मानव जीवन केंद्र
आत्महत्येपासून जीवनाकडे – एक हृदयस्पर्शी आवाहन..!
मानव जीवन केंद्र
आत्महत्येपासून जीवनाकडे – एक हृदयस्पर्शी आवाहन..!
संस्थेचा छोटा परिचय:
एक शब्द... एक स्पर्श... एक माया – कधी कधी एवढंच पुरेसं असतं कोणाचं जीवन बदलायला.
“जगायचंय रे पुन्हा...” हा प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संस्थेचा नाशिक येथे उपक्रम आहे – जो जीवनाकडे परत नेणारी आशेची वाट दाखवतो.
आत्महत्येपासून जीवनाकडे – एक हृदयस्पर्शी आवाहन..!
आज समाजात काही तरुण-तरुणी, विवाहित पुरुष स्ञीयां काही वयोवृद्ध, आणि काही सामान्य माणसे — आयुष्याच्या वळणावर एकटे पडले आहेत.नात्यांचा आधार सुटला, विश्वास तुटला, आणि मनात प्रचंड एकाकीपणा साचला.
कधी कधी या एकटेपणाचं रूप इतकं तीव्र होतं की माणूस स्वतःच्याच अस्तित्वाला संपवण्याचा विचार करतो...पण खरंच इतक्या सहज संपवायचं का हे आयुष्य...?
प्रिय मित्रांनो /भावांनो / बहीणींनो /आजी-आजोबांनो..!
आयुष्य कठीण आहे — हे खरं.
पण तेच आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगता येतं — हेही तितकंच खरं आहे.
प्रत्येक रात्र काळोखानंतर सकाळ घेऊन येते,
प्रत्येक दुःखानंतर नव्या उमेदीनं जगायला शिकवते.
आमच्या प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून "मानवसेवा केअर सेंटर आणि मानवसेवा वृद्धाश्रम " मध्ये असेच अनेक लोक आलेत — ज्यांच्या डोळ्यात आशा संपली होती,मनात फक्त वेदना होत्या, आणि ओठांवर मौन.पण आज तेच लोक पुन्हा हसतात, पुन्हा जगतात, आणि दुसऱ्यांना जगवतात.आम्ही काय करतो?
आमची संस्था —
● अन्न, वस्त्र आणि निवारा — देऊन जीवनाला आधार देते.
● निराश झालेल्या प्रत्येकाला आशेचा हात देते.
● खचलेल्या मनांना प्रेम, संवाद आणि सहानुभूतीचा आधार देते.
● आणि सर्वांत महत्त्वाचं — “तू एकटा नाहीस... आम्ही आहोत!” असा दिलासा देते.
आमचा संदेश प्रत्येक खचलेल्या मनासाठी...जीवन संपवणं हे उत्तर नाही,जीवनाला नव्याने सामोरं जाणं — हाच खरा पराक्रम आहे.
एक अपयश, एक तुटलेलं नातं, एक गैरसमज हे शेवट नाही, ही फक्त थांबलेली वाट आहे.
थोडं थांब, श्वास घे, विचार कर, आणि आमच्याशी संपर्क कर...आम्ही तुला जगायला शिकवू — पुन्हा एकदा, नव्याने!
मानवतेचं 【माणुसकीचे 】आवाहन:
जर तुमच्याभोवती कोणी खचलेला दिसला,एखाद्या मित्राच्या डोळ्यातून वेदना दिसली,तर त्याला दोष देऊ नका...त्याचा हात धरा, त्याचं ऐका, त्याला सांगा —“जीवन सुंदर आहे, फक्त थांब... अजून एकदा प्रयत्न कर!”
आमच्या संस्थेचे ध्येय 【एकचं हेतू पुनर्वसन..!】
आमची संस्था आत्महत्येपासून जीवनाकडे परत आणण्याच्या मोहिमेत अहोरात्र कार्यरत आहे.दररोज कुणाचं तरी मनातलं ऐकून घेतलं जातं आणि कुणाचं तरी जीवन वाचतं.असे कित्येक जिवंत उदाहरणं आमच्याकडे आहेत —ज्यांनी “मरणाचा” विचार केला होता, आणि आज “माणुसकीचा” विचार करतात.
एक प्रामाणिक आवाहन:
“जर तुमची जगण्याची उमेद हरवली असेल, तर आम्हाला संपर्क करा. आमचं दार नेहमी उघडं आहे.आम्ही न्याय देणार नाही, फक्त साथ देऊ.कारण जीवन संपवणं नाही — ते बदलणं हेच खरं उत्तर आहे.”
प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संचालित
मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम आणि मानव जीवन केंद्र. {आत्महत्याग्रस्तांचे पुनर्वसन }
संपर्क: 8888462957/9518705627/8830346913/9923570984
ऑफिस पत्ता: मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम.
पाथर्डी शिवार जी.डी.सावंत काॅलेज समोर निसर्ग काॅलनी पाथर्डी फाटा.नाशिक.
नाशिक, महाराष्ट्र