावर भर दिला. मोफत नेत्रतपासणी शिबीर व दोन हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले व ६० नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकारे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,चित्रपट इत्यादी विविध क्षेत्रात रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहा रणजित कलाटे यांनी अष्टपैलू व भरीव कामगिरी केली आहे.