आत्महत्येपासून जीवनाकडे..! जगायचंय रे पुन्हा...!
आत्महत्येपासून जीवनाकडे – एक हृदयस्पर्शी आवाहन
एक शब्द... एक स्पर्श... एक माया – कधी कधी एवढंच पुरेसं असतं कोणाचं जीवन बदलायला.
“जगायचंय रे पुन्हा...” हा प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संस्थेचा नाशिक येथे उपक्रम आहे – जो जीवनाकडे परत नेणारी आशेची वाट दाखवतो.
आमचं ध्येय: आत्महत्येपासून जीवनाकडे, निराशेपासून आशेकडे, आणि एकटेपणातून सहजीवनाकडे.
प्रिय मित्रांनो /भावांनो / बहीणींनो /आजी-आजोबांनो..!
आयुष्य कठीण आहे — हे खरं.
पण तेच आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगता येतं — हेही तितकंच खरं आहे.
प्रत्येक रात्र काळोखानंतर सकाळ घेऊन येते,
प्रत्येक दुःखानंतर नव्या उमेदीनं जगायला शिकवते.